Sunday 10 April 2016

I want to be impalssive while selecting films - Arjun Kapoor



इम्पलसिव्ह विचारसरणी तशीच ठेवुन इतर विचार करु नये - अर्जुन कपुर

-      हर्षदा वेदपाठक

आर. बालकी दिग्दर्शित कि ऐन्ड का या चित्रपटाला सर्वस्तरावर पसंद केलं जात आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाला तुफान यश मिळालं. दोन आठवडयात, कि ऐन्ड का ने बॉक्स ऑफीसवर 42.45 करोड रुपयांचा गल्ला जमा केलाय. या यशावर चित्रपटाची टिम खुश नसल्यास नवल. एकंदरीत चित्रपटाचं यश आणि वाटचाल याबद्दल, अर्जुन कपुर बरोबर केलेली बातचित...

कि ऐन्ड का या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर बरयापैकी यश मिळवलय, काय सांगशिल त्याबद्दल ? 
तो चित्रपट लोकांना आवडला त्याबद्दल मी समाधानी आहे. मी नेहमीच अश्या भुमिका करत गेलोय ज्या माझ्या इमेजच्या विपरीत असतील. त्यात इश्कज्यादे, टु स्टेटस आणि आता कि ऐन्ड का चित्रपटाचं नाव घेता येईल. इश्कज्यादेच्या दरम्यान मला अऩेकांनी सांगीतले की, ती भुमिका ग्रे शेडमध्ये आहे. त्यामुळे स्विकारु नये. जेणेकरुन माझी कारकीर्द सुरु व्हायच्या आधीच संपुन जाईल. तसच काहीसं कि ऐन्ड का हा चित्रपट न स्विकारण्याचा मला अनेकांनी सल्ला दिला, मात्र बालकी यांनी मला जेव्हा या चित्रपटाचे कथानक, दोन ओळीत ऐकवले तेव्हाच मी हा चित्रपट करायचे ठरवले. माझ्या इन्टींक्टवर स्विकारलेले सगळेच चित्रपट चालले आहेत. अश्या वेगळ्या चित्रपटांसाठी वेगळी मेहनत करावी लागते खरी. मग ती तर सगळ्याच भुमिकांसाठी करावी लागते. मला वाटतं यालाच काय ते भुमिकेला रंग भरणं असं म्हणत असावेत.  

तु चित्रपटांची निवड कश्याप्रकारे करतोस ?
जेव्हा चित्रपटाची कथा ऐैकतो तेव्हाच अगदी उत्सफुतरीत्या आणि तात्विकरीत्या ठरवतो तो चित्रपट करायचा कि नाही ते. मग त्यात सोशल मॅसेज आहे की नाही, वेगळेपणा हे मुद्दे गौण ठरतात. कारण सरते शेवटी तो त्या चित्रपटाचा अंन्डरकरंन्ट असतो, सोशल मॅसेजकडे पाहुन मला नाही वाटत कोणी चित्रपट स्विकारतो म्हणुन. चित्रपट पहिल्या नंतर कोणी त्याद्वारे काही संदेश घेतला तर एक कलाकार म्हणुन मला समाधान मिळते. कि ऐन्ड का हा चित्रपट मी जेव्हा स्विकारला तेव्हा तो प्रयोगात्मक आहे वगैरे या गोष्टीचा कधीच विचार केला नव्हता. मात्र चित्रपटाला मिळणारया यशाने मला अऩेकांनी अरे वेगळा विषय आहे असे कळवले.

