Tuesday 7 June 2016

INTERVIEW with Randeep Hooda ( - I am married to the job)


भुमिका मला शोधत येतात - रणदीप होडा

-हर्षदा वेदपाठक

सरबजीत या चित्रपटामधिल अभिनयासाठी, रणदीप होडाची स्तुती सार्वत्रीक होत आहे. त्याच लाटेवर स्वार होत, दो लफ्जोंकी कहानी या चित्रपटामध्ये तो ऐका वेगळ्या भुमिकेत दिसणार आहे. त्याबद्दल त्याच्याबरोबर केलेली बातचित,

सरबजीतमधिल तुझ्या भुमिका सर्व स्तरावर पसंद केली गेली. इतकी योग्य भुमिका साकारल्याचे समाधान वाटले ?

हि भुमिका साकारताना मी स्वतामध्ये जे बदल पाहिलेत, त्यायोगे मी स्वताला चांगला माणुस घडवायच्या दिशेनं प्रयत्न करत राहीन हे समजावले आहे. मला वाटते तो चित्रपट ऐका माणसाच्या विजयाची कथा सांगणारा होता.

बरं दो लफ्जोंकी कहानी या चित्रपटात तु बॉक्सरच्या भुमिकेत आहेस, त्याची तयारी कशी काय केलीस?

खुप मेहनत करावी लागली. कारण सरबजीत मध्ये मला वजन कमी करावे लागले तर या चित्रपटासाठी वाढवावे लागले. दो लफ्जोंकी कहानी हा चित्रपट कोरीयन चित्रपटाचा रिमेक असल्याने त्याचा फायदा मला झाला. भुमिका हि बॉक्सरची असल्याने मलाच मेहनत कराली लागणार हे सत्य होतं. दिपक तिजोरी हे अभिनेता आणि दिग्दर्शक असल्याचा देखिल फायदा झाला.

दो लफ्जोंकी कहानी या चित्रपटात काजल आणि तुझा किसींग सिन आहे, पण त्यावरुन खुप बातम्या येत होत्यात ?

ते दृष्य चित्रपटाच्या संहितेमध्ये सुरवातीपासुनच होते. ते माहित असुनच कलाकारांनी चित्रपट स्विकारला मग त्यावरुन वादंग उठण्याचे कारणच नाही.

तुझे हल्ली प्रदर्शित झालेले काही चित्रपट पाहता प्रत्येक भुमिकेत अधोरेखित वास्तव दिसुन येते. हल्ली तुझी चित्रपट स्विकारायची पध्दती बदलली आहे काय ?

संहिता, दिग्दर्शक आणि माझी भुमिका या तिन गोष्टी पाहुनच मी चित्रपट स्विकारीत होतो, तिच पध्दती आतासुध्दा वापरतो.

सरबजीत मधिल भुमिकेसाठी तुला अमिताभ बच्चन यांनी पत्र लिहिले होते. त्याबद्दल काय सांगशिल?

त्या चित्रपटाला यश मिळायचे खरे कारण म्हणजे ती ऐक भावनिक कथा होती, जी सगळ्यांच्याच हदयाला भिडली. आता मी 39 वर्षाचा आहे, मला अजुन बरच काही करायचं आहे. मला वाटतं मी भुमिकांना शोधत जाण्यापेक्षा, भुमिका मला शोधत येतात. आणि अभिनेता म्हणुन ती माझी सशक्तता आहे.

सलमान खानच्या प्रत्येक चित्रपटात तु दिसु लागला आहेस, सुल्तानमध्ये पण तु आहेस. काय सांगशिल त्याबद्दल ?

तो ऐक उत्तम कलाकार आहे. आमच्यामधिल समजुत उत्तम असल्याने ती केमीस्टी पडदयावर पहायला मिळते.  

कलाकार पुत्र जर चित्रपटसृष्टीत येत राहीलेत तर बाहेरच्या लोकांना काम मिळणे कठीण होउन जाईल असे वाटते काय ?

कलाकार पुत्र काय किंवा बाहेरची कोणी व्यक्ती काय, जर ती योग्यतेची असेल तर तिला काम मिळत जाईल

तु लग्न कधी करत आहेस ?

आधि भाईचे (सलमान खान) लग्न होऊ दया मग मी लग्न करतो. तो पर्यत आय ऍम मॅरीड टु द जॉब.

No comments:

Post a Comment