Friday 29 April 2016

INTERVIEW with Gautam Gulati on Azhar


बिग बॉस हा माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईन्ट आहे – गौतम गुलाटी

हर्षदा वेदपाठक

मालिका आणि बिग बॉस या रिऍलीटी शोमध्ये गाजल्यावर गौतम गुलाटी, अझहर या चित्रपटात कॉमेन्टेटर म्हणुन दिसणार आहे त्याबद्दल बालाजी टेलिफिल्मसच्या ऑफीसमध्ये बसुन मारलेल्या गप्पा ...

अझहर या चित्रपटाबद्दल काय सांगशिल, क्रीकेटपटु अझहरच्या जिवनातील दहा पंधरा वर्षाच्या कालावधीवर हा चित्रपट बेतला आहे. मी या चित्रपटात रंगेल क्रिकेटपटु कम कॉमेन्टेटर, रॅवीशच्या भुमिकेत आहे. एकदम शांत स्वभावाचा असा हा माणुस आहे. कॉमेन्टरी देताना तो कसा बोलतो, पार्टीत, लॉकर रुम किंवा बॉक्स बाहेर असताना कसा वागतो-बोलतो ते येथे पाहता येईल. एकंदरीत अझहरच्या वादातीत जिवनातील काही काळ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. नियमीतच्या विषयातील भुमिका नसल्याने या भुमिकेसाठी प्रशिक्षण घ्यावे लागल्याची माहिती गौतम देतो.

बालपणी भरपुर क्रिकेट खेळणारा गौतम, अझहरमध्ये कॉमेन्टरी करताना त्या अनुभवाचा फारसा फायदा न झाल्याचं स्पष्ट करतो, या चित्रपटात माझी काहाणी नाही, तर अझहरची आहे. मी अझहर हा चित्रपट स्विकारला त्यामागे, मोठं बॅनर, चांगले सहकलाकार आणि वेगळं कथानक यामुळे. अश्या चित्रपटात लहान जरी भुमिका असली तरी आणि माझे काम उत्तम झाल्यावर, लोकांच्या मी लक्षात राहीन हे समजुन स्विकारला.

गौतम हा टिव्हीमधिल नामचिन चेहरा आहे जो आता चित्रपटशेत्रात रुळु पाहत आहे, टिव्ही या माध्यमामध्ये मी अनेक वर्ष काम केलं आहे, त्यामुळे त्यापुढे जावुन प्रवास करणे, किंवा वेगळं माध्यम हाताळणे मला गरजेचं वाटते. सध्यातरी मी चित्रपट या नविन माध्यमात काम करु इच्छीत आहे. परंतु वेगळं काही काम आलं तर मी नक्कीच करेन, हे सांगायला तो विसरत नाही.  

पुन्हा एकवार क्रिकेटकडे वळता, संधी मिळाली तर विराट कोहलीची भुमिका करायला आवडेल हे तो सांगुन जातो. विराटच का, हे विचारता मी विराट सारखा दिसतो असे मला अनेक जणं सांगतात म्हणुन हे उत्तर येतं.

मालिकांमध्ये नाव असताना, बिग बॉस सारख्या रिऍलिटी मालिकेत नव्वद दिवस जावुन बसणे हा आपल्या कारकीर्दीचा टरनिंग पॉईन्ट असल्याचे गौतम मानतो, नक्कीच. कारण मी त्याला माझा योग्य निर्णय मानेन. कोणालाही मी ओळखत नव्हतो. मात्र बिग बॉस नंतर, अनेक सामान्य प्रसिध्द लोकं येऊन माझी स्तुती करायचेत. विवीध कामासाठी देखिल मला विचारले गेलं आहे. लोकं तुमच्या कामाची स्तुती करतात तेव्हा अंगावर मुठभर मांस चढते. मात्र या शोनंतर चित्रपटात काम करेन आणि ते देखिल हिरोचच म्हणणारा गौतम, ऐका मोठया चित्रपटात छोटी भुमिका करीत आहे. हा त्याचा निर्णय योग्य मानला पाहिजे कारण, अऩेकांना दिसणारया त्याच्या मर्यादा कदाचित त्याच्या लक्षात आल्या असाव्यात यावर अनेकांचे दुमत होणार नाही.

No comments:

Post a Comment