मग ?
कि ऐन्ड का हा चित्रपट स्विकारला तोच मुळात, कथेतील वेगळेपणामुळे. तसेच ते कथानक मला विनोदी जाणवलं म्हणुन स्विकारला. अनेकांनी मग तो प्रयत्न रिस्की असेल हे सांगीतले. मात्र या चित्रपटामुळे माझ्या करियरची दिशा बदलेल असं काही मला वाटले नाही. ऐक आगळी संकल्पना म्हणुन मी तो चित्रपट स्विकारला. मला सुध्दा घर संभाळणारया मुलाला भेटायला आवडेल. आणि मुलगी ऑफीस संभाळते हि गोष्ट मला ऐैकायला आवडली. असे कथानक असलेल्या गोष्टीला पडदयावर दाखवायची संधी मिळतेय का नको घेऊ मी. म्हणुन तो चित्रपट स्विकारला. ऐखादे कथानक ऐकल्यावर दुसरया दिवशी शुटींगला जावेसे वाटते किंवा मनात जाऊ कि नको असा विचार येतोय तेथेच तुम्ही उत्सफुर्तता घालवुन बसता.

जेव्हा पहिल्यांदा तुला कळले की, करीना कपुर तुझी सहअभिनेत्री असणार आहे तेव्हा तुझी पहिली रिऐक्शन काय झाली ?
करीना ऐक उत्तम अभिनेत्री आहे हे आपण सगळेच जाणतो. का आणि किसाठी कलाकार निवडीमध्ये पहिली निवड हि माझी झाली. आणि आर. बालकी यांच्या मनात अभिनेत्री म्हणुन पहले नाव करिनाचेच होते. ऐक कलाकार म्हणुन मी थोडा स्वार्थी आहे आणि त्यामुळे कंन्डेट काय असेल याचा  विचार मी केला. कारण ऐका नाजुक दिसणारया मुलीची पुरुषांच्या दुनियेतील भुमिका होती. तिच्या चेहरयावर भारतीयता आणि मार्दव आहे. तर जी सर्वसाधारण कामं मुली करतात ते पुरुषी वेशातल्या, अगदी दाढीवाल्या मुलाने करावे म्हणुन माझी निवड झाली. मला माहीत आहे की, करीना माझा चाईल्डहुड क्रश आहे आणि तुम्ही माझी रिऐक्शन जाणुन घेऊ इच्छीता हे ही मी जाणतो. पण मी तिला आधीपासुन ओळखायचो आणि तेव्हापासुन ते आतापर्यत तिच्यामध्ये अजिबात बदल झालेला नाही. ती स्वताला किंवा आयुष्याला अजिबात सिरीयस घेत नाही. आमच्या सेटवर देखिल ऐकदम खेळीमेळीचं वातावरण होतं. अनेक सिन देताना ती ऐक उत्तम सहअभिनेत्री असल्याचे मला जाणवले कारण ती सहकलाकाराला अजिबता त्रास देत नाही. खरं तर तिच्याबरोबर काम करुन मला समाधान वाटते. आणि तुम्ही आता चित्रपट देखिल पाहिला आहेच, त्यामुळे आमच्या मधिल कम्फर्ट तुम्हाला नक्कीच भावला असेल. त्यात तुम्हाला आमच्यामधिल वयाचं असलेलं अंतर किंवा करिनाची सिनीयॉरीटी अजिबात जाणवली नसेल. मला वाटतं त्यामागे आमची दोस्ती आणि सहजता हि कारणं आहेत. आणि चित्रपटात आम्ही जेथे लग्न झालेलं जोडपं आहोत तेथे आणच्यात सहजता असणे हि भुमिकेची गरजच होती. आणि त्यामुळेच एकाही दष्यात आम्हाला अवघडल्यासारखे वाटले नाही हे विशेष. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे, बालकी यांना देखिल आमच्याकडुन काम करवुन घेताना मजा आली.

चित्रपटभर तु, करीनाला किस केलं आहेस हि देखिल बातमीच होती ?
माझ्या प्रत्येक चित्रपटात मी माझ्या सहकलाकाराला किस केलं आहे. तेव्हा कि ऐन्ड काच्या कथानकानुसार मी तिला किस केलं, वॉट अ बिग डील इन दॅट. पण खरं सांगु सेटवर किस करणं हा फक्त मॅकेनिकल प्रकार असतो, कारण तेथे अनेक जणं असतात. तुम्हाला कथानकानुसार दोन जिव प्रेमात आहेत हे दाखवायचे आहे. करीना माझी चाईल्डहुड क्रश आहे हे मी मिडीयाला का सांगितलं असं मला आता वाटु लागलं आहे. लेखक दिग्दर्शकाने जे लिहीलय त्यानुसार ते आम्हा दोघांनाही माहीत होतं. मग त्यावर निर्णय घेणं हे कलाकारावर अवलंबुन होतं. मग त्या निर्णयावर आपलं मत किंवा विचार लादणारा मी कोण. मी फक्त जेवणं कसं बनवायचं ते शिकण्यात मग्न होतो.

