Saturday 21 November 2015

IFFI 2015 first day report





इफ्फी पहिला दिवस

46 व्या इफ्फी चित्रपट महोस्त्वात पहिल्या दिवशी भारतीय पनोरमा चे उद्घाटन मंत्री मोहोद्यांच्या हस्ते करण्यात आले. सोबत एन.फ. ऐ. आई. च्या पहिल्या मल्टीमीडिया प्रदर्शनाचे देखिल उद्घाटन झाले. आज खास ठरलेल्या चित्रपटात एन्क्लेव (सर्बिया), मच लव्ड (फ्रांस), कॉसमॉस (फ्रांस), फादर (जर्मनी), इस्ला बोरिता (स्पेन) या चित्रपटांचा समावेश राहिला.

मनाची गुहा आणि त्याचा तळ फार कमी लोकाना कळन येतो. या मुद्याला मध्यवर्ती ठेवून दिग्दर्शक फेर्नान्दो कोलोमो यानी इस्ला बोरिता ही कथा रचली आहे, प्रेम हे कधीच एक मार्गी नसते त्यामुले ते एकदा किवा एक व्यक्ति बरोबर होवू शकत नाही या कथा बीजाला दिग्दर्शक फेर्नान्दो यानी ज्या स्थळी या चित्रपटाचे चित्रीकरण झाले त्या जागेची सुंदरता आणि इतिहास याची सुन्दर सांगड घातलेली पहायला मिलते, या वर्षी कंट्री फोकस उए स्पेन या देशवार ठेवला आहे त्या दिशेने इस्ला बोरिता या चित्रपटाने या श्रेणीचे उद्घाटन करण्यात आले. 

यादवी युद्ध दरम्यान मोठ्यांची मने ज्या प्रकारे कठोर झालेली असतात त्या विरोधात लहान मुलांची मने मात्र परिस्थति, हेवे दावे या पासून किती लांब असतात ते एन्क्लेव या चित्रपटात पहायला मिळते, सर्बियन आणि अल्बेनियन् यादवीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम आणि कैथलिक मुलांच्या मैत्रीची कहाणी या चित्रपटात फार खुबीने दाखवली गेली आहे. गोरान रडोवानोविक यानी एन्क्लेव या चित्रपटात युद्धची दहकता आणि मनाची भावनिकता खुबीने टिपलेली दिसून येते 

बायको सोडून गेल्यावर लहान मुलाला पाळताना एका वडिलांची त्रेधा दाखवली आहे. पोटापाण्याचा प्रश्न सोडवताना वडिल, आपल्या मुलाला मागे ठेवून नोकरीच्या शोधत निघतात तेव्हा मुलगा त्यांचा माग काढत कश्या प्रकारे फिरतो त्याचे चित्रण दिग्दर्शक विसार मोरीना यानी फादर या चित्रपटात चित्रित केले आहेत 

काल प्रियमानसम या संस्कृत चित्रपटाद्वारे भारतीय पनोरमचे उद्घाटन करण्यात आले. 

No comments:

Post a Comment