Friday 19 August 2016

Ranveer Ching Returns released in grand function


रणवीर सिंग आणि दक्षिणेतील प्रसिध्द अभिनेत्री तमन्ना भाटीया चिंग देसी चायनिंज या उत्पादनासाठी एकत्रीत आली आहेत. माहिती अणि चिंग देसी चयनीजची नवीन उत्पादने सादर करण्यासाठी एका पत्रकार परिषदचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी रणवीरच्या चाहत्यांना देखील पाचारण करण्यात आले होते. तमन्नाने तिला जेवण करायची हौस असल्याचे सांगीतले तर रोहित शेट्टीने मैड मैक्स प्रमाणे जाहिरात करायची ठरवल्याचे सांगितले, मात्र बजेटबद्दल बोलणे टाळले. याच बजेटमध्ये एक स्मॉल बजेट चित्रपट तयार करता आला असता हे सांगायला ते विसरत नाहीत. 


रणवीर चिंग रिर्टन या जाहीरातीमध्ये, रणवीर एका अनोख्या अंदाजमध्ये दिसला आहे. सोबत त्याने त्यांच्या आईची भुमिका देखिल केली आहे. या दोन्ही वेषात तो रंगाढंगातील अभिनयाची चुणुक दाखवुन जातो. रामलिला आणि बाजीराव मस्तानी या दोन चित्रपटांनी, रणबीरच्या कारकीर्दीत एक वेगळेपणा दिला आहे. आणि त्या वेगळेपणाचे धनी, संजय लिला भन्साली यांच्याबरोबर ही त्याचा वेगळा रॅप्पो आहे. त्यामुळे की काय, रणवीर ने दिपीकासह पद्मावती हा चित्रपट करायला घेतला. या चित्रपटात तो अल्लाउद्दीन खिल्जीच्या भुमिकेत असेल. परंतु, त्यात त्याच्या बरोबर, शाहीद कपुरची भुमिका देखिल आहे. ज्याद्वारे तो खुश नसल्याची चर्चा आहे. याच मुदयावर त्याला प्रश्न विचारता, तो बोलणे टाळतो. असो...रणवीर आणि तमन्नाची या जाहीरातीमधिल केमीस्ट्री पाहण्यासारखी आहे. त्यामुळे या दोघांना एकत्रीत काम करता पहायला कोणालाही आवडेल आणि या दोन्ही कलाकारांनी, एकत्रीत काम करायला तयार असल्याचे यावेळी कबुल देखिल केले.

No comments:

Post a Comment