Wednesday 25 October 2023

Madhuri is ready with her first film production



RNM Moving Pictures ‘Panchak’ to release on 5th January 2024

Produced by Madhuri Dixit and Dr Shriram Nene’s ‘RNM Moving Pictures’

The film received a standing ovation at the Pune International Film Festival (PIFF)

Madhuri Dixit and Dr. Shriram Nene’s RNM Moving Pictures are all set to release their much-awaited Marathi film ‘Panchak’ on 5th January 2024. Directed by Jayant Jathar and Rahul Awate, the film received a standing ovation at the Pune International Film Festival (PIFF).

 

This film marks the second production of RNM Moving Pictures after 15th August which was released directly on OTT and received rave reviews. ‘Panchak’, shot in Konkan, is a dark comedy that deals with the fear of superstition and death. The film features an ensemble cast of the finest artistes from the Marathi film and television industry, and theatre, and is shot in picturesque Konkan.

 

Talking about the same, co-founders of RNM Moving Pictures Madhuri Dixit and Dr. Shriram Nene said, “The idea of Panchak is very simple. Superstitions can overwhelm us, and drive us to unreasonable fear, putting us in absurd situations.  We are very excited about producing this movie and have worked hard to assemble an outstanding cast and crew and will hopefully give audiences a much-needed dose of humour. We can’t wait to showcase the film to the audiences.”

 

Produced by RNM Moving Pictures, ‘Panchak’ is directed by Jayant Jathar and Rahul Awate. Starring Adinath Kothare, Tejashri Pradhan, Anand Ingale, Nandita Patkar, Bharati Acharekar, Vidyadhar Joshi, Satish Alekar, Sagar Talashikar, Dipti Devi, Ashish Kulkarni, and Dilip Prabhavalkar the film is set to release on 5th January 2024.

Saturday 14 October 2023

Tiger 3 trailer to release

 ‘Tiger can take on an army of people with his bare hands!’ : Salman Khan



Superstar Salman Khan is set to unveil the trailer of Yash Raj Films’ Tiger 3 on October 16th. *The makers revealed the time of the trailer drop to be 12 noon* through an unseen image of Salman aka Tiger ready to tear apart his opponents with his iron chain-clad bare hands!


Salman reveals that the action of the film will be ‘raw, realistic yet spectacular’ and the new image sets the tone for what to expect from the trailer - Tiger will be on the hunt to destroy his nemesis with brute force. The YRF Spy Universe film, Tiger 3 is set to release on the big Diwali window.


Salman says, “The action in Tiger 3 is raw, realistic yet spectacular. It is simply out of the world. What I love about the Tiger franchise is that the hero is presented as the larger-than-life Hindi film hero who can take on an army of people with his bare hands! He is ok to shed blood and still keep standing till everyone around him is finished.”


He adds, “The heroism (of Tiger) is in him taking the challenge head on and not back down just as a real-life tiger would do when he hunts his prey. My character, Tiger, will never retreat from a fight. He will never give up till he is breathing and he will be the last man standing for his country.”


He says, “I like how Tiger has been presented on the big screen by YRF and that’s what has caught the fancy of the audience. They like to see Tiger in action because they know they will get to see some of the most gritty and coolest action sequences ever. I hope they love the trailer of Tiger 3 because it has some mad moments of outrageous action that people have seen to date.”


The internet is in a frenzy with anticipation of the trailer of Tiger 3, directed by Maneesh Sharma. This film is set to reveal the next chapter of how Aditya Chopra is shaping the YRF Spy Universe that has so far delivered a 100 percent blockbuster result at the box office. The YRF Spy Universe Films so far are Ek Tha Tiger, Tiger Zinda Hai, War, Pathaan and now Tiger 3.


#salmankhan #tiger3 #Katrinakaif



Friday 13 October 2023

Michael Douglas to receive Satyajit Ray Lifetime Achievement Award in 54 IFFI

The prestigious Satyajit Ray Lifetime Achievement Award will be bestowed upon the renowned Hollywood actor and producer Michael Douglas at the 54th International Film Festival of India (IFFI). The announcement was made by Union Minister of Information and Broadcasting, Shri. Anurag Singh Thakur through a post on X. IFFI 54, a significant event in the global cinematic calendar, will be graced by the celebrated actor, accompanied by his spouse, eminent actress and philanthropist Catherine Zeta Jones and their son and actor, Dylan Douglas. Indian Film producer and founder of Percept Ltd. and the Sunburn music festival Shailendra Singh, who is celebrating his 25 years in the Indian Film Industry will also be in attendance.

MPaking the announcement on X, Union Minister Anurag Singh Thakur extended a warm welcome to Michael Douglas, his spouse Catherine Zeta Jones and their son Dylan Douglas. He added that the love Michael Douglas holds for India is well known and that the country is eager to showcase our rich cinematic culture and unique traditions.

The Satyajit Ray Lifetime Achievement Award, instituted in the 30th IFFI in 1999, is presented to individuals whose exceptional contributions have significantly enriched and elevated the world of cinema. Michael Douglas, a luminary in the film industry, has captivated audiences globally with his unparalleled talent and commitment to his craft.

Michael Douglas has enjoyed a remarkable career, earning two Academy Awards, five Golden Globe Awards, and an Emmy Award. His roles in cinematic masterpieces such as “Wall Street (1987)", "Basic Instinct (1992)”, “Falling Down (1993)”, "The American President (1995)", “Traffic (2000)” and “Behind the Candelabra (2013)” have left an indelible imprint on cinema history. He has also produced a number of critically acclaimed films, such as “One Flew Over the Cuckoo's Nest (1975)”, “The China Syndrome (1979)”, and “The Game (1999)”. In 1998, he was appointed the UN Messenger of Peace for his commitment to disarmament issues, including nuclear non-proliferation and halting the illicit trade in small arms and light weapons. Notably, he was awarded the honorary Palm D'Or at the Cannes Film Festival earlier this year, a testament to his enduring influence on the global film fraternity.

Catherine Zeta Jones, an accomplished actress in her own right, has been recognized for her outstanding contributions to cinema and her commitment to philanthropy. Her remarkable career includes unforgettable performances in films like “Traffic (200)", "Chicago (2002)”, and "The Mask of Zorro (1998)", which have earned her critical acclaim and numerous accolades. She is also the recipient of an Academy Award and a British Academy of Film and Television Arts (BAFTA) Award.

In a noteworthy event earlier this year, Michael Douglas was honored at the India Pavilion in Marche Du Film, during the Cannes Film Festival, underscoring his global impact on the film industry.

As part of the 54th IFFI, Michael Douglas and Catherine Zeta Jones will also be participating in a special In Conversation session hosted by the National Award-winning film producer, Shailendra Singh. Mr. Singh, renowned for his contributions to Indian cinema, is the founder of Percept Ltd. and the Sunburn music festival. His critically acclaimed productions, including "Phir Milenge" (2004) and "Kanchivaram" (2008), have garnered widespread recognition and a National Film Award for Best Film (Kanchivaram).

