Wednesday 8 June 2016

INTERVIEW with Vidya Balan ( - acting is my ticket to stardom)



ऍक्टींग इज माय टिकीट टु स्ट्रारडम - विदया बालन

-हर्षदा वेदपाठक

पा या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम केल्यावर विदया बालन, पुन्हा ऐकवार अमिताभ बच्चन यांच्याबरोबर तिन या चित्रपटात काम करत आहे. महिला पोलीस अधिकारी झालेली विदया भुमिकेची तयारी कशी केली, सशक्त भुमिका, बॉक्स ऑफीस या आणि अनेक अवांतर विषयावर चर्चा करताना...

पा या चित्रपटामध्ये तु अमिताभ बच्चन यांची आई झाली होतीस, तर आता या सस्पेन्सपटाद्वारे त्यांचा पाठलाग करत आहेस काय ?

अमिताभ बच्चन यांच्याबरोबर प्रत्येक चित्रपटात वेगळेपणा देताना गंम्मत येते. पा मध्ये तर मी त्यांची आई झाले होते. त्या चित्रपटामध्ये ते तेरा वर्षाचे होते तर तिन मध्ये ते 76 वर्षाचे जॉन बिश्वास आहेत. दोन्ही भुमिका खरं तर वेगेवेगळ्या आहेत. पाच ऐक वर्षाच्या कालावधीमध्ये ऐक कलाकार अभिनयातील इतकी मोठी विवीधता देतो यातच फार मोठी गोष्ट आहे. आणि अश्या कलाकाराबरोबर मला काम करण्याची संधी मिळावी हि माझ्यासाठी फार सुखद गोष्ट आहे. अभिनयातील एक वेगऴेपणा देउन ते गप्प बसत नाहीत. तर पुढच्या वेळेला पुन्हा ऐक वेगळेपणा घेऊन ते येतात. त्यांच्या कोणत्याही भुमिकेत तकलादु प्रकार नसतो. तर प्रत्येक भुमिकेवर ते मेहनत घेताना दिसतात. मला वाटतं सगळ्या कलाकारांना हि गोष्ट आत्मसाद करायची गरज आहे. गॉड ब्लेस हिम...

हल्ली चित्रपटांच्या संवादात आणि गाण्यात शिव्यांचा एक प्रघात दिसु लागला आहे. काय सांगशिल त्याबद्दल ?

समाजामध्ये हल्ली सर्वसाधारण संवादामध्ये शिव्या देण्याचा प्रघात वाढलेला दिसुन येतोय. मी इश्कीया या चित्रपटात खुप शिव्या दिल्या होत्यात. पण कथानकाची गरज आणि पात्राची मानसिकता असेल तर हरकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तो चित्रपट जर लहांनानसाठी नसेल आणि त्यात शिव्या असल्यात तर काय बिघडलं. गाण्याची गोष्ट करायची तर त्या (हसुन) शिव्या असलेल्या गाण्यात पुढे कथानकपण असलं तर बरं.

भुमिकांची निवड तु कश्याप्रकारे करतेस ?

ऐखादया चित्रपटात माझी काय भुमिका आहे ते माझ्यासाठी महत्वाचे आहे. कारण मी त्याबरोबर एकरुप होऊ शकते का नाही ते पाहते. मग दिग्दर्शक, कारण कलाकार आणि दिग्दर्शक यांचा चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टीकोण एकच पाहिजे. सरतेशेवटी निर्माता महत्वाचा आहे. कारण चित्रपटाचे सादरीकरण आणि वितरण या फार महत्वाच्या बाबी आहेत असं मला वाटतं.

हल्ली चित्रपटाच्या व्यावसायाबद्दल खुप बोललं जात आहे. येत्या काही वर्षात कालाकार हे बॉक्स ऑफीसनंबरसाठी लक्षात राहतील की अभिनयासाठी ?

