Tuesday 22 November 2016

47th IFFI


47वा इफ्फी

विवीध देशातील चित्रपटांत स्विडन देशाचा अ सिरीयस गेम हा चित्रपट पाहता आला. ऐकमेकांच्या प्रेमात असुनही दोन वेगवेगळ सोबती निवडणारे दोन जिवांची काहाणी या चित्रपटात आहे. पीमीला ऑगस्ट दिग्दर्शित या चित्रपटात, लग्न करुन ते दोन जिव एकमेकांना विसरु शकत नाहीत आणि याचमुळे दोघांनाही आपल्या वैवाहीक आयुष्यात आपल्या  जोडीदारांबरोबर दगाबाजी करतात. मात्र या दगाबाजीत आपल्याला जिवनात काय करायचे आहे, प्रेमाची व्याख्या काय हे ते शोधुन घेतात. विषय एकदम साधा सरळ असला तरी, त्याचे सादरीकरण हे कॉम्पेक्ससीटीला बाहेर ठेवुन दाखवले गेले आहे. साधे संवाद असलेल्या या चित्रपटात, सरळ संदेश देताना दिग्दर्शकाने आपल्या मनाने विचार करणारया पात्रांना पुढाकार दिला आहे. कॅमेराच्या टिपणातही दिग्दर्शक प्रतीक फ्रेम चित्रकाराच्या नजरेतुन दाखवतो ते विशेष.

महोस्त्वात एकमेव सिंहली चित्रपट असलेला अलोको उडापडी हा चित्रपट पाहता आला. ऐतिहासिक आणि भव्यदिव्य असलेल्या या चित्रपटात दिग्दर्शक चथरा विरामान यांनी मेलोड्रामा जोडुन श्रीलंकेतली परकीय आक्रमणाची कथा आणि त्या दरम्यान बुध्दाची शिकवण, जपण्यासाठी बुध्द भिक्कुनी घेतलेला पुढाकार दाखवला आहे.

तैवानी दिग्दर्शक तसो सिह हान यांनी एक नविन भाडेकरु जेव्हा मसाजच्या नावाखाली शऱीरविक्री करणारया स्त्रीयांच्या शेजारी रहायला येतो तेव्हा काय घडते या क्लिष्ट विषयाला विनोदाची झालर देत सादर केले आहे. सिंगल पॅरेन्टींग करणारया या मध्यमवर्गीय माणसाला शाळेत जाणारी मुलगी आहे. आणि त्या वाढत्या वयाच्या मुलीवर परिणाम होऊ नये म्हणुन तो त्या दोन स्त्रीयांनी घर सोडावे म्हणुन अनेक प्रयत्न करतो. मात्र त्या प्रयत्नात तो त्या दोघामधील माणुसकी देखील पाहतो, त्याचे विनोदी चित्रण केले आहे. कोठेही विभत्सता किंवा शरीर न दाखवता दिग्दर्शक हान हे विषयाला उत्तमरीत्या रंगवतात. बोजड विषयाला त्यांनी दिलेले संवाद यासह कलाकारांनी, अभिनयाद्वारे हा बोजड विषय रंजकता देत सादर केला आहे.    

तांत्रिक बिघाडामुळे अजूनही मिरामार येथील पुब्लिक स्क्रीनिंग ला सुरवात झालेली नाही...

No comments:

Post a Comment