Thursday 17 November 2016

Drama Review - Chalti Ka Naam Gaadi


नाटय परिक्षण - क्लासिक चलती नाम गाडीचे खिळवणारे नाटयरुपांतर 

 -    ​हर्षदा वेदपाठक


1958 साली प्रदर्शित झालेला चलती का नाम गाडी हा चित्रपट आजदेखिल सर्व वयोगटामधिल प्रेक्षकांच्या  लक्षात असेल. बॉक्स ऑफीसवर तुफान चाललेल्या या चित्रपटाच्या यशाचे श्रेय, अशोक कुमार, किशोर कुमार आणि अनुप कुमार या गांगु्र्ली बंधुंचा अभिनय, मधुबालाची दिलखेच अदा आणि सचिन देव बर्मन यांची क्षवणीय गाणी यांना प्रामुख्याने दयावे लागते. या चित्रपटानॆ पन्नास वर्षापुर्वी तुफान व्यावसाय केला होता आणि यशस्वी चित्रपटांच्या यादीत त्याचे नाव घेतले जात असे. अश्या या क्लासिक चित्रपटाचे नाटय रुपांतर करण्यात आले असुन त्यामध्ये मुळ संकल्पना आणि अभिजातपणा यालाच कोठेच धक्का न लावता, पुन्हा एकवार त्या जादुई क्षणाला जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.  
ब्रीजमोहन, जगमोहन आणि मनमोहन या तिन भावांची हि कथा आहे. प्रेमात आलेल्या वाईट अनुभवामुळे, ब्रीजमोहन आपल्या दोन्ही भावांना मुलींपासुन लांब रहायचा सल्ला देत असतो. रेणुची गाडी बंद पडल्यामुळे तिला मन्नुच्या गॅरेजमध्ये यावे लागते. गाडी सुरु झाल्यावर ती पैसे न देताच निघुन जाते....आणि कथानकाला एक वेगळेच वळण लागते. पुढे तिन्ही भावांच्या जिवनात त्यांच्या सहचारीणीचा प्रवेश होतो. आणि तिन्ही मोहन बंधुची गाडी चलती होऊन जाते हे मुळ कथानक येथे पहायला मिळते. गोविंन्द मुनीया आणि रमेश पंत यांनी लिहिलेल्या मुळ कथानकाला, आधुनिकतेची झालर, संर्दभ देत लेखक अशोक मिश्रा यांनी  चलती का नाम गाडी या नाट्याचे पुर्नलेखन केले आहे.
पन्नास वर्षापुर्वीच्या या कथानकात अनेक नविन संर्दभ जोडताना, त्यात याच आठवडयात आलेल्या नविन चलनी नोटांच्या उल्लेखासह स्वच्छ भारत अभियान, शाळेजवळ अमली पदार्थ विकु नये हे सामाजिक विषय आढळतात. तर पाच रुपये बारा आऩा... हे गाणे आता पाचसो रुपया बारा आना या सुधारीत शब्दांसह ऐकु येतं. पुढे तर करण जोहर या (गाजलेल्या दिग्दर्शकाचा) माणसाचा खुन झाल्याचा संदर्भ देऊन लेखक प्रेक्षकांना जोडुन ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतो.  
घडणारया कथानकाला, माध्यमाचे बंधन राहु नये म्हणुन दोन दृष्यामधिल संधता, रंगमंचावर असलेल्या पडदयावर व्हिडीयो दाखवुन पुर्ण करण्याची कल्पकता दिग्दर्शक चित्तरंजन त्रीपाठी  यांनी दाखवली आहे. खरं पाहता इंन्टरकट म्हणुन नाटय आणि व्हिडीयोची खुबीने दिलेली जोड नाटयाच्या जिवंतपणात अजुनच भर घालते. स्थल आणि काल यांची दुरी मिटवण्यासाठी  या व्हिडीयोचा खुबीने वापर केलेला दिसुन येतो. रेणुची गाडी बंद पडलेली असते, ती मन्नुला गाडी बघुन घ्यायला म्हणुन सांगते...या संवादानंतर ते दोघे रंगमंचावरुन बाहेर पडतात आणि लगेचच पडदयावर त्या दोघांचा गाडी तपासतानाचा व्हिडीयो सुरु होतो. याच प्रकारे, चित्रपटातील अनेक दृष्ये, जी रंगमंचावर सादर होऊ शकत नाहीत त्यांना व्हिडीयोवर चित्रीत करुन दाखवल्याने, चलती का नाम गाडी हे नाटय खुपच रंजक ठरते. चित्रपटात खलनायकाची भुमिका के. एन. सिंग आणि सज्जन यांनी केली होती. या दोन्ही भुमिका चित्रपटात आगाऊ  आणि लाउड नव्हत्यात, नाटकात मात्र प्राकी या खलनायकाची भुमिका हि खुपच आरडाओरड, आक्रास्तळपणा करणारी आहे. जेणेकरुन पुर्वाधातपर्यंत खिऴवुन ठेवणारया चलती का नाम गाडी या नाटकाचा उत्तरार्ध मात्र मिठाचा खडा पडल्याप्रमाणे खट्टु होतो.

