Saturday 21 November 2015

Film Bazar - you tube section


फिल्म बजार - यू ट्यूब कन्टेन

By Harshada Vedpathak


वेग वेगळ्या वयोगटाच्या प्रेषकांच्या मानसिकतेला लक्षात ठेवून यू ट्यूब वर कन्टेन अपलोड केला जातो. या विषयावर आज फिल्म बजार मध्ये एका  चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यात यू ट्यूब चे भारतातील कन्टेन हेड सत्या राघवन यानी हा मुद्दा मांडला. बालकांच्या जन्माच्या सहा महीन्या पासून ते वयाच्या पंचविशी पर्यन्त यू ट्यूब वर या वयोगटाचा प्रेषक सहज आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याचे ते सांगतात.त्या  200 देशात दिवसभरात 300 तासाचा कन्टेन अपलोड होत असल्याची माहिती ते देतात. यू ट्यूब वर सेंसरशिप असावी काय या प्रश्नाचे उत्तर देताना सत्या सांगतात, 'एखादा विडियो जर आपतिजनक जाणवला तर त्या विडियो समोर एक फ्लैग असतो तो क्लिक केल्यास आम्ही त्याचे परिक्षण करतो. जर त्या विडियोमुले समाजमन दुखावले जाणार असेल तर तो विडियो काढून टाकतों' ही माहिती ते देतात. यू ट्यूब वर विडियो अपलोड केल्यास यू ट्यूब पैसे देतात, मात्र ते देशा नुसार देतात. त्यामुले भारत आणि नेपाल मध्ये कमी मानधन दिले जाते याची ते कबुली देतात आणि ती श्रेणी येत्या काही दिवसात सुधारीत करण्याची  खात्री ते देतात.

No comments:

Post a Comment