Friday 11 November 2016

Asmit Patel is producing International TV show


अस्मीत पटेल करतोय इंन्टरनॅशनल टिव्ही शो ची निर्मीती

-      हर्षदा वेदपाठक

अस्मीत पटेल हा दिसायला उमदा आहे...अभिनय देखिल बरयापैकी निभावुन नेतो. तरी देखिल तो चित्रपटांत फारसा दिसत नाही. हा प्रश्न मनात ठेवुन, डोंगरीचा राजा या चित्रपटाच्या पाश्वभुमीवर त्याच्याबरोबर केलेली बातचित....

डोंगरीचा राजा या चित्रपटात अन्डरवल्डचा बिमोड करायला आलेल्या पोलीस अधिकारयाच्या भुमिकेत अस्मीत दिसुन येईल.   अगदी महत्वपुर्ण भुमिकेत असल्याचे तो सांगतो. कथा काल्पनिक असुन पात्र बरयापैकी वास्तविक वाटावेत असेच आहेत. तसेच, या चित्रपटाचे चित्रीकरण हे डोंगरी या परिसरात झाल्याने, जागेची वास्तविकता देखिल चित्रपटाला ऐक वेगळा रंग देते अससल्याचे तो स्पष्ट करतो.

ऐक चित्रपट करुन तु गायब होतोस आणि मग परत काही वर्षाने येतोस त्यामागचे कारण काय, मला ज्या कामासाठी विचारले जाते त्यामधिल उत्तम प्रोजेक्ट निवडुन मी काम करत राहतो, मी दर्जासाठी कधीच तडजोड केलेली नाही. जय हो, हा चित्रपट मी सलमान खानसाठी केला, तर सिक्स ऐक्स हा चित्रपट मी ऐका मैत्रीणीच्या सांगण्यावरुन केला. परंतु तो अजुन प्रदर्शित व्हायचा आहे. त्यानंतर मी डी.जे. संगीतावर लक्ष केन्द्रीत करत आहे. तर कधी संगीत निर्मीती करतो. दरम्यान मी ऐका चॅनलसाठी पॉवर कपल हा रिऍलीटी शो पण केला. मागिल चार वर्ष मी टिव्ही, चित्रपट आणि डीजेईंग करत आहे. मला प्रवासाची आवड असल्याने मी, नवनविन देश, कधीही पाहिलेले लोकेशन आणि तेथील स्थाईक खानपान याचा आस्वाद घेत असतो.

मनोरंजनाच्या क्षेत्राजवळंच इतकं सारं करत आहेस मग चित्रपटांची निर्मीती का नाही करीत, मी आताच माझ्या दोन मित्रांबरोबर एका निर्मीती संस्थेची स्थापना केली आहे. तिनचार संहीता सध्या विचाराधीन आहेत. त्यापैकी योग्य वाटल्यास आम्ही आमचे प्रोजेक्ट सुरु करु. बरं मग तु आणि अमिषा यांना कधी एकत्र पाहता येणार आहे, सध्या तरी ती तिच्या होम प्रोडक्शनमध्ये बिझी आहे, मी तिच्या प्रोजेक्टचा हिस्सा नाही. आगामीत बहीण भावावर आधारीत काही चांगली संहीता आली तर त्यावर विचार करता येईल. टिव्ही निर्मतीमध्ये काय करीत आहेस, मी ऐका इंन्टरनॅशनल प्रोजेक्टची निर्मीती करीत आहे, सध्या त्यावर संहिेता लिहीण्याचे काम सुरु आहे.

ऐका ग्लॅमरस अभिनेत्तीचा भाऊ, उत्तम अभिनय करणारा कलाकार, दिसायसा बरा असलेला अस्मीत, चित्रपटाची आणि टिव्ही अभिनयाची आवड असलेला अभिनेता, प्रवासाची पण तुला आवड आहे...हा अस्मती पटेल आम्ही ओळखतो. वास्तवीक अस्मीत पटेल कसा आहे, आपण कोण आहोत याचा आपण सगळेच एका कालावधीनंतर शोध घेत असतो. माझा देखिल त्यास अपवाद नाही, मी देखिल तेच शोधत आहे...लोकं माझ्याबद्दल जे काही वाचतात किंवा एका क्षणीक संवादामध्ये ते माझी इमेज ठरवत असतील. पण मी जो काही आहे तो वास्तविक वेळेत जगणारा माणुस आहे. जो सर्वसमान्यांप्रमाणे दिवसागणिक प्रश्नाना तोंड देत असतो, भावुक आहे. पण त्यातही इमानदारी आणि प्रामाणिकपणा देणार हा अस्मीत आहे. जो कर्मावर विश्वास ठेवतो.

शबाना आजमी यांच्या बरोबर अम्मा या टिव्ही शोमध्ये तो सध्या काम करीत आहे. या महिन्याच्या अखेरीस तो आणखीन एक चित्रपट स्विकारत असल्याचे शेवटी सांगतो.


No comments:

Post a Comment