Wednesday 22 June 2016

नाटयसेवा कार्यकर्ता कृष्णा जाधव यांच्या निस्पृह कार्याचा सत्कार...



नाटयसेवा कार्यकर्ता कृष्णा जाधव यांच्या निस्पृह कार्याचा सत्कार...

अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेतर्फ नाटय कार्यकर्ता कृष्णा जाधव यांचा उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणुन सत्कार करण्यात आला. सत्कार साहीत्यामध्ये शाल, श्रीफल, प्रशस्तीपत्रक आणि पाच हजार रुपयाच्या रकमेचा समावेश होता. समाजसेवीची आवड असणारया कृष्णा जाधव यांच्या पत्नी, वर्षा यांनी त्या पुरस्काराच्या रक्कमेत, आणखीन पाच हजार रुपयांची भर घालुन राजापुर तालुक्यातील यरडव गावातील पाणी टंचाई निवारण्यासाठी, जाधववाडी ग्रामविकास मंडळाला देणगीदाखल दिलेत. मागिल चाळीस पंचेचाळीस वर्ष कृष्णा जाधव हे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याक्षेत्राबरोबर जोडले गेले आहेत. त्यात त्यांनी देहदानाची केलेली नोंदणी असो, कि सोलापुर येथे पार पडलेल्या पहिल्या बालनाट्यासाठी केलेले आयोजन असो. त्यांचे निस्पृह काम हिच त्यांची ओळख होऊ पाहत आहेत. सध्या ते अखिल भारतीय नाटय परिषदे शाखांचे समन्वयक म्हणुन आपली कामगीरी बजावत आहेत.


No comments:

Post a Comment