Friday, 17 June 2016

REVIEW - Udta Panjab


परिक्षण – उडता पंजाब

उडता पंजाब - पटकथेच्या पंखात अधिक बळ आवशक

हर्षदा वेदपाठक





या वर्षीच्या सुरवातीच्या सहा महिन्यात बॉक्स ऑफीसवर सर्वाधीक चर्चेत आणि विवादात रहिलेला उडता पंजाब आपल्या नियोजित तारखेला प्रदर्शित झाला. त्यामध्ये दिग्दर्शक अभिषेक चौबे यांनी पंजाबमध्येच नव्हे तर भारतभर सुरु असलेल्या ड्रगच्या प्रश्नाला प्रेक्षकांसमोर बारकाईने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.  



चित्रपटाचे कथानक चार भागांत सुरु होते. गायक टॉमी सिंग, पंजाब मधिल अनेक स्थळी संगीताचे कार्यक्रम करतो. ड्रगच्या आहारी गेलेल्या टॉमीला त्याच्या कॉन्सर्टमध्ये सर्व वयोगटातील श्रोते ड्रग घेतात ते माहीत नसते. तर दुसरीकडे शेतात काम करणारया पिंकीला ड्रग सापडतात, ठरवुनही ते ड्रग ती डीलरला विकत नाही. जेणे करुन त्यांच झालेलं नुकसान ते, पिंकीवर अत्याचार करुन पुर्ण करतात. पोलिसांत असलेला सरताज सिंह, ड्रग माफीयांना मदत करीत असतो. त्याचा भाऊ जेव्हा ड्रगच्या ओव्हरडोसने रुग्णालयात पोहोचतो. तेथे त्याला भेटलेली डॉक्टर प्रित साहनी, ड्रगची काळी बाजु दाखवते तेव्हा तो, ड्रगची पाळमुळं खणुन काढायचं ठरवतो. हे आहे उडता पंजाबचे कथानक.



काही प्रमाणात वास्तवदर्शी असलेल्या उडता पंजाबमध्ये शाहीद कपुरने टॉमी सिंहचा वेडसरपणा, जोम व्यवस्थित सादर केला आहे. मात्र त्यात तो बरयाचदा तो लाऊड वाटतो. कमी वयात नॉन ग्लॅमरस भुमिका करुन आलियाने परिपक्वतेचे दर्शन घडवले आहे. दिग्दर्शकाने भुमिकेसाठी तिला दिलेले मार्गदर्शन, पिंकीच्या भुमिकेत फायदेशीर ठरताना दिसते. करीना कपुर डॉक्टर म्हणुन आपली भुमिका व्यवस्थित वठवते. तर दरजीत दोसांजने, पोलिस अधिकारयाची भुमिकाही उत्तमरीत्या वठवलेली पहायला मिळते.  



देढ इश्कीया आणि इश्कीया या चित्रपटानंतर वेगळ्या विषयाचे चित्रपट तयार करणे हि दिग्दर्शक अभिषेक चौबे यांची खासीयत होऊ पाहत आहे. या वेळेला तरुण पिढीला पोखरणारया ड्रग या विषयाला त्यांनी सादर करायला घेतलं आहे. सक्षक्त कथानक, प्रवाही पटकथा आणि चपखल बसणारया कलाकारांची निवड हि कोणत्याही चित्रपटाला यशाच्या जवळ नेण्याची साधने होय. दिग्दर्शकाने पटकथेसाठी संशोधन केल्याचे दिसुन येते. मात्र त्यावर कमकुवत प्लॉट असेल तर...सगळं फुकट. प्रेक्षकांना गुंतवुन ठेवण्यासाठी दिग्दर्शकाने थ्रिलरची फोडणी देखिल दिली आहे. त्यासाठी प्रेक्षकांची दाद मिळवायला ते यशस्वी देखिल ठरतात. चित्रपटाचा पुर्वाध उत्तम रंगताना दिसुन येतो. तर उत्तरार्धात मात्र चित्रपट ढेपाळताना दिसतो. त्यामुळेच कदाचित, चारही पात्रांना एकत्रीत आणले असते तर हा प्रश्न डोकावतो. चित्रपटभर पंजाबी भाषेचा वापर अधिक असल्याने, हिंदी भाषिक प्रेक्षकांना चित्रपट समजण्यासाठी अडथळा ठरतो. चित्रपटभर असलेल्या शिव्यांमुळे फॅमेली प्रेक्षक चित्रपटापासुन लांब राहील.  तर महिला वर्ग ही चित्रपटापासुन लांबच राहील असे दिसते. मोजके संवाद पंजाब मधिल तरुण पिढी आणि सामाजिक परिस्थितीवर समर्पक हल्ला करणारे आहेत. एकंदरीत वास्तवदर्शी लोकेशन्स, उत्तम तंत्रज्ञान आणि सिनेमेटॉग्रीफीने चित्रपटाचा दर्जा वाढताना दिसतो. तर व्यावसायिक चित्रपटासाठी म्हणुन, पटकथेवर मेहनत घ्यायची गरज दिसुन येते. ज्या चित्रपटाच्या कथानकात रॉकस्ट्रार आहे त्या चित्रपटाचे संगीत, मात्र फार फिके वाटले. तसेच ऐकही गाणं ओठावर बसणारं नाही.

उ़डता पंजाब विवादात का अडकला. ड्रगचे पंजाबमधिल रॅकेट कसे चालते तसेच ज्यांना शिव्या ऐकायची सवय असेल ते चित्रपट पहायला जाऊ शकतात. परंतु ज्यांना मनोरंजन पाहिजे, त्यांनी दुसरा पर्याय शोधलेला बरा. सोबत लिक झालेली या चित्रपटाची कॉपी, याचा उ़़डता पंजाबला फटका बसेल असे दिसते.





No comments:

Post a Comment