अनेकांनी ऐखादा चित्रपट पाहिला हा त्या चढया बॉक्स ऑफीसचा अर्थ असतो. मग तो एक चित्रपट असो कि अनेक. तसेच तो चित्रपट बहुचर्चीत राहील्याचे लक्षण देखिल आहे. मला नाही वाटत प्रेक्षकांना नंबर आठवतात म्हणुन. त्या प्रसिध्द चित्रपटातील ती प्रसिध्दी अभिनेत्री या प्रकारे ते लक्षात ठेवतात. त्याचबरोबर चित्रपटाचे व्यावसायिक यश देखिल फार महत्वाचे आहे यात वाद नाही. एक कलाकार म्हणुन मला नंबरांमध्ये स्वताला गुंतवुन घ्यायचे नाही. तर आपल्या भुमिकेवर लक्ष केंद्रीत करायचे आहे. एका ठराविक कालावधीनंतर या नंबरामुळे डोक्यात एक खुळ बसुन जातं. चित्रपट प्रदर्शनपुर्व किती ओपनिंग लागेल यावर लोकं चवीनं चर्चा करताना दिसतात. मला वाटतं, आपण स्टॉक मार्केटमध्ये बसलेलो नाहीत मग कशाला पाहिजे ती चर्चा. मला तरी अश्या चर्चांचं प्रेशर येतं. काही वर्षापुर्वी मी पण असाच विचार करु लागले होते. डर्टी पिश्चर आणि कहानीनंतर खासकरुन. लोकं मला सांगायचित, अरे तुमच्या चित्रपटांना चांगली ओपनिंग मिळते... (हसुन) आणि त्यानंतर तर माझ्या चित्रपटांना ओपनिंगच लागली नाही. आणि मी बॉक्स ऑफीसकडे लक्ष देणंच सोडलं.

चित्रपट हिट झाल्यावर लोकांच्या अपेशा वाढतातच, त्याचे प्रेशर वाटते काय ?

नक्कीच. पण ती गोष्ट मी फार पॉझेटिव्हली घेते आणि फक्त माझ्या कामावरच लक्ष केंद्रीत करते. कोणतीही भुमिका रंगवण्याचे मला कधीच प्रेशर वाटले नाही. जे काम मी करते ते मला आवडते, त्यामुळे बाहेरच्या कोणत्याही गोष्टींचा प्रभाव मी माझ्या कामावर पडु देत नाही. बॉक्स ऑफीस नंबर आपण कन्ट्रोल करु शकत नाही...आणि मी लालची अभिनेत्री असल्यानं मला जी भुमिका मिळेल ती मी करत जाते.

सशक्त भुमिका जेव्हा लिहील्या जातात तेव्हा तुझे नाव पहिले येते. भुमिकांच्या बाबतित कंगना राणावत पण हिरोच्या भुमिकाच घेते. तु सुधा त्या झोन मध्ये गेलीस आहेस, त्याबद्दल काय सांगशिल ?

चित्रपट स्विकारताना माझा सहकलाकार कोण त्याचा मी विचार करत नाही. फक्त तो कलाकार त्या भुमिकेसाठी योग्य असला म्हणजे मिळवलं. मग तो स्टार असो किंवा एखादा सामान्य कलाकार. आणि आमच्या जोडीबद्दल दिग्दर्शकाला खात्री असली पाहिजे. अनेक जणं, मी ऐखादी भुमिका करु शकते किंवा करु शकत नाहीत हे ठरवु लागले आहेत. त्याचं मला प्रेशर येते. माझं असं म्हणणे आहे की, तुम्ही भुमिका लिहा आणि माझ्याकडे या, मी ठरवते ती भुमिका मी करणार की नाही. लोकांनी माझ्यावतीने निर्णय घेउ नये असे मला वाटते. कारण बरयाचदा मलाच ठावुक नसते की कोणते कथानक मला आव्हानात्मक वाटेल, मग लोकांना तरी ते कसे ठावुक असणार. बरयाचदा तुमचे विचार, आजुबाजुची परिस्थीती बदलत राहते, त्यानुसार तुम्ही विचार करता आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्यात तुम्ही त्या ठराविक संहितेवर वेगवेगळे रिऍक्ट होता. मला ज्या काही कामासाठी विचारणा होत आहे त्याबद्दल मी समाधानी आहे. त्यासाठी मी कोणत्याही मर्यादा घातलेल्या नाहीत.

