Wednesday 27 April 2016

INTERVIEW with Shraman Joshi (1920 London)



प्रेम चोपडा नाटकांमध्ये कामं करायला तयार आहेत - श्रमन जोशी

हर्षदा वेदपाठक

गंभीर भुमिका करणारा श्रमन जोशी हल्ली विनोदी भुमिकांतही रंग भरु लागला होता. मात्र आता पहिल्यांदाच तो हॉरर चित्रपट करीत आहे. यासह, चित्रपट आणि रंगमंच यातही तो बरयापैकी वेळ देतो. लेखन देखिल तो करतो. या सगळ्याबद्दल त्याच्याबरोबर केलेली बातचित,

पहिल्यादाच तु हॉररपटात काम करत आहेस, या अश्या चित्रपटात काम करण्याविषयी कधी काय ठरवलेस ?

1920 या चित्रपटाचा 1920 लंडन हा तिसरा भाग आहे, सुरवातीच्या दोन भागांना बरयापैकी यश लाभल्यानं अश्या चित्रपटात काम करणे फार सोपं आहे. कारण या चित्रपटाचा ऐक प्रेक्षक आहे जो या विषयाबरोबर समरस होऊ शकतो आणि अश्या विषयांची वाट पाहतो. ते मला आवडले. फक्त लंडन येथे चित्रीकरण करणे फार कठीण होते

असा विषय तु पहिल्यांदाच करत आहेस ?

कथानक आवडल्यामुळे मी या चित्रपटाची निवड केली. येथे मी भुतापासुन घाबरणारा नाही तर भुताला घाबरवणारयाच्या भुमिकेत आहे. त्यामुळे फक्त मनाची तयारी तेवढी करायची होती. टिझर पाहुन तरी प्रेक्षकाना चित्रपट पहायला आवडेल असं दिसतय. घाबरुन जागे रहायला आवडणारया प्रेक्षकांपैकी मी एक आहे.   

गंभीर, विनोदी भुमिका करत तु हॉररपटांकडे वळला आहेस, त्याचे कारण काय ?

या चित्रपटाद्वारे स्वतःलाच आव्हान देण्याचा मी प्रयत्न केलाय. अगदी रिस्क घेतली आहे म्हटलं तरी चालेल. मला वाटतं प्रेशकांना आवडेल ते.

चित्रपट करताना तु रंगमंच पण करीत आहेस ?

होय, माझ्या आवडीचे माध्यम आहे ते. त्यामुळे माझ्या भावना अगदी सहजपणे सादर करणे सोपे जाते. तसेच तुमचे प्रेक्षकच तुमचे शिक्षक असतात असे मला वाटते. राजु राजा राम, या नाटकानंतर मै और तुम हे नाटक आहे. सेम टाईम नेक्ट्स डे या नाटकाचं आगामी काही दिवसात मी दिग्दर्शन करणार आहे. माझ्या अभिनय कारकी्रदीची सुरवात हि नाटकांपासुन झाली. त्यामुळे मी काम करेन ते समाधान आणि चांगल्या भुमिका आल्या तरच.

गुजराती प्रेक्षक कलेचे दर्दी आहेत तर मराठी पेक्षकवर्ग हा फार मोठा आहे. मला वाटतं नाटक त्यांच्या रक्तातच असतं. मराठी प्रेक्षक त्यांच्या कलेला जिवंत ठेवतात त्याचे मला अप्रुप वाटते.

तुझ्या घराण्यात नाटकांची पार्श्वभुमी आहे. तुझे सासरे प्रेम चोपडापण उत्तम अभिनेता आहेत तर या सगळ्यांबरोबर कधी एकत्रीत काम करणार आहेस काय ?

माझी आत्या सरीता जोशी यांच्याबरोबर काम करायची माझी इच्छा आहे. पण त्यासाठी आई आणि मुलाची कहाणी मिळणे गरजेचे आहे. प्रेम चोपडा यांचे म्हणाल तर ते नाटकात काम करायला तयार आहेत. मात्र अजुनही तशी काही संधी मिळालेली नाही.

तुझे आगामी चित्रपट कोणते ?

वजह, टॉम डीक ऍन्ड हॅरी 2 हे चित्रपट आहेत. 

No comments:

Post a Comment