कि ऐन्ड का प्रदर्शित होण्यापुवी जेव्हा त्याचे प्रोमो प्रदशित झाले त्यापुर्वी, चंदेरी पडदयावर वयाने मोठे अभिनेता आणि त्याच्या तुलनेत वयाने फार लहान अभिनेत्री अशीच जोडी दिसत होती. मात्र या प्रोमोनंतर अर्जुन कपुर वयाने मोठ्या असलेल्या अभिनेत्रीबरोबर काम करत आहे. किंवा करीना कपुर वयाने लहान असलेल्या कलाकाराबरोबर काम करत या मुद्यांना अधिक वाव मिळत आहे असं तुला वाटतं का ?
म्हातारं-तरुण, तरुण-म्हातारं मला वाटतं हा एक उगाचचा विषय आहे. आम्ही कालाकार आहोत त्यामुळे चित्रपटात कोणाची निवड होते ते भुमिका, चित्रपटाचा विषय यावर आधारीत असते. आणि जर का याला कोणी ट्न्ड म्हणत असेल तर तो आता बदलला आहे असं म्हणायाला पाहिजे कारण, मी प्रियांका चोपडा बरोबर एक चित्रपट केलाय. तर रणवीर सिंग ने तिच्याबरोबर तिन चित्रपट केलेत. कॅतरीनाने रणबीर कपुर आणि आदित्य रॉय कपुर बरोबर काम केलं आहे त्यामुळे आता हा ट्न्ड बदलला आहे असं म्हणायला हरकत नाही. आता मात्र हाच ट्न्ड सुरु रहावा असं मी म्हणणार नाही. तर प्रत्येक प्रकारचे चित्रपट यावेत असं मला वाटतं. पडदयावर जर नविनता यायला पाहिजे असेल तर विवीध प्रकारच्या जोडया जुळल्या पाहिजेत नाहीतर तेच चार चेहरे आणि त्याच चार जोड्या हे बदललं गेलं पाहिजे. माझ्या वयाचे कलाकार म्हणाल तर आलीया, परिणीती आणि अनुष्का खेरीज इतर अभिनेत्री या माझ्यापेशा वयाने मोठ्याच आहेत. बघाना नाहीतर तुम्ही आणि प्रेक्षक दोघेही कंटाळतील.

आपल्या प्रत्येक चित्रपटाद्वारे वेगळा विषय, अनोखी स्टारकास्ट देण्यासाठी दिग्दर्शक आर. बालकी प्रसिध्द आहेत. त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा राहीला ?
बालकी यांच्याबरोबर काम करणं म्हणजे एक पर्वणी आहे यावर दुमत नाही. कारण सेटवर पण ते नाविन्यतेच्या शोधात असतात. त्यांना नियमातला अभिनय करुन दाखवला तर ते स्विकारायचे नाहीत. वेगळेपणा दिला तर ते दृष्य लगेचच ओके करत. अगदी सहज, हसतखेळत ते कलाकारांकडुन काम करवुन घेतात.

तुझी कारकीर्द तशी नविनच आहे तरी तु तुझ्या प्रत्येक चित्रपटात वेगळेपणा देतोस आणि रिस्क घेताना दिसतोस ?
मी जर ऐकाच धाटणीचे चित्रपट केलेत तर तुम्ही पण तेचतेच प्रश्न विचाराल (हसतो). विवीधता दिली तर त्यात सगळ्यांचा फायदा आहे ना. पण तुम्हाला खरं सांगु का मी जेव्हा चित्रपट स्विकारतो तेव्हा या सगळ्या वेगळेपणाचा अजिबात विचार नाही करत. सुरवात चांगली झाली. चांगल्या भुमिकांसाठी विचारणा होऊ लागली आणि मी म्हटलं चला अभिनय कारकीर्दीची सुरवात तर करुया. तेव्हा माझे करीयर कोणत्या दिशेला जाईल हे मला ठावुक नव्हते. टु स्टेटस, गुंडे हे चित्रपट चांगला व्यावसाय करतील ते मला ठावुक नव्हते. कथानक व सेटअप आवडला आणि मी चित्रपट स्विकारला बस इतकच. मागे वळुन पाहताना जाणवतं, ओ...फारच वेगळेपणा दिला आपण....आणि टिकलो पण. हि सगळी विवीधता देताना मी वाढलो, समृध्द झालो ते मला माझे जुने चित्रपट पाहताना जाणवतं. त्यामुळे मी माझी इम्पलसिव्ह विचारसरणी तशीच ठेवुन इतर विचार करु नये असं मी ठरवलय.
माझी कोणतीही इमेज नाही त्यामुळे मला साच्यात काम करण्याची गरज नाही. आमची जनरेशन प्रयोगशील आहे, आव्हानाला पेलते त्यामुळे तुम्हाला नविन कलाकारांचा वेगळेपणा पाहता येईल. परंतु मला वाटतं शाहरुख खान, सलमान खान सगळेच वेगळेपणा देत आहेत. आम्ही त्यांनाच फॉलो करीत आहोत. अनिल काकांचेच पहा ना, इश्वर, राम लखन, परिंदा. तेजाब या सारखे चित्रपट केलेत त्यांनी. अमिताभ बच्चन यांनी सिलसीला, काला पत्थर केलेत, हि परंपरा अनेक वर्ष सुरु आहे. पण कसं आहे की व्यावसायिक चित्रपटात वेगळेपणा असला आणि तो चित्रपट चालला तर ते सगळ्यांचाच लक्षात राहते. मात्र आता हे सगळे मुद्दे तुमच्या लक्षात येत आहेत कारण आमची पिढी खुप प्रयोगशील आहेत. त्यात वरुणचा बदलापुर, मी केलेला फायडींग फेनी, रणबीर कपुरचा बर्फी या चित्रपटांची नावे घेता येतील. आता हे चित्रपट तुम्हाला वेगळेपणा देतात. चित्रपटात मुक्या बहिरयाची भुमिका निभावणे वास्तविक फार कठीण गोष्ट आहे. फरहान अख्तरचा भाग मिल् भाग साठीची मेहनत पहा. किंवा शाहीदने कमीनेसाठी केलेली मेहनत कोण बरं विसरेल. रणवीरचेच पहा ना, केशवपन करुन दिड वर्ष बसणे सोपे नव्हे. बाजीराव मस्तानी सारखा चित्रपट त्याच्या वयाच्या आणि अनुभवाच्या मानाने खुप मोठी जोखीम होती, ती त्याने घेतली. आणि हे सगळे चित्रपट चाललेत जेणे करुन नविन कलाकारांना वेगळेपणा देत राहण्याचे प्रोत्साहन मिळत राहील. वेगळ्या भमिका केल्याने कलाकार म्हणुन त्यांना मान मिळतोय हे देखिल त्यांच्या लक्षात आलय.

अनिल कपुर यांच्याबरोबर काही काम करत आहेस काय ?
अजुनतरी तसं काही ठरलेलं ऩाहीय

तुझे आगामी चित्रपट कोणते ?
हाफ गर्लफ्रेन्ड या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मे मध्ये सुरवात होईल. मोहीत सुरी दिग्दर्शित या चित्रपटात श्रध्दा कपुरची प्रमुख भुमिका आहे. मला प्रत्येक नविन जुन्या दिग्दर्शक, कलाकाराबरोबर काम करायचे आहे पाहुया काय होतं ते पुढे.



No comments:

Post a Comment