Tuesday 26 April 2016

INTERVIEW with Meera Chopa on 1920 Landon



यापुढे भुतांवर आधारीत चित्रपटांमध्ये काम करणार नाही - मीरा चोपडा

हर्षदा वेदपाठक

1920 लंडन या चित्रपटाचा तिसरा भाग येत आहे. पहिल्या दोन भागांच्या तुलनेत वेगळी स्टारकास्ट हि या चित्रपटाची खासीयत आहे. तसेच पहिल्यांदाच या चित्रपटाच्या सिरीजचे चित्रीकरण लंडन येथे झालय. यासह मीरा चोपडा, हि चोपडा घराण्यातली आणखीन एक कन्या हिंदीत दुसरयांदा काम करतेय. ते देखिल व्हाया साउथ. हे सगळं जाणुन घेण्याचा प्रयत्न केलाय.

तुझा हा दुसराच हिंदी चित्रपट, मग सरळ हिंदीमध्ये काम करण्यापेक्षा तु दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करावयास का सुरवात केलीस ?

मी एनडीटिव्हीमध्ये नोकरीस होते त्यादरम्यान मैत्रीण म्हणाली, तुझा चेहरा चांगला आहे मॉडलिग का नाही करत. म्हणुन मी वृत्तपत्र जाहीरातींपासुन सुरवात केली. माझी अशीच एक जाहीरात पाहुन 2007 साली मला एका दाक्षिणात्य निर्मात्यानं काम करण्यासाठी विचारले. त्या चित्रपटाला ऐ. आर. रहमान यांचे संगीत होते. तो चित्रपट तुफान चालला, मग ऐकामागोमाग ऐक असे चित्रपट मिळत गेलेत. आणि मी मागे वळुन पाहिलं नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे मला कॅमेरासमोर रहायला आवडते.

तु तिसऐक दाक्षिणात्य चित्रपटात काम केलं आहेस. आता हिंदीत काम करु लागली आहेस, काय सांगशिल या दोन्हीतला फरक ?

हिंदी माझी मातृभाषा असल्यानं मला येथे घरच्यासारखे वाटते. तर दाक्षिणेत मला उपर वाटत होतं. कितीही झालं तरी तेथे मी आउटसायडरच राहणार. पुर्वी लोकं म्हणायचेत की दाक्षिणेत खुप प्रोफेशनलिझम आहे म्हणुन, पण आता तसे काही राहिले नाही. कारण हिंदित आता खुप टापटिपपणा दिसु लागला आहे.

चित्रपटाचे शिर्षक तुला आवडते की कथानक, कारण तुझा दुसरा चित्रपटात देखिल भुत या विषयावरच आधारीत आहे म्हणुन ?

गॅंग ऑफ घोस्ट हा माझा पहिला हिंदी चित्रपट होता. तो विनोदी प्रकारचा चित्रपच होता. तर 1920 लंडन हा चित्रपच हॉरर आहे. जे चित्रपट मिळत गेलेत ते मी करत गेले. मात्र यापुढे अश्याप्रकारचे चित्रपट करणार नाही.

गॅंग ऑफ घोस्टमध्ये देखिल तु श्रमनबरोबर काम केलं आहेस ना ?

होय. परंतु तेव्हा आमची एकत्रीत दृष्य नव्हतीत. त्या चित्रपटापासुन मी त्याला ओळखते. तो सिरीयस आणि उत्तम अभिनेता आहे.

प्रियांका, परिणीती आणि आता तु, चोपडा आडनाव हे आता ब्रॅन्ड बनु लागलं आहे ?

प्रियांकाची कारकीर्द हि आम्हा सगळ्यांसाठी एक आदर्श उदाहरण आहे. मी तर तिच्याकडे एक आदर्श म्हणुनच पाहते. माझ्यासाठी ती पाथब्रेकर आहे.

1920 लंडन या चित्रपटानंतर तु काय करत आहेस ?

विरपन्न या चित्रपटानंतर राम गोपाल वर्मा, प्यार तुने क्या किया या चित्रपटावर आधारीत ऐक चित्रपट तयार करीत आहेत, त्यात माझी मध्यवर्ती भुमिका आहे.

No comments:

Post a Comment