The Satyajit Ray Lifetime Achievement Award has previously honored luminaries such as Bernardo Bertolucci (IFFI 30), Carlos Saura (IFFI 53), Martin Scorsese (IFFI 52), Dilip Kumar (IFFI 38), Krzysztof Zanussi (IFFI 43), and Wong Kar-wai (IFFI 45), among other major film personalities.

The 54th IFFI promises to be a grand celebration of cinematic excellence, as it pays tribute to the extraordinary achievements of Michael Douglas, Catherine Zeta Jones, and Shailendra Singh.


#IFFI 

#54iffi 

#MichaelDouglas #satyajitraylifetimeachievementaward #Catherine Zeta Jones 







Thursday 12 October 2023

जिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलतर्फे २०२३

 जिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलतर्फे २०२३ मधील भरगच्च कार्यक्रमाची रुपरेषा प्रसिद्ध करण्यात आली आहे. २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या १० दिवसांच्या कालावधीत २५० हून अधिक सिनेमे या महोत्सवात दाखवले जाणार आहेत. या वैविध्यपूर्ण महोत्सवात ४० हून अधिक वर्ल्ड प्रीमिअर्स पार पडणार आहेत. तर ४५ आशिया प्रीमिअर्स आणि ७० हून अधिक दक्षिण आशिया प्रीमिअर्स पार पडतील. विशेष म्हणजे यंदा दक्षिण आशिया विभागासाठी विक्रमी १००० हून अधिक सिनेमांच्या प्रवेशिका आल्या आहेत. दक्षिण आशियातील समकालीन सिनेमे आणि सिनेमाच्या माध्यमातून उमटणाऱ्या नव्या जाणीवांवर भर दिला जाणार आहे. यंदाच्या या महोत्सवात सर्वाधिक महत्त्वाची असणार आहे दक्षिण आशिया स्पर्धा. दक्षिण आशिया आणि दक्षिण आशियातून जगभरात पोहोचलेल्या सिनेकर्त्यांसाठी, त्यांच्यातील प्रतिभेसाठी महत्त्वाचे केंद्र बनण्याचे या महोत्सवाचे नवे उद्दिष्ट या स्पर्धेतून दिसून येते. नव्या दमाचे, वेगळे समकालीन दक्षिण आशियाई सिनेमे प्रेक्षकांसमोर आणणे हा या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे. भारत, बांग्लादेश, भूतान आणि नेपाळ तसेच यूके आणि जर्मनीत वास्तव्यास असणाऱ्या या भागातील उदयोन्मुख फिल्ममेकर्स तसेच दुसऱ्यांदा सिनेमा बनवणाऱ्यांचे १४ सिनेमे यात आहेत. शिवाय, स्पर्धेबाहेरच्या विभागातही ४६ दक्षिण आशियाई सिनेमांचा (२२ फिचर फिल्म+ २४ नॉन-फिचर) समावेश आहे. या सर्वच सिनेमांतून दक्षिण आशियातील वैविधता आणि संपन्न कलागुणांना वाव दिला जाणार आहे. म्यानमार, नेपाळ आणि बांगलादेशातील सिनेमांचा या विभागात समावेश आहेच. शिवाय, या देशांमधून ऑस्ट्रेलिया, जर्मनी, अमेरिका, यूके, पोलंड आणि स्पेनमध्ये स्थलांतरित झालेल्या सिनेकर्त्यांच्या दृष्टिकोनातून बनलेले सिनेमेही यात आहेत.

मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC)मध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत या महोत्सवातील मंडळाचे मान्यवर सदस्य उपस्थित होते. अनुपमा चोप्रा, फरहान अख्तर, राणा दुग्गुबती, सिद्धार्थ रॉय कपूर, विक्रमादित्य मोटवाने, झोया अख्तर, रोहन सिप्पाी आणि अजय बिजली यांनी जागतिक आणि दक्षिण आशियाई सिनेमांची या कार्यक्रमातील यादी जाहीर केली. अत्यंत विचारपूर्वक हे सिनेमे निवडण्यात आले आहेत.

जिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलच्या आर्टिस्टिक डायरेक्टर दिप्ती डिकुन्हा म्हणाल्या, “दक्षिण आशिया आणि जगभरात पसरलेल्या दक्षिण आशियाई लोकसंख्येचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या, त्यांच्या जाणीवा मांडणाऱ्या सिनेमांवर भर देणारी एक नवी परिसंस्था या महोत्सवाच्या माध्यमातून उभी करणं हा आमचा उद्देश आहे. या दिशेने प्रयत्न करताना पहिल्याच वर्षी दक्षिण आशिया विभागात आम्हाला इतके वैविध्यपूर्ण सिनेमे आणणं शक्य झालं याचा आम्हाला फार अभिमान वाटतो. आमची बांधिलकी निव्वळ सिनेमे दाखवण्याच्या पलिकडे आहे. मुंबईत जगातील सर्वोत्तम सिनेमे उपलब्ध करून देतानाच कल्पना आणि विचारांचे आदान-प्रदान, सहकार्य आणि व्यवसाय संधी उपलब्ध करून देणे हा आमचा प्रयत्न असेल.”

या महोत्सवातील वर्ल्ड सिनेमा किंवा जागतिक सिनेमा विभागात ३५ हून अधिक देशांमधील ९० हून अधिक सिनेमांचा समावेश आहे. जगभरात यंदा पार पडलेल्या विविध चित्रपट महोत्सवांमधील काही बहूचर्चित सिनेमेही इथे पाहता येतील. पाल्मे डी’ऑर पुरस्कार विजेता जस्टिन ट्रिएट यांचा अॅनाटॉमी ऑफ अ फॉल, ऑस्करपर्यंत पोहोचलेला ब्रॅडले कुपर यांचा मॅस्ट्रो, सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऑडिअन्स अॅवॉर्ड पटकावलेला मॅडलेन गॅविन यांचा बीयाँड युटोपिया असे एकाहून एक सरस सिनेमे यंदा मामी महोत्सवात पाहता येतील. शिवाय पेड्रो कोस्टा यांचा द डॉटर्स ऑफ फायर, हिरोकाझु कोरे-एडा यांचा मॉन्स्टर, हाँग सँग-सू यांचा इन अवर डे, पेड्रो अल्मोडोवर यांचा स्ट्रेंज वे ऑफ लाईफ, केन लोच यांचा द ओल्ड ओक, अकी कौरीस्माकी यांचा फॉलन लीव्ह्स आणि अॅलिस रोहरवॉचर यांचा ल शिमेरा  हे सिनेमेही यात आहेत.

जिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलच्या इंटरनॅशल प्रोगॅमिंग विभागाच्या प्रमुख अनु रंगचर म्हणाल्या, “महोत्सवात येणाऱ्या प्रेक्षकांसाठी आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही अत्यंत सुंदर सिनेमे निवडले आहेत. बहूचर्चित आणि नावाजलेल्या सिनेमांसोबतच काही असे सिनेमेही आहेत जे त्यांच्या-त्यांच्या देशातून अॅकॅडमी अॅवॉर्ड्ससाठी नामांकित होते. काळाच्या ओघात महान सिनेमे म्हणून ओळख घडवण्याची ताकद या सिनेमांमध्ये आहे. अनेक उत्तमोत्तम सिनेमे भारतात स्वतंत्रपणे प्रदर्शित होण्याची शक्यता फारच कमी असते. असे निवडक सिनेमेही आम्ही आणले आहे. या सिनेमांमुळे आश्चर्यचकित होण्यास उत्सुक असा प्रेक्षकवर्ग आम्हाला लाभला आहे. त्यांच्या या आवडीचा विचार केल्याने इथे प्रत्येकासाठी काही ना काही आहे.”

या पत्रकार परिषदेत जिओ मामीच्या फेस्टिव्हल डायरेक्टर अनुपमा चोप्रा म्हणाल्या, “महोत्सवातील प्रत्येक सिनेमाच्या माध्यमातून आम्ही सिनेकर्मी ते प्रेक्षक अशा प्रत्येक संबंधितावर दूरगामी छाप सोडू इच्छितो. सिनेमा आणि सिनेकर्मींप्रती असलेली आमची बांधिलकी या महोत्सवातील प्रत्येक बाबीचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळेच, जगभरातील प्रतिभा इथे एकवटली जाईल आणि त्याचवेळी दक्षिण आशियाई सिनेमे आणि सिनेकर्मींना प्रकाशझोतात येता येईल, त्यांच्यासाठी नव्या संधी उपलब्ध होतील, अशी आम्हाला आशा आहे.”

जीओ मामीच्या सहसंचालक मैत्रेयी दासगुप्ता म्हणाल्या, “सहनिर्मिती आणि व्यावसायिक संधींना प्रोत्साहन देणाऱ्या या परिसंस्थेचा भाग होण्याची संधी प्रस्थापित आणि उदयोन्मुख सिनेकर्मींना या महोत्सवातून मिळते. अशा या महत्त्वाच्या १० दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यास आम्ही उत्सुक आहोत. यातील विविध उपक्रम आणि स्पर्धांच्या माध्यमातून या महोत्सवाला आम्ही एक अनोखे व्यासपीठ बनवू इच्छितो. जिथे सिनेकर्मी आणि प्रेक्षकांना सक्षमतेची जाणीव मिळेल, त्यांची मते मांडता येतील आणि सिनेमा, त्याचा परिणाम, नव्या कल्पनांचा आनंद लुटता येईल.”

प्रस्थापित आणि उदयोन्मुख सिनेकर्मींच्या उत्कृष्ट सिनेमांची मेजवानी देणाऱ्या या महोत्सवाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. या महोत्सवातील खालील विभागांची घोषणा करण्यात आली आहे (स्पर्धा आणि बिगर-स्पर्धा):

साऊथ एशिया स्पर्धा: या स्पर्धात्मक विभागात विविध भाषांमधील १४ समकालीन आणि महत्त्वपूर्ण असे १४ सिनेमे असतील.

वैशिष्ट्ये: सुमंत भट यांचा मिथ्या, लीझा गाझी यांचा बरिर नाम शहाना (अ हाऊस नेम्ड शहाना), फिडेल देवकोटा यांचा द रेड सुटकेस


फोकस साऊथ एशिया (बिगर-स्पर्धा): जगभरात पसरलेल्या दक्षिण आशियाई सिनेकर्मींच्या या सिनेमांतून या भागातील विविधतेचे दर्शन घडेल. चित्रपटांचा कालावधी, भाषा, कथामांडणीचा बाज आणि प्रकार असं प्रचंड वैविध्य असणाऱ्या या विभागातील सिनेमांमध्ये दक्षिण आशिया आणि या भागातून जगभरात पसरलेल्या सिनेकर्मींच्या प्रतिभेवर भर देण्यात आला आहे. दक्षिण आशियाई सिनेमांचा अनुभव अधिक समृद्ध करणारे कथाकथन हा याचा गाभा आहे. यात विविध कालावधीचे ४६ सिनेमे आहेत.

वैशिष्ट्ये: वरुण ग्रोवर यांचा ऑल इंडिया रँक, विनोद रावत यांचा पुश्तैनी, करण तेजपाल यांचा स्टोलन, मिलिन धमाडे यांचा माई

आयकॉन्स साऊथ एशिया: दक्षिण आशियातील प्रसिद्ध आणि महत्त्वाच्या अश सिनेकर्मींचे सिनेमे या विभागात आहेत.

वैशिष्ट्ये: आनंद पटवर्धन यांचा वसुधैव कुटुंबकम्, विक्रमादित्य मोटवाने यांचा इंडि(रा)याज इमर्जन्सी, मुस्तोफा सरवार फारुकी यांचा समथिंग लाइक अॅन ऑटोबायोग्राफी

गाला प्रीमिअर साऊथ एशिया: या विभागात भारतातील यंदाच्या सर्वात महत्त्वाकांक्षी सिनेमांचा समावेश आहे. देशभरातील प्रस्थापित प्रतिभावान सिनेकर्मी आणि अनोख्या पद्धतीने दिग्दर्शनातून आपले म्हणणे मांडणाऱ्या सिनेकर्मींचा प्रतिभा यातून दिसून येईल.

वैशिष्ट्ये: अनुराग कश्यप यांचा केनेडी, ताहिरा कश्यप यांचा शर्माजी की बेटी, रजत कपूर यांचा एव्हरीबडी लव्हस सोहराब हांडा

मराठी टॉकीज: २०१६ मध्ये सुरू झालेल्या या विभागात समकालीन मराठी सिनेमातील उत्कृष्ट कलाकृतींचा समावेश असतो. आपल्या मूळ मातीतील म्हणजेच महाराष्ट्रातील समकालीन विचार मांडणाऱ्या सिनेमांचा वाढता विभाग जिओ मामीच्या मराठी टॉकीज या व्यासपीठावर सादर केला जातो. यंदा सचिन चाटे यांनी या विभागातील सिनेमांची निवड केली आहे.

वैशिष्ट्ये: आशिष बेंडे यांचा आत्मपॅम्फ्लेट (Auto-bio Pamphlet), रितेश देशमुख यांचा वेड, क्षितिज जोशी यांचा ढेकूण, परेश मोकाशी यांचा वाळवी

डायमेन्शन्स मुंबई: जिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये २००९ साली श्रीमती जया बच्चन यांच्या हस्ते पहिल्यांदा डायमेन्शन्स मुंबई हा विभाग सादर करण्यात आला. सध्या हा विभाग या महोत्सवातील एक सर्वाधिक लोकप्रिय विभाग आहे. डायमेन्शन्स मुंबईतील अनेक विजेते सिनेकर्मी थेट सिनेमे आणि वेब सीरिजपर्यंत पोहोचले आहेत.

वैशिष्ट्ये: विदार जोशी यांचा शुड आय किल मायसेल्फ ऑर हॅव अ कप ऑफ कॉफी? कुमार छेडा यांचा हाफवे, अंजनी चढ्ढा, निवेदिता राणी यांचा सिटी ऑफ मिराज

वर्ल्ड सिनेमा: या लोकप्रिय आणि अनोख्या विभागात फेस्टिव्हलच्या वर्षात जगभरात तयार झालेल्या आणि समीक्षकांनी नावाजलेल्या उत्तमोत्तम कलाकृतींचा समावेश असतो.

वैशिष्ट्ये: जस्टिन ट्रिएट यांचा अॅनाटॉमी ऑफ अ फॉल, फेड्रो कोस्टा यांचा द डॉटर्स ऑफ फायर, हिरोकाझु कोरे-एडा यांचा मॉन्स्टर, हाँग सँग-सू यांचा इन अवर डे, पेड्रो अल्मोडोवर यांचा स्ट्रेंज वे ऑफ लाईफ, केन लोच यांचा द ओल्ड ओक, अकी कौरीस्माकी यांचा फॉलन लीव्ह्स, एलिस रोहरवॉचर यांचा ल शिमेरा, बर्ट्रांड बोनेलो यांचा द बीस्ट, ब्रॅडली कुपर यांचा मॅस्ट्रो

आफ्टर डार्क: बिफानचे जोंगसुक थॉमस नाम यांनी यातील सिनेमांची निवड केली आहे. या विभागात जगभरातील सर्वाधिक थ्रिलिंग सिनेमांचा समावेश असतो.

वैशिष्ट्ये: पार्क चॅन-वूक यांचा ओल्डबॉय Oldboy (रिस्टोअर्ड), कॅमरॉन कैर्नेस यांचा लेट नाईट विथ द डेविल, ख्रिस्तोफर बोरगिल यांचा ड्रीम सिनारिओ, विराट पाल यांचा नाईट ऑफ द ब्राइड

रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्स: शॉर्ट फिल्म प्रकारची वाढती लोकप्रियता आणि त्यांचे महत्त्व रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्समध्ये मांडले जाते. मूळ शॉर्ट फिल्म्स प्रेक्षकांसमोर आणून या उदयोन्मुख सिनेकर्मींना त्यांची कलाकृती मोठ्या पडद्यावर आणण्याची संधी यातून मिळते. रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्समधील द परफेक्ट टेन या स्पर्धेत भारतीय सिनेकर्मींनी बनवलेल्या १० मिनिटांहून कमी कालावधीच्या चित्रपटांचा समावेश असतो.

वैशिष्ट्ये: दिबांकर बॅनर्जी यांचा बॅडमिंटन, रिशव कपूर यांचा नेक्स्ट, प्लीज, श्रीरंग पाठक यांचा थेंब

रिस्टोअर्ड क्लासिक्स: आपला चित्रमय वारसा जपणे, त्याचा सन्मान करणे ही या महोत्सवाची बांधिलकी आहे. भारत आणि जगभरातील विविध डिजिटली नव्याने जपले गेलेले क्लासिक सिनेमे या विभागात दाखवले जातात.

वैशिष्ट्ये: योनफॅन यांचा बुगीज स्ट्रीट, क्लेअर डेनिस यांचा चॉकलेट, होऊ शाओ-शेन यांचा मिलेनिअम माम्बो

मामी ट्रिब्युट: सिनेमाची कला अधिक विकसित व्हावी यासाठी आपल्या प्रतिभेसह सिनेमांमध्ये प्रचंड सहभाग दिलेल्या व्यक्तींना या विभागातून आदरांजली वाहिली जाते.

रेट्रोस्पेक्टिव्ह: रेट्रोस्पेक्टिव्ह विभागाच्या माध्यमातून जिओ मामी महोत्सव सिनेसृष्टीतील महान व्यक्तींच्या गौरवशाली कारकिर्दीचा आढावा घेते. या विभागातून आंतरराष्ट्रीय सिनेमांचा इतिहास पुन्हा मोठ्या पडद्यावर जागवला जातो.

रिकॅप : या विभागात २०२० ते २०२२ या काळातील आमच्या निवडक सिनेमांचा पुन्हा आस्वाद घेता येईल.

वैशिष्ट्ये : अपर्णा सेन यांचा द रेपिस्ट, प्रसुन चॅटर्जी यांचा दोस्तोजी, पायल कपाडिया यांचा अ नाइट ऑफ नोइंग नथिंग

जिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हल भारतात मुंबईमध्ये शुक्रवार २७ ऑक्टोबर ते रविवार ५ नोव्हेंबर २०२३ या काळात रंगणार आहे.

#जिओमामी #jiomami #jiomamifilmfestival #2023 #mami #mami2023 #nmacc




Tuesday 10 October 2023

Review : The Vaccine War

 द व्हॅक्सिन वॉर - भारताची यशोगाथा 


- हर्षदा वेदपाठक 


आपण सगळ्यांनी ख्रिस्तोफर नोलान यांचा द  ओपनहायमेर हा चित्रपट पाहिला असेल. या चित्रपटामध्ये विविध स्तरावर बॉम्ब तयार करणाऱ्या विधीला आणि ज्याने तो बॉम्ब शोधला, ज्या अस्त्राने जगभर अनेकांचे प्राण घेतले. त्या मेंदूच्या, शास्त्रीय प्रवासाची कहाणी रंजक पद्धतीने सादर केली होती ती पहिली. त्याच धर्तीवर, अनेकांचे जीव वाचवणारया  व्हॅक्सिन (लस) ची अशीच एक कहाणी, ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी कथा विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द व्हॅक्सिन वॉर या चित्रपटामध्ये पहायला मिळते.


अजिबात गुंतागुंत नसलेली, रेखीव अशी या कथेची मांडणी आहे. बंद प्रयोगशाळेमध्ये  खेळून ठेवणारया कथानकाचे सादरीकरण करणे सोपे नाही. द वॅक्सिंग वॉर मध्ये दिग्दर्शक आपल्याला पूर्णपणे बांधून ठेवतो. बायोलॉजिकल सायन्स या विषयाला लिहून अजिबात कंटाळा येणार नाही, अशा प्रकारे तयार करणे मुळात लेखक दिग्दर्शकाला खूप आव्हानात्मक आहे. परंतु हि कामगिरी केली आहे, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी. त्यांचे हे काम त्यांच्याच आतापर्यंतच्या कामांमध्ये सर्वोत्तम काम ठरले आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.


कोणतीही आगाऊ सूचना न देता अचानक आलेल्या सर्दी खोकला आणि ताप यांनी पुढे इतके राक्षस रूप घ्यावे हि संपूर्ण मानव जातीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण व्हावा. त्याच आजाराला, पुढे कोविड-19 असे नामकरण करण्यात आले. सगळ्या जगाला गिळंकृत करू पाहणाऱ्या कोरोनाला रोखण्यासाठी सगळेच प्रयत्नशील होतेत. पुणे येथील, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च मध्ये काम करणाऱ्या डॉक्टर बलराम भार्गव (नाना पाटेकर) यांना जानेवारी 2020 मध्ये या नव्या व्हायरस ने चिंतेत टाकले. त्यावर उपाय म्हणून ते, इंडियन व्हायरोलॉजी मधील त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने कशाप्रकारे कोव्हीड 19  बरोबर दोन हात करतात ते दाखवले आहे. समाजाची, घराची विस्कटलेली घडी, नात्यांमध्ये असलेल्या दुरावा, लग्न.. शिक्षण.. नोकरी असे सगळे थांबलेले आहे. बेरोजगारांची वाढलेली संख्या.. जगण्यासाठी, उपचारासाठी नसलेले पैसे यामुळे लोकांचे काय हाल झाले ते काही प्रमाणात पाहायला मिळते.


वेळेच्या विरोधात असलेले युद्ध, पटापट मरणारी लोकं, उपचारांची नितांत असलेली गरज हि सगळी दृश्य आपल्याला  भूतकळात अलगद घेवून जातात. पार्श्वसंगीत कथानकाला व्यवस्थित पुढे नेताना दिसते. 


भारत हा देश फक्त थाळी वाजूवून, गो करोना गो.. असे म्हणणारा असून, अंधश्रद्धेवर जगणारा देश आहे. तो कधीच कोरोनावर उपाय शोधू शकणार नाही, हे देखील जगाने ठरवून टाकले. भारत लस तयार करू शकेल काय किंवा करणार नाही, हि देश आणि विदेशामध्ये तयार झालेली मानसिकता. व्हॅक्सिनेशन शोधुन त्यावर संशोधन करून ती गब्बर औषध कंपनीला विकून, नफा कामावण्यापेक्षा सरकारी व्यवस्थामध्ये वायरस व्हॅक्सिनेशनचे वितरण संपूर्ण भारतभर करण्यात यावी, हि संकल्पनाच मुळात मानवतेला दर्जा मिळवून देते. आपल्या घरात, समाजात, देशभरात, जगभर कोरोनाचा क्रूर धिंगाणा घडताना आपण पाहिला. तोच प्रवास येथे आपल्याला पुन्हा एकदा भूतकाळात घेऊन जातो. तसेच महामारीचे युद्ध हे फक्त विज्ञान या विषयानेच जिंकले जाऊ शकते, हा ठळक संदेश द वॅक्सिंग वॉर हा चित्रपट समाजाला देतो.


दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, कोरोना संदर्भातील सगळ्याच घटना प्रामुख्याने येथे टिपतात. परंतु त्या सगळ्यांची ते खिचडी करण्याचे टाळतात. त्यापेक्षा संपूर्ण पटकथा हि साधी आणि सराळ ठेवतात. तसेच दिग्दर्शक सगळ्या महिलांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये डोकावण्याचे देखील टाळतात. प्रत्येक वेळेला, सिस्टिम्सवर भाष्य करण्यापेक्षा, डॉक्टर भार्गव आणि एक पत्रकारातील, पत्रकार परिषदेमधील चकमक येथे प्रतिनिधित्व करते.


डॉक्टर भार्गव म्हणून नाना पाटेकर यांची केलेली निवड उत्तम आहे .कणखर आणि शांत स्वभावाचे डॉक्टर भार्गव म्हणून नाना जमून जातात. गिरिजा ओक, पल्लवी जोशी, रायमा सेन आपल्या भूमिका उत्तमरीत्या वाठवतात.


चित्रपटाच्या शेवटी पडद्यावर झळकणारी भारतीय व्हॅक्सिनेशनची यशोगाथा आपला उर अभिमानाने भरून आणतो. जगामध्ये भारताला मोठेपणा मिळवून देणारा द व्हॅक्सिन वॉर हा चित्रपट सगळ्यांनी पहावा असाच आहे.


- हर्षदा वेदपाठक

#Nan Patekar, #Pallavi Joshi, #Raima Sen #The Vaccine War, #Vivek Agnihotri, #The Vaccine War Review, #Corona, #Covid19,


परीक्षण फुकरे 3

 फुकरे 3 - कॉमेडीचा कचरा


- हर्षदा वेदपाठक


२०१३ मध्ये चित्रपट दिग्दर्शक मृगदीप लांबा यांचा फुकरे हा एका अगदी वेगळ्याच धाटणीचा विनोदपट, प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. अगदी अनपेक्षितपणे या चित्रपटाच्या वाट्याला भरघोस यश आले होते. दिल्लीतील दोन रिकामटेकडे तरुण फक्त ऐका विचित्र स्वप्नाच्या माध्यमातून लॉटरीच्या तिकीटाद्वारे पैसा मिळवतात, हि मध्यवर्ती संकल्पना होती फुकरे 2 ची. अश्या या ताज्या, टवटवीत कल्पना समीक्षक आणि प्रेक्षक अशा दोघांच्याही पसंतीस उतरल्या होत्या. आजही उपग्रह वाहीन्यांवर हे चित्रपट तुफान चालतात.


२०१७ मध्ये चित्रपटकर्त्यांनी एक पाऊल पुढे जात, याच मालिकेतील दुसरा भाग फुकरे रिटर्न्स प्रेक्षकांपुढे आणला.. हा भाग पहिल्या भागापेक्षा अधिक प्रमाणात भव्य होता, पण पहिल्यापेक्षा त्याचा दर्जा थोडा खालावलेला होता. बहुतेक मालिकांबरोबर घडणारी हि नैसर्गिक घटना आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हा चित्रपट तिकिट खिडकीवर सेमी हीट ठरला होता.  


२०२३ मध्ये, जवळजवळ सहा वर्षां नंतर मृग आणि त्याची टीम या हटके विनोदपट मालिकेतील तिसरा भाग घेऊन येत आहेत. यावेळी कथा आकार घेत आहे ती आफ्रीकेमध्ये. मृग या मुलांना आफ्रीकेच्या अनोळखी जमिनीवर एका चकाकत्या हिऱ्याच्या शोधात घेऊन तर जातो, पण आणखीनच गोंधळलेल्या अवस्थेत दिल्लीला येऊन परततो.


हनी (पुलकीत सम्राट), चुचा (वरुण शर्मा), लाली (मनोज सिंग) आणि पंडीत (पंकज त्रिपाठी) त्यांचे एक किरकोळ विक्री दुकान असते. पण चुचाच्या देव पुजेचा वापर करुन त्यातून बऱ्यापैकी पैसा कमवत असतात. भोली पंजाबन (रिचा चढ्ढा) तुरुंगातून परत आली आहे आणि दिल्लीभर आपल्या निवडणूक मोहिमेसाठी तयारी करत आहे. चुचाबरोबर निवडणूकीतील सामना टाळण्यासाठी ती मुलांना हिऱ्याच्या शोधात आफ्रिकेत पाठवते, पण यानंतर घडणाऱ्या गुंतागुंतीच्या घटनांची तिला यावेळी काहीच कल्पना नसते. सिटी ऑफ ड्रीम मधून गाजलेली अभिनेत्री लेखा प्रजापती यात हवाई सुंदरीच्या भूमिकेत आहे. ट्रेलरमध्ये दिसलेला तिचा हुक सीन प्रदर्शनापासूनच चांगलाच व्हायरल झाला आहे.


कथानकाच्या ओघात ते दृश्य कमी महत्वाचे , जरी वाटत असले तरी, त्याला तिसऱ्या भागात एक खास महत्व आहे. मृगने क्लायमॅक्समध्ये चागंला धक्का दिला असला, तरी चित्रपटाची लांबी हा या तिसऱ्या भागासाठी थोडा काळजीचा विषय झाला आहे.


फुकरे 3 हा चित्रपट, मालिकेची वैशिष्ट्ये जपण्याचा प्रयत्न जरी करत असला, तरी टॉयलेटवर आधारीत विनोदांचा अतिरेक त्रासदायक ठरतो. लघवी आणि घामाचा अतिरेकी आणि कित्येक टन पेट्रोलियमची निर्मिती करुन ते कसे पैसे मिळवतात ते पहाणे फारसे आनंददायी नाही. पण मृगने दिल्लीतील पाणीटंचाईचा सामाजिक-राजकीय मुद्दा चतुराईने मांडला आहे.


जफर (अली फजल) जरी संपूर्ण चित्रपटभर नसला, तरी त्याला एक विशेष भूमिका आहे, जी चांगलीच लक्षात रहाते.  


चुचाचे विनोदाचे जबरदस्त टायमिंग आणि गमतीशीर संवाद चित्रपट बहारदार बनवतात. संवादाच्या दृष्टीने हनीचे योगदान कमी असले तरी त्याची उपस्थिती जाणवते. लाली आणि पंडीत हे या काहीशा डगमगणाऱ्या पटकथेचे आधारस्तंभ असले, तरी पहिल्याची असाहय्यता आणि दुसऱ्याचे गमतीदार इंग्रजी चुचाच्या विनोदात भर घालते. काही विनोद चटकदार आहेत तर काही पोले आहेत. भोली ही हुशार आणि बेधडक आहे, पण एक प्रकारे यांत्रिक पद्धतीने असे वाटते. तिसऱ्या प्रयत्नात मृग, फुकरे ही मालिका पुढे नेण्यासाठी जोर लावतो, जे काही वेळा जबरदस्तीने केल्यासारखे दिसते, पण त्याची पात्र आपल्या कामगिरीसह ते सगळे तारुन नेतात. एकंदरीत, हे सगळे वाचून तुम्हाला, दहा वर्षांमध्ये एकाच मालिकेतील तीन चित्रपट देणाऱ्या लेखक - दिग्दर्शकाची प्रतिभा काय असेल हि कल्पना आली असेल. त्यामुळे या आठवड्यात, काही पाहायचे चुकले तरी हरकत नाही यावर तुमचे एकमत होत असेलच.


- हर्षदा वेदपाठक


#Fukrey #Fukrey3 #fukrey3review #RichaChadha #PulkitSamrat #VarunSharma #MrugdeepLamba

स्टार आता राहिले नाहीत - नाना पाटेकर

 आता कोणीच स्टार नाहीत - नाना पाटेकर

- हर्षदा वेदपाठक

बिनधास्त बोलणे यासाठी नाना पाटेकर प्रसिद्ध आहेत. एक टुकार चित्रपट  पाचशे कोटी कसे कमावू शकतो, कोरोना ने सगळ्यांना कसे बेहाल केले, जगायला मोजके पैसे लागतात मग अधिक काम का करायचे, भाषा, रंगभूमी, भारतीय शास्त्रज्ञ या सगळ्यांवर नाना सडेतोड उत्तर देतात.


क्वारंटाईनच्या काळात तुम्ही तुमचा वेळ कश्याप्रकारे घालवत होतात ?


मी संपूर्ण काळ माझ्या शेतातच रहात होतो . माझ्याकडे १४ एकर शेतजमीन आहे आणि त्याभोवती फिरायला मला सुमारे दोन तास लागतात. माझ्याकडे पाच कुत्रे, दोन गायी आणि दोन म्हशी आहेत. स्थानिक जातीचे ते कुत्रे इतके हिंस्त्र आहेत की, माझ्या परवानगीशिवाय शेतावर कोणीही येत नाही. त्यामुळे मी नेहमीच (हसून) क्वारंटाईनमध्ये होतो. महामारीच्या काळात माझ्या आयुष्यात काहीच बदलले नाही. मी शेतावर रहात असल्यामुळे बाहेरचे लोक मला भेटायला येऊ शकत नव्हते. नाम फाऊंडेशनच्या कामासाठी मी बिहारला जात होतो. जेंव्हा सुशांत सिंगने आत्महत्या केली, तेंव्हा मी त्याच्या वडीलांना जाऊन भेटलो. नंतर मी कोलकत्याला गेलो. मला सात ते आठ वेळा करोना झाला, मला एक दिवसासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागले, पण काही झाले नाही. मी फारशी काळजी केली नाही. कोरोना हा माझ्यासाठी, आगंतुक पाहुण्यासारखा होता आणि मी त्याला काही फारशी चांगली वागणूक दिली नाही. त्यामुळे तो आला तसा तो निघून गेला.

माझ्या मुलाने मला लसीकरण करुन घेण्यासाठी आग्रह केला. मला माझी प्रतिकारशक्ती तपासून पहायची होती, त्यामुळे मला लसीकरण करायचे नव्हते, पण माझ्या मुलाने काळजीपोटी खूप आग्रह धरला. कारण कितीतरी रुग्णांचे अंत्यसंस्कारही त्यांच्या कुटुंबियांपासून दूर करावे लागले होते.


तुमच्या प्रवासाकडे तुम्ही कसे पहाता, आता कॅमेऱ्यासमोर काम करत नसताना चुकल्यासारखे वाटते का?


हा प्रवास अतिशय समाधानकारक राहीला. मी काहीही गमावले नाही, माझ्या आयुष्यात दुःखाला जागा नाही. मला कशालाच मुकल्यासारखे वाटत नाही, ना कॅमेरा, ना काम...मी माझ्या गावातील शेतात आनंदी आहे. माझ्याकडे आता करण्यासाठी इतर अनेक गोष्टी आहेत आणि तिथे मी जास्त चांगले आयुष्य जगत आहे. मी माझ्या नाम फाऊंडेशनमध्ये व्यस्त आहे आणि केवळ महाराष्ट्रातच नाही, तर काश्मीर, गुवाहाटी आणि आता जयपूरमध्येही मी काम हाती घेतले आहे. आम्ही ते देशभर पसरवले आहे. मला एखादी पटकथा आवडली तर मी करतो, पण मला खूपच कमी ऑफर्स येतात. मी माझ्या स्वतःच्या अटींवर काम करतो, पहिली म्हणजे पटकथा उत्तम असली पाहिजे आणि दुसरी म्हणजे त्यांनी मला  घसघशीत मोबदला द्यायला हवा. मला चांगल्या झोपेची गरज असल्यामुळे मी आठ तासांच्या वर काम करणार नाही. मला चित्रिकरण सुरु होण्यापूर्वी त्यांनी बांधीव पटकथा दिली पाहिजे. बांधीव पटकथा नसल्यास मी काम करु शकणार नाही. असे चित्रपट करायला मी नकार देतो. काही लोक सेटवर पटकथा बदलतात, मला असे काम करायचे नाही. जर त्यांनी माझ्या अटी स्विकारल्या नाहीत, तर मी ते काम घेत नाही.


आता चित्रपट स्विकारण्यासाठी तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत?


मी दिग्दर्शकांना विचारतो की ते ही भूमिका घेऊन माझ्याकडे का आले आहेत. जर त्यांनी मला हे पटवून दिले, तर मी ते काम घेतो. द वॅक्सिन वॉर हा माझा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्या चित्रपटाबद्दल सांगायचे तर दिग्दर्शकाने मला सांगितले की, चित्रपटात एक संवाद आहे ज्यात म्हटले आहे, “भारत हे करु शकतो,” आणि जर तुम्ही ते आवेशाने म्हटलेत, तर लोक ते मान्य करतील. आणि फक्त तुम्हीच ते करु शकाल. तुम्ही जनतेला हे पटवून देऊ शकता. त्यामुळे मी तो चित्रपट स्विकारला.


असे लोक आहेत जे भारत हे करु शकत नाही असे म्हणू शकतात?


हो...असं म्हणतील असे बरेच लोक आहेत. ते परदेशातून निधी घेतात आणि त्यांच्या स्वतःच्या देशाविरुद्ध बोलतात. त्यानंतर ते म्हणतील की यातून आम्हाला प्रेरणा मिळाली. आता ते भारत या शब्दाविरुद्ध तक्रार करत आहेत. भारत हा शब्द प्रयोग नेहमीच येथे आहे. बाहेरचे लोक इंडीया म्हणतात, मग त्याच्याविरोधात वाद कशाला? मुंबईला पूर्वी नेहमीच बॉम्बे म्हटले जायचे कारण त्यांना ते नीट उच्चारता येत नसे.


तुमच्यासाठी मुंबई किती बदलली आहे? 


ही ती मुंबई नाही, जी बघत मी मोठा झालो. ती आता बदलली आहे. आजूबाजूला जंगल होते, लोकांमध्ये खूप प्रेम आणि आपुलकी होती. आपसात घरी शिवजलेले जेवण वाटून घेतले जायचे. आता लोक धर्म,जात आणि कितीतरी क्षुल्लक मुद्द्यांवर एकमेकांशी भांडताना दिसतात.


तुम्ही सेल्फ मेड आहात. आयुष्यभर खूप मेहनत घेतली आहे तुम्ही. आता अधिक चांगले आयुष्य जगण्यासाठी तुम्ही झटत नाही?


मी सध्या जगत असलेल्या आयुष्याबाबत मी समाधानी आहे. मला इतक्या जास्त कमाईची इच्छा नाही. आपण दिवस रात्र काम करणारे प्राणी आहोत. अगदी त्यांनाही विश्रांतीची गरज असते. मोठ्या घराचे मी काय करणार आहे? मला जेवढी गरज आहे, तेवढे माझ्याकडे आहे. जेंव्हा मी मरेन तेंव्हा हे सगळे बरोबर नेणार नाही. माझे पैसै काही निर्मात्यांकडे आहेत, ज्या दिवशी त्यांना चित्रपट बनवायचा असतो, तेव्हा ते मला पैसे देतात, त्याने सुखात आयुष्य सुरू आहे. 


तुमच्या अभिनयाला अनेक लोकं पसंद करतात. तुमच्या अभिनयाची पद्धत काय आहे?


प्रत्येक कलाकारची, अभिनयाची स्वतःची एक पद्धत असते. कलाकारनुरुप त्यांची अभिनय पद्धती असते. असंही होऊ शकते की, खेडेगावातील एक तरुण ज्याला चांगला अनुभव आहे, एक चांगला अभिनेता होऊ शकतो. तो त्याची वाक्ये लक्षात ठेवू शकतो. त्याचे सुख-दुःखाचे अनुभव त्याला अधिक चांगला अभिनेता बनवू शकतात. प्रत्येकाचा जीवनाचा अनुभव वेगळा असतो. गरीबाचा अनुभव वेगळा असतो, तर श्रीमंताचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. माझे म्हणाल तर मी पाहिली डिटेल पटकथा मागतो, ती अनेकदा वाचतो. त्यातील सगळे बारकावे मनात, मेंदूत साठवतो. आणि त्या बरोबर समरस झाल्यावर, दृश्य देताना मला सोपे जाते. मी कधीच ग्लिसरीन वापरत नाही, नैसर्गिकरीत्या भावनिक दृश्य देतो.


द वॅक्सिन वॉर हा तुमचा ऐशीवा चित्रपट आहे. तुम्ही तुमचे जुने चित्रपट पहाता का?


द वॅक्सिन वॉर  हा माझा ऐशीवा चित्रपट आहे का ते मला माहीत नाही. माझे चित्रपट मी कधीच पहात नाही. कारण एकदा चित्रपट पूर्ण केला की माझ्यासाठी नविन सुरुवात गरजेची असते. त्यामुळे मला त्यापासून लांब जाणे गरजेचे असते. नवी सुरुवात करण्यासाठी तुम्हाला ते, जुने जाऊ द्यावे लागते.


द वॅक्सिन वॉर हा चित्रपट का स्विकारला?


हा चित्रपट आपण शोधलेल्या लसीबद्दल आहे. डॉ. भगवान भार्गव यांच्या अनुभवावर तो आधारीत आहे. मी त्यांना भेटलो नाही कारण मला एक नवा अनुभव हवा होता आणि मला त्यांच्यावर अभ्यास करण्यासाठी फारसा वेळ नव्हता. ते कसे चालतात, काम करतात आणि बोलतात, ते मी पाहिले नाही. त्यांना मी चित्रपट पूर्ण झाल्यावरच भेटलो. मी एक अभिनेता म्हणून दिग्दर्शकाच्या दृष्टीला शरण जातो. डॉक्टर ही भूमिका पाहून खूष होते, ते प्रत्यक्षात जसे आहेत त्याच्याशी खूप साधर्म्य सांगणारी ही भूमिका होती. ही भूमिका साकारायला सोपी होती. अभिनय हा क्रिकेटसारखा आहे. तुम्ही खेळता कारण तुम्हाला खेळण्यात आनंद मिळतो, यासाठी नाही की तुम्हाला जिंकायचे असते. काही वेळा असे काम होते, काही वेळा होत नाही. जेंव्हा मी मराठी रंगभूमीवर काम केले, तेंव्हा आम्ही त्याला आमची कसोटी म्हणायचो. आम्ही कधीही त्याला शो म्हटले नाही. आम्ही त्याला कसोटी म्हणतो, कारण आम्ही अभिनय करत असतो. आम्हाला दररोज स्वतःला सिद्ध करावे लागते. चित्रपटामध्ये आम्हाला दर आठवड्याला स्वतःला सिद्ध करावं लागतं. आता कोणीही स्टार्स नाहीत, आमच्या काळात देव आनंद, दिलीप कुमार आणि राज कपूर हे स्टार्स होते.


शास्त्रज्ञांना पुरेसा आदर दिला जात नाही, असं तुम्हाला वाटतं का?


माणूस म्हणून आपण लोकांचे आभार मानायला विसरतो. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने इतका सुंदर चित्रपट बनवला आहे. आदराचे प्रतीक म्हणून अशा प्रकारचे चित्रपट तयार करायला पाहिजेत. आपले शास्त्रज्ञ असाधरण आहेत आणि त्यांनी अनेक, किंमती औषधे बनवली आहेत, ज्यामुळे मानवजातीला फायदा झाला. आपण अनेक गरीब देशांना मदत केली. डब्ल्युएचओनी सुद्धा आपल्याला अमूल्य अशी लस बनवण्याचे श्रेय दिले आहे.


आजकाल बरेच जण हिंदी चित्रपट तयार करताना इंग्रजी भाषेत पटकथा लिहितात. तुम्ही भाषेला किती महत्व देता?


हो, मी अशा पटकथा स्वीकारत नाही. मी देवनागरी भाषेतील पटकथेसाठी आग्रही असतो. मी इंग्रजी भाषेत संवाद साधू शकतो, पण मी इंग्रजी वाचत नाही. एक अशी अभिनेत्री होती, जी इंग्रजीत लिहायची आणि तिचे उच्चार चुकीचे असायचे. आपण एकमेव असा देश आहोत, जिथे आपल्याकडे विविध संस्कृती आणि भाषा आहेत. हिंदी सुद्धा आपली एक भाषा आहे. माझ्या मते माणूस जिथे कुठे जातो, तेथील भाषा त्याने शिकलीच पाहीजे. मला लोकांमध्ये त्यांच्या भाषेवरुन फूट पाडणारा मुद्दा आवडत नाही. जेंव्हा मी कर्नाटकमध्ये जतो, तेंव्हा मी त्यांच्याशी मला जी काही कन्नड येते, त्यात संवाद साधतो. मी थोडीशी तुलु आणि पंजाबीही बोलतो. मी जिथे कुठे जातो, तिथे स्थानिक भाषा आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. तेथील लोकांना ते फार आवडते. सुरुवातीला जेंव्हा मी हिंदी शिकलो तेंव्हा बोलताना मी चाचरत असे. पण आता अनेक भाषा येतात मला.


तुम्ही मराठी रंगभूमी पूर्णपणे सोडून दिली आहे का?


पुर्वी नाटक करताना, आम्ही दिवस रात्र काम करायचो. पण यापुढे मी असे काम करु शकत नाही. रंगमंच संदर्भात मी रोज लोकांशी बोलतो. आणि आता मी ७३ वर्षांचा आहे. पूर्वी आम्ही सकाळी ९ वाजता तालीम सुरु करायचो आणि ६ वाजता संपवायचो. ती रात्रभर लांबायची आणि हे असेच चाळीस दिवस चालायचे. आता ते वयोमानाप्रमाणे होवू शकत नाही 


अभिनयक्षेत्रात तुम्हाला मित्र आहेत का?


हो, ऋषी कपूर, डॅनी, अनिल कपूर आणि मिथुन. ऋषी खुपच चांगला माणूस होता. तो घरी यायचा. एकदा तो त्याचे ड्रींक घेऊन आला होता आणि मी खीमा पाव बनवला होता. अनेकांना माहीत नाही, पण मी उत्तम जेवण बनवतो. पन्नास लोकांचे जेवण सहज करू शकतो. नीतू सिंग आली नव्हती, म्हणून मी त्याला आत येऊ नकोस असे सांगितले. तिला फोन केला आणि सांगितले की मी तिच्या घरी कधीच पाऊल ठेवणार नाही. ते ऐकल्यावर ती लगेच आली आणि त्यांनी खीमा पाव खाल्ला. सुरवातीला नको नको करत होता. त्याला खाण्याचे फार आवडायचे. त्याने खूप खाल्ले. अतिशय छान, जिंदादील माणूस होता. ज्याला मी खूप कमी भेटलो, पण तो खूप चांगला मित्र होता. मला आता त्याची आठवण येते.


तुम्ही निर्माता हि आहात. चित्रपटाची निर्मिती कधी करणार आहात?


मी हिंदीत चित्रपट तयार करणार आहे. आणि तो ओटीटीवर प्रदर्शित करणार आहे. चांगले चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत. माझ्याकडे एक अप्रतिम पटकथा आहे. बघूया ते कधी प्रत्यक्षात येते ते!!!


सगळीकडे, आत्मचरित्र लिहायची लाट दिसून येत आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यावर पुस्तक लिहीताना दिसणार आहात काय?


नाही, मला काहीही लिहायचे नाही. ज्या दिवशी मी मरेन त्यावेळी मी कोणालाही आठवणार नाही. जिवंतपणी मला खूप प्रेम आणि कौतुक मिळाले आहे. तुम्ही निघून गेल्यावर कोणालाच तुमची पर्वा नसते.


तुमच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगा ना..


माझ्याकडे खूप चांगल्या भमिकांसाठी विचारणा होत आहे. त्यापैकी एक मराठी चित्रपट मी केला आहे. त्याचे नाव आहे, द कन्फेशन. अनंत महादेवन दिग्दर्शित हा चित्रपट सोशल थ्रिलर आहे. वास्तवदर्शी कथानक आहे ते. यावर्षी माझे ओटीटी पदार्पण होणार आहे. प्रकाश झा यांची ऐक मालिका आहे, लाल बत्ती. त्यात ऐका महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये आहे मी. ती मालिका राजकीय थ्रिलर आहे.


- हर्षदा वेदपाठक

(हि मुलाखत मराठी सामना मध्ये छापून आली आहे. त्यात जागेअभावी मुलाखत एडिट केली गेली आहे. त्यामुळे येथे पूर्ण मुलाखत दिली आहे)

#नानापाटेकर #nanapatekar #thevaccinewar #nanapatekarinterview #nanapatekarbiography #मुलाखत