कलाकारांत सगळेच कलाकार नवखे असुन, शाळा ते कॉलेजमध्ये शिकणारया या नवकलाकारांचा नवखा अभिनय स्तुतीपु्र्ण आहे. त्यांना अभिनयाचे अंग नसताना त्यांच्याकडुन वर्कशॉपमध्ये घडवले गेल्याची यकिंचीतही कल्पना येत नाही.
चलती का नाम गाडी या चित्रपटाची खासीयत हि गाणी होतीच, सचिन देव बर्मन यांनी दिलेल्या चालींना आधुनिकतेची गुंफण देत संगीतकार अमोद भट्ट यांनी संगीताची पुर्नरचना केली आहे. त्या गाण्यांना शान आणि नीती मोहन यांनी नटखट अंदाजामध्ये सादर केले आहे. तर त्या ठेका धरायला लावणारया गाण्यांसाठी नॉर्डन शेर्पा यांनी आधुनिक नृत्य रचना बसवली आहे. दिसायला रंजक आणि उत्कंठा वाढवणारया गाण्यांसाठी हमखास टाळी मारुन शाबाशी न वाटल्यास नवल.   
समाजिक, आधुनिक अडॅप्टेशनसह चलती का नाम गाडी या नाटकाला लिहीण्यात आले आहे, तेथेच एक विषय म्हणुन हे नाटक वेगळेपणा देते. चित्रपटाचे माध्यमांतर केल्यावर सादरीकरणात नाटक खिळवुन ठेवण्यास समर्थ ठरते. या दोन्ही मुदयांमुळे चलती का नाम गाडी या नाटकाला यश आणि प्रेक्षकांची पसंती लाभण्यास काहीच अडथळा येणार नाही हे स्पष्ट दिसुन येत आहे. आर्थिक स्तरावर कमकुवत असलेल्या बालकांना शिक्षण   तसेच रोजगारी संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी म्हणुन सलाम बॉम्बे हि संस्था कार्यरत आहे. त्याच संस्थेने अश्या मुलांना शोधुन त्यांना अभिनयाचे, नृत्याचे प्रशिक्षण देऊन, चलती का नाम गाडी या नाटकाची घडी बसवली आहे. या नाटकाद्वारे  मिळणारया पैश्यातुन पुन्हा बालकांसाठी भरीव कार्य करता येणार असल्याची माहिती संस्थेचे आयोजक देतात. जुनंपण टिकुन राहील आणि नाविन्याची उत्तम सांगड चलती का नाम गाडी या नाटकात पाहता येणार आहे. ज्यांनी चलती का नाम गाडी या चित्रपटाला पाहिले असेल त्यांनी त्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पहावे. ज्या नविन पिढीने, चित्रपट पाहिला नसेल त्यांनी चलती का नाम गाडी हि जादु तरी काय ते जाणुन घेण्यासाठी तरी या संयोगाला ऐकदा पहायला हरकत नसावी....
 

No comments:

Post a Comment