Saturday 25 June 2016

INTERVIEW WITH ANIL KAPOOR ON 24 (II)


भुमिकांसाठी मी अनेकदा धोका देखिल पत्करला आहे - अनिल कपुर


हर्षदा वेदपाठक


24 या मालिकेला लाभलेल्या यशानंतर, निर्माता अनिल कपुर त्याच मालिकेच्या भाग दोनसह येत आहेत. काही दिवसांपुर्वी या मालिकेच्या ट्रेलर प्रदर्शिन निमित्तानं पत्रकार परिषदचे आयोजन करण्यात आलं होत. त्यास आमीर खान आणि सोनम कपुर यांची खास उपस्थिती होती. या कार्यक्रमानंतर एकदम झक्कास मुडमध्ये असलेल्या अनिल कपुर यांच्याबरोबर केलेली बातचित...


आमिर खान, 24 च्या ट्रेलर प्रदर्शन कार्यक्रमाला आल्याने ते या मालिकेत काम करत आहेत या चर्चेला उधाण आलं होतं, “आमीर खान जर या मालिकेचा हिस्सा होणार असेल तर मला नक्कीच आनंद आहे. पण 24 सिझन दोन मध्ये तरी ते काम करत नाहीत. अनिल कपुर स्पष्ट करतात.


अनिल कपुर यांना विदेशात पहिल्यांदा प्रसिध्दी मिळवुन देण्यात मुळ इंग्रजी मालिका 24 तसेच स्लमडॉग मिलयेनर, मिशन इम्पॉसिबल, घोस्ट प्रोटकॉल या चित्रपटांचा हात आहे. मालिका आणि चित्रपटांची सांगड घालणे खुप कठीण असल्याचे ते मानतात, आमीर माझ्यापेक्षा लहान आहे, पण कामाच्या बाबतित त्याच्याकडुन बरच काही शिकण्यासारखे आहे. तो जेव्हा सत्यमेव जयते हि मालिका करीत होता तेव्हा त्याने दुसरं काहीही काