Sunday 24 April 2016

Interview with One Night Stand director Jasmine Moses D'souza



वन नाईट स्टॅन्ड हे मुखवटाधारी जगातील वास्तव आहे – जास्मीन मोझेस डीसोजा
- हर्षदा वेदपाठक

वन नाईट स्टॅन्ड हा प्रकार समाजात घडत आहे, अश्या बोल्ड विषयाला पडदयावर आणण्याचे काम नवदिग्दर्शिका जास्मीन मोझेस डीसोजा यांनी केलय. एक महिला म्हणुन पहिल्याच चित्रपटासाठी असा बोल्ड विषय निवडणे यासह दिग्दर्शिकेची मानसिकता जाणुन घेण्याचा एक प्रयत्न...

वन नाईट स्टॅन्ड हा विषय वेगळा आहे. त्यासह तुमच्या चित्रपटातील कलाकार निवड देखिल आगळी आहे त्याबददल काय सांगाल ?

खरं तर मी या चित्रपटाच्या प्रसिध्दीला सुरवात करण्यापुर्वीच माझ्या चित्रपटाचा विषय आणि कलाकार हे सगळ्यांच्या चर्चेचा विषय झाले आहेत. वन नाईट स्टॅन्ड नंतर काय घडतं या गाभ्या सभोवती चित्रपटाचा विषय आहे. भावनिकता बाजुला ठेवुन फक्त शरीराची गरज भागवण्यापुरती दोन जणं एकत्र येतात तेव्हा त्या दोन जणांवर अवलंबुन असलेल्यांचे काय होते ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. 

सन्नी लिओनीला मी अऩेक वर्ष ओळखत होती आणि वन नाईट स्टॅन्डचं कथाबीज माझ्याकडे तयार होतं. तिला सांगीतल्यावर ती काम करायला तैय्यार झाली आणि मी ती गोष्ट पुढे लिहुन काढली. तनुजची आई रती अग्नीहोत्री यांना मी या चित्रपटाचे कथानक ऐैकवल्यावर त्यांनी तनुजला काम करायची परवानगी दिली. आणि आमची स्टारकास्ट तैय्यार झाली.  


एक महिला म्हणुन अश्या विषयाची निवड करणे ते देखिल आपल्या पहिल्या चित्रपटासाठी ते तुम्हाला जोखीमेचे नाही वाटले काय ?

मला आव्हान पेलायला आवडते. मग ते कोणत्याही प्रकारचे असो. या मुखवटाधारी जगात जे काही घडत आहे ते वास्तव दाखवण्याचा प्रयत्न मी येथे करतेय. जेव्हा समाज, महिलेच्या वागणुकीवर सततचे प्रश्न विचारतो, तेव्हा त्याच प्रकारचे प्रश्न पुरुषांना का नाही विचारले जात. आपण पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये राहतो, ती बदलायला वेळ लागेल. हा मुद्दा मी वन नाईट स्टॅन्ड या चित्रपटाद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

या चित्रपटाचा विषय हा वेगळा असल्यानं त्याचा प्रेक्षकवर्गपण वेगळा असेल. सेन्सॉर मध्ये कितपत अडथळा आला ?

वन नाईट स्टॅन्ड हा विषय हा लहान मुलांसाठी नसुन तरुणांसाठी आहे. आम्हाला जास्त कट नाही दिलेत. मी काही शब्दांसाठी निग्रही रहीले होते ते शब्द मात्र बोर्डाने तसेच ठेवलेत. पण अनेकदा जे प्रोमो मध्ये दाखवतात ते चित्रपटात नसते, आमच्या चित्रपटात मात्र जे प्रोमोमध्ये आहे तेच पहायला मिळेल. 

हा तुमचा पहिलाच चित्रपट, वगेळा विषय आणि आगळी स्टारकास्ट तुम्हाला लाभली. त्यामुळे तुमच्याबद्दल जाणुन घ्यायची उत्सुकता ही आहेच. तर काय सांगाल स्वतःबद्दल ?

दहा वर्षापुर्वी मी मॉडलिंग करत असे. माझ्या मुलाच्या जन्मानंतर मी घरीच राहीले. ब्लु आणि बॉस या चित्रपटांचे दिग्दर्शक ऍन्थनी डीसोजा हा माझा नवरा. त्याच्याबरोबर मी आमच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये मी विस वर्ष काम केलय. दिग्दर्शनाच्या मी कोणत्याही शाळेत गेलेली नाही. पण फिल्डवरील सगळ्या नामचिन लोकांबरोबर मी काम केलय.

वन नाईट स्टॅन्ड या चित्रपटानंतर पुढे काय करणार आहात ?

मी या चित्रपटात तर ऍन्थनी, अझहर या चित्रपटात व्यस्त होतोत. त्यामुळे मुलासाठी वेळ नाही देता आला. थोडा ब्रेक घेतल्यावर पाहु काय करायचते.


No comments:

Post a Comment