Monday 10 October 2016

REVIEW - Queen of Katwe




परिक्षण – क्विन ऑफ काटवे

हर्षदा वेदपाठक



युगांडामधिल झोपडीत राहणारी निरक्षर मुलगी आपल्या बुध्दीमत्तेच्या जोरावर, आईच्या चिकाटीवर, गुरुच्या मार्गदर्शनाखाली बुध्दीबळ खेळातील जगविजेयती कश्याप्रकारे होते त्याचे चित्रण क्विन ऑफ काटवे या चित्रपटात पहायला मिळते. फियोना म्युतीसी या खेळाडुवरील व्यक्तीपटाचे दिग्दर्शन मिरा नायर यांनी केले असुन. दिग्दर्शिकेने अगदी बारकाईने लिहीलेली संहिता या चित्रपटाला खिळवुन ठेवायला मदत करते.



युंगाडामधिल अतीशय गरीब वस्तीत राहुन, बस स्टेशनवर भाजी विकणारी फियोना, बुध्दीने तल्लख आहे. कधीही शाळेत न गेलेली हि मुलगी, एका ठिकाणी खेळाच्या बदल्यात खाऊ दिले जातात म्हणुन, बुध्दीबळच्या शाळेत डोकावते. निव्वळ तर्कबुध्दी लावुन फियोना खेळत जाते. तिची अफाट बुध्दी पाहुन तिचा शिक्षक, पदरचे पैसे मोड करुन तिला वेगवेगळ्या स्पर्धेत पाठवु लागतो. ती जसजशी जिंकु लागले तसतशी तिच्याकडे देशाचे लक्ष जाते या वास्तव कथेवर क्विन ऑफ कटवे हा चित्रपट आधारीत आहे. मिरा नायर यांनी युगांडाची सामाजीक, आर्थिक परिस्थीत हेरताना त्यात फियोनाचे जिवन हे अगदी सामान्य सुरु असल्याचे दाखवले आहे. जगाची, पैश्याची माहिती नसलेली एक मुलगी, याच खेळाद्वारे आपल्या गरीब कुटुंबासाठी जिकांयची जिद्द ठेवु लागते...त्यात ती सफल होते तर कधी होत नाही हे दाखवताना, दिग्दर्शिकेने एकदम सामान्य प्रसंग अगदी उठावदाररीत्या सादर केले आहेत. सिनेमाचे तंत्र या  विषयात न पडता त्यांनी कथेला योग्य न्याय दिल्याचे दिसुन येते.



क्विन ऑफ काटवे या चित्रपटाचे आणखीन एक वैशिष्ट म्हणजे, सरल, मनभावन अभिनय करणारे कलाकार. जे फियोनाच्या वास्तवदर्शी जिवनाला वास्तविकतेची झालर देतात. टिम क्रोथर लिखीत पुस्तकावर, विल्यम व्हिलर यांनी पटकथा लिहीली आहे. त्यात शोध, यश, अपयश आणि पुन्हा यश या पारंपारिक क्रीडा ड्रामा फॉर्म्युलाचा उत्तम वापर केलेला पहायला मिळतो. कथानकानुरुप सुरु असलेल्या या कहाणीमध्ये वेगळेपणा आणि रंजकता दाखवण्याचा काटेकोर प्रयत्न मिरा नायर यांनी केला आहे.



गरीबीत राहुनही त्याचा बाऊ न करणारया लोकांची कथा असुनही, प्रत्येक व्यक्तीमत्वाला त्याच्या परिसराची ओळख दिलेली आहे. आणि त्यामुळे त्यांचे वागणे आणि संवाद हे अगदी  वास्ताविक वाटतात. नवकलाकार मादिना नालवांगा हिने रंगवलेली फियोना कोणत्याही शहराजवळील गरीब वस्तीत राहणारी मुलगी वाटते. डेव्हि़ड ओयलोवो यांनी रंगवलेला मुलांच्या भवितव्यासाठी झटणारा कोच, ल्युपीता नयोगो हिने रंगवलेली आई, जी वाताहत झालेल्या परिस्थितीतही सरळमार्ग सोडत नाही. तर जिवनात वास्तविकतेचे भान ठेवणारी हि निरक्षर महिला आपल्या मुलीला प्रोत्साहन देताना, जमीनीवर पाय ठेवायला पण शिकवते. वेगळी व्यक्तीमत्वे असुनही फियोनाची आई आणि गुरु कोठेही मुलीसाठी मोलोड्रामॅटिक न होता...वास्तविकतेचे भान ठेवत वागतात हे विशेष.



इतर आत्मचरित्रांच्या तुलनेत, क्विन ऑफ काटवे हा चित्रपट कोठेच बटबटीत होत नाही. तर कथेलाचा हिरो करत पुढे सरकतो. मोठी स्वप्न पहा, त्याचा पाठपुरावा करा हा संदेश देणारा हा चित्रपच  वयोगटातील प्रेक्षकांना आपलासा वाटेल यात शंका नाही


No comments:

Post a Comment