तिन या चित्रपटातील भुमिकेबद्दल सांगशिल ?

येथे मी अंन्डरकव्हर पोलीसाच्या भुमिकेत आहे. त्यासाठी मला रिर्सच करण्याची गरज अशी वाटली नाही. एका मुलीचा खुन होतो आणि तिन जणं त्यामागची कारणे शोधतात, असं कथानक आहे येथे. अगदी लहानशी भुमिका आहे ती. अऩेक जणं मला विचारतात मग चित्रपटच का स्विकारला, तर मला कोलकत्याला परत जाता येणार होतं. सुजॉय बरोबर काम करायला मिळणार होतं. तसेच अमिताभ बच्चन आणि नवाजुद्दीन यांच्याबरोबर परत काम करायची संधी होती, असं सगळं जुळुन आलं. वेगळं कथानक आणि रिभुचा चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टीकोण मला आवडला. थ्रीलरच्या संज्ञेमध्ये वेगळेपणा देण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. या सगळ्यामुळे मला या चित्रपटाचा ऐक भाग व्हायचे होते.

थ्रीलर चित्रपट चालत नाही असं म्हटलं जातं. पण तुझा कहानी हा चित्रपट चालला होता यावरुन तु काय सांगशिल ?

मी जेसीका, इश्कीया आणि काहनी हे थ्रीलर केलेत आणि विशेष म्हणजे ते चित्रपट चालले देखिल. मला वाटतं चांगला चित्रपट हा चालतोच.

एक गैरफिल्मी कुटुंबातली मुलगी जाहीरातक्षेत्रात येते. ती परिणीता सारखा चित्रपट करते. पुढे ती एक संयत अभिनेत्री म्हणुन ओळखली जाते...काय सांगशिल या प्रवासाबद्दल ?

मी यावर बरयाचदा विचार करते. आणि आपण माणुस म्हणुन दिवसागणिक जेव्हा समृध्द होतो, तेव्हा त्याची पडछाया आपल्या कामावर पडतेच. मला वाटतं कि चित्रपटाच्या सेटवर कलाकारांची वाढ झटक्यात होते. इतकच नव्हे तर चित्रपटक्षेत्रामध्ये काम करणारया प्रत्येकाची प्रगल्भता लवकर होते. कारण आम्हाला अनेक प्रसंगामधुन जावे लागते. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कलाकार असल्याने लोकांना लगेचच समजु शकता. कारण तुम्ही तुमच्याबद्दलच नव्हे तर तुमच्या भुमिकेबद्दल सतत विचार करत असता. 

सोशल मिडीयाबद्दल तुझे काय मत आहे ?

तेथील कमेन्ट वाचल्यावर माझ्यावर लगेचच परिणाम होतो म्हणुन मी लांबच राहते त्यापासुन. निगेटिव्हीटीवर माझं आयुष्य घालवण्यापेक्षा मी पॉझेटिव्हीटीवर लक्ष केंन्द्रीत करेन. 

तु प्रेक्षकांची अभिनेत्री आहेस त्यामुळे ते तुझ्याबद्दल आपले मत झाहीर करतात. तर हे प्रेक्षकांची अभिनेत्री म्हणुन राहणं किती सोपं किंवा कठीण आहे ?

मी आज जे काही आहे ते त्यांच्याचमुळे आणि त्याचा मला अभिमान आहे. लोकांकडुन जेव्हा प्रक्षंसा मिळते तेव्हा समाधान तर वाटतच आणि आणखिन जोमाने काही चांगलं करायची इच्छा होते. बरयाचदा आव्हान घ्यायची इच्छा होते. लोकांनी मला अनेकदा सांगीतलं आहे की तुम्ही चित्रपटात तसं वागायला नको होते. मी त्यांच्या मताचा आदर करते. आणि हे ते सगळं माझ्यावरील प्रेमापोटी ते बोलत असतात हे देखिल मी जाणते. तेच कोणी मला त्रास दयायला बोलत असेल तर मी दुर्लक्ष करते.

नो वन किल्ड जेसीका, कहानी नंतर तु आणि सिध्दार्थ राय कपुर एकत्र काम करणार काय ?

नाही, कारण संसार चालवण्यासाठी घर आणि व्यावसायिक काम वेगळं ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यात काही चांगले चित्रपट माझ्या हातुन निसटु देखिल शकतात. नाहीतर घरी येऊनही पुन्हा त्याच त्याच विषयावर बोलावे लागेल. मग घर आणि ऑफीसमध्ये फऱक तो काय राहणार. आम्ही घरी काही ठराविक मुद्यांवर बोलतो पण प्रमाणातच. कारण या अश्या चर्चेनंतर जर आमच्यात वेगवेगळी मतं असलीत तर तफावत येऊ शकते म्हणुन आम्ही एकत्र काम करत नाही.

जेथे काही अभिनेत्री या विदेशात काम करायला गेल्या आहेत तेथे तु मराठी आणि मल्यालम सिनेमा करत आहेस. जर एकाच वेळेस तुला हिंदी आणि इतर भाषिक चित्रपटांसाठी विचारलं गेलं तर तु चित्रपटांची निवड कश्याप्रकारे करशिल ?

ऐक अभिनेत्री म्हणुन मला त्या चित्रपटात काय आवडत आहे, त्यावर मी चित्रपटाची निवड करेन. किती लोकं तुमचा चित्रपट पाहतील या मुदयावरुन चित्रपटांची निवड मी करत नाही. कारण ते मुद्दे तुमच्या हातात नसतात. प्रांतिय चित्रपटाला प्रमोट करण्यापेशी मी स्वताकडे अभिनेत्री म्हणुन पाहते. ऐक अलबेलामध्ये माझी भुमिका रंजन असल्याने मी तो चित्रपट स्विकारला. तर कमला दास या  मल्याळम चित्रपटात काळाच्या पुढे असलेल्या, लेखिकेची भुमिका करायची संधी मिळत होती म्हणुन मी तो चित्रपट स्विकारला. आणि याच आधारे मी भुमिका निवडत जाते आणि करत जाते.

प्रांतिय सिनेमाला तु हिंदी सिनेमासमोर मोठा मानतेस. कि हॉलीवुडचा हिंदी सिनेमाला धोका आहे असं तुला वाटतं ?

कितीही झाले तरी लोकं हिंदी चित्रपट पाहतील. सैराट या चित्रपटाने उत्तम व्यावसाय केला याचा अर्थ लोकं तो चित्रपट पाहत आहेत. सोबत अश्या चित्रपटांना सिनेमागृह देखिल मिळु लागली आहेत ते  लक्षात घेतलं पाहिजे. हॉलीवुडमुळे हिंदी चित्रपटांना धोका आहे असं मला वाटत नाही. मागे अशी एक आरोळी उठली होती की, मसाला चित्रपट चालणार नाहीत म्हणुन. पण तुम्ही पहा ना, अजुन देखिल ते चित्रपट चालतच आहेत. दर आठवडयाला नवनविन चित्रपट येतच राहणार त्यात वाद नाही.

तु स्ट्रार आहेस कि अभिनेत्री ?

मला वाटतं कलाकार हा नेहमीच वेगवेगळ्या भुमिका जगत असतो. तर स्ट्रार हा एकच एक भुमिका करतो. नऊ वर्षाच्या कालावधीमध्ये मी खुप वेगवेगळ्या भुमिका केल्या आहेत. स्ट्रारची पदवी जर मला लोकं देत असतील, तरी लोकं मला अभिनेत्री म्हणुन पहिल्यांदा ओळखतात. ऍक्टींग इज माय टिकीट टु स्ट्राऱडम.

टिव्हीशेत्रात काम करायला आवडेल काय ?

त्याबद्दल मला अनेकदा विचारणा झाली आहे. पण स्विरारण्याजोगे खास असे काहीच नाही.

तुझे आगामी चित्रपट ?

ऐक अलबेला, कहानी 2, बेगमजान आणि कमला दास.


No comments:

Post a Comment