Thursday 25 August 2016

Interview with Jacqueline Fernandez on Flying Jatt


जॅकलीन फर्नाडीस - यावर्षीची हिट अभिनेत्री
-    हर्षदा वेदपाठक
सलमान खानबरोबर प्रदर्शित झालेल्या किक या चित्रपटाच्या यशानंतर, श्रीलंकन ब्युटी असलेल्या जॅकलिन फर्नाडीस हिला हिंदी चित्रपटसृष्टीत जॅकपॉट लागला म्हटलं तरी वावगं ठरु नये. यावर्षी तिचे तिन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. ते दोन प्रदर्शित चित्रपट हिट झालेत, तेथे ती तिसरया चित्रपटासह तयार आहे... बिट पे बुटी....या गाण्याने, फ्लाईंग जाट हा चित्रपट मुळातच चर्चेत आलाय. यासह एकंदरीत, तिच्या कारकीर्दीबद्दल केलेली बातचित...
जॅकलिन यावर्षी तुझे तिन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. या बॅक टु बॅक रिलीजबद्दल काय सांगशिल?
या तिन्ही चित्रपटांबद्दल मी समाधानी आहे. कारण ते तिन्ही चित्रपट हे मोठे आणि व्यावसायिक आहेत. मात्र या चित्रपट निमित्ताने, लोकांना वेगवेगळ्या प्रमोशन पध्दतीने भेटायची संधी मिळते. या सगळ्याने जिवनात किती ऍक्शन सुरु झाली आहे असे वाटते. बरयाचदा त्याने दमछाक देखिल होते. ढिशुम, हाऊस फुल तिन नंतर आता फ्लाईंग जाट हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. कधीकधी वाटतं की, या सगळ्या प्रदर्शनामध्ये जर काही कालावधी असता, तर बरं झालं असतं. पण चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख कलाकारांच्या हातात नसते. हे चित्रपट मी जेव्हा स्विकारले होतेत तेव्हा त्यांचे प्रदर्शन लागोलाग होईल ते मला ठावुक नव्हते. माझ्या चित्रपटांबद्दल आणखीन ऐक महत्वाची गोष्ट म्हणजे, काही वर्षी माझे चित्रपटच नसतात. तर कधीकधी जे काही चित्रपट असतील ते लागोलाग प्रदर्शित होतात. आता तर मला देखिल अश्या नशिबाची सवय झाली आहे.
सलमान खान बरोबरील किक हा चित्रपट केल्याने तुझ्या कारकीर्दीचा आलेख चढता रहायला मदत झाली ?
किक या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर दोन वर्षात माझे पाच चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. यापुर्वी असं कधीच घडलं नव्हतं. माझ्यासाठी हे सगळं स्वप्नवत आहे. आणि हे सगळं असच सुरु रहावं असं मला वाटतं. कारण मला चांगलं काम मिळत आहे. या कामाद्वारे मी इंन्डस्ट्रीमध्ये ग्रो करत आहे, ते समाधानकारक वाटत आहे.

किकच्या प्रदर्शनपुर्व तु विदेशी मुलगी आहे, जीला चित्रपटक्षेत्रात नाम कमवायचे आहे, तिला हिंदी पण येत नाही असे म्हटले जात असे. मग त्या दरम्यान अशी कोणती गोष्ट होती की तुला काम मिळत नव्हते ?
मला वाटतं किक या चित्रपटानंतर लोकांचा माझ्याबद्दल विचार करण्याची पध्दती बदलुन गेली. किकसाठी मी खुप मेहनत केली. मग विचार करता असं वाटतं की, मी किकपुर्वी पण मेहनत करतच होती. मग काय कमी होतं माझ्यात. यावर विचार करता मला असं वाटतं की. माझ्यामध्ये आत्मविश्वास अजिबात नव्हता. आता मात्र मी आत्मविश्वासाने वावरते. जसजसे चित्रपट मिळत आहेत त्या अनुषंगे आत्मविश्वासही वृध्दींगत होत आहे. 

तु अक्षय कुमार, सलमान खान आणि या जेष्ठ कलाकारांबरोबर काम केलं आहे. तेथे वरुण धवन आणि टायगर श्रॉफ या नविन कलाकरांबरोबही काम करत आहेस ? 
सलमान आणि अक्षय हे खुप मोठे कलाकार आहेत. त्यांच्याकडे काम करण्याचा अनेक वर्षाचा अऩुभव आहे. आज देखिल ते टिकुन आहेत त्यांमागे ते तितक्याच उत्साहात, त्याच जोमात काम करत आहेत जे वरुण आणि टायगर करतात. मागिल विस वर्ष त्यांनी ती ऍनर्जी तशीच टिकवुन ठेवली आहे. त्याच बरोबर त्यांचा फोकस, आत्मीयता आणि काम करण्यामागिल झपाटलेपण देखिल तेच आहे. हे सगळेच कलाकार महत्वाकांक्षी आहेत. जिवनता देखिल ते फोकस असल्याने, त्यांना आयुष्यात काय करायचे आहे ते ठावुक आहे.

फ्लाईग जाटच्या प्रोमोमध्ये तुझी आणि टायगरची केमिस्ट्री पसंद केली जात आहे ?
इतर कलाकारांच्या तुलनेत टायगर वेगळा आहे. तो सांगतो सुध्दा की, तो लाजाळु आणि बोअरींग आहे म्हणुन. मात्र मला तसे वाटले नाही. त्यांचा सेन्स ऑफ हुयमर खुप चांगला आहे. खरं तर आमचं दोघांच बरयापैकी जमतं. मी खुपच बोलते आणि तो एकदम शांत राहणारयांपैकी आहे. त्याला असलेली व्यायामाची, नृत्याची आणि प्रवासाची आवड, हे माझे देखिल छंद आहेत. मी टायगरचे वडील जॅकी श्रॉफ यांच्याबरोबर देखिल काम केलं आहे. त्या दोघींमध्ये खुप साम्य आहे. ते दोघे इतके सारखे आहेत की, टायगरचं भवितव्य काय असेल ते मी सांगु शकते. मात्र जॅकी सर टायगरप्रमाणे लाजाळु नाहीत तर रिझवर्ड आहेत. दयाळु देखिल आहेत ते. मी आणि टायगर एकत्रीत काम करत आहोत हे कळताच ते फार खुष झालेत.

सिध्दार्थ मल्होत्राबरोबर तु बॅंग बॅंग दोन हा चित्रपट करत आहेस. त्यामध्ये तु ऍक्शन करताना दिसणार ?
त्या चित्रपटाची संहिता खुप मनोरंजक आहे, खेरीज माझी भुमिका देखिल महत्वाची आहे. तेथे मला ऍक्शन आणि अभिनयातील वेगळेपणा देण्याची संधी मिळणार आहे. सध्या मला ज्या कामासाठी विचारणा होत आहे त्यात, माझी भुमिका वेगळी असेल. आणि ती करताना आव्हानात्मक वाटेल अश्याच भुमिका मी स्विकारत आहे. त्याच श्रेणीत बसणारा बॅंग बॅंग आहे. तर याद्वारे तुम्ही मला वेगळ्या भुमिकेत पहाल.

वेगळी भुमिका म्हणजे नेमकं काय ?
आतापर्यंत मी सॅक्सी, ग्लॅमरस अश्या भुमिका केल्या आहेत. तेथे फ्लाईंग जाट या चित्रपटात मी लाउड, केअर फ्री अशी भुमिका केली आहे. जी लोकांना पहायला आवडेल. ऐका सुपर हिरोवर प्रेम करणारया तरुणीच्या भुमिकेत मी येथे आहे.
इतक्या वर्षानंतर तु स्वताला आउटसायडर मानतेस काय ?
अजिबात नाही, आता मी स्वताला इकडचीच मानते. मला चांगल्या लोकांबरोबर चांगलं काम करायची संधी मिळत आहे. झलक दिखला जा सारखी मालिका मी करत आहे. चित्रपट आणि टिव्ही या दोन्हीमध्ये मी काम करत आहे. मला आता तर मी इकडचीच वाटते. खुष आहे मी माझ्या या वाटचालीबद्दल.
तुझ्या प्रत्येक चित्रपटातील गाणी चार्ट टॉपर्स होतात, तर तु स्वताला लकी मानतेस काय त्या बाबतित?
या अश्या मुद्यांमुळे माझा आत्मविश्वास वाढतोय. तसेच गाण्यांच्या बाबतीत मी स्वताला नशिबवान मानते. जेणे करुन, त्याचा चित्रपटालाच नव्हे तर माझ्या वैयक्तीक कारकीर्दीला देखिल बढाई मिळते. माझ्या चित्रपटातील गाण्यांसाठी मी नेहमीच प्रार्थना करते की त्याची गाणी श्रवणीय असु देत. कोणत्याही चित्रपटाच्या मार्कर्टींगसाठी त्या चित्रपटाची गाणी श्रवणीय असणे गरजेचे असते हे मी मानते. त्याचा वापर सोशल मिडीया आणि तरुणांना चित्रपटगृहापर्यंत आणण्यासाठी होतो.
तु कॅतरीना कैफच्या पावलावर पाउल ठेवुन वागत आहेस आणि तिच्या कारकीर्दीकडे लक्ष ठेवुन आहेस अशी एक बातमी वाचनात आली होती, त्यावर काय सांगशिल ?
मी तरी तशी बातमी काही वाचलेली नाही. एकाच इंन्डस्ट्रीमध्ये काम करणारया अभिनेत्रीबरोबर तुम्ही इनसिक्युअर राहु शकता ही खुप नैसर्गीक बाब आहे. याचा अर्थ मी दुसरया अभिनेत्रीच्या कामाकडे नजर लावुन बसली आहे असा होत नाही. मला खुप चांगले काम मिळत आहे आणि मी खुष आहे त्या कामाने.

No comments:

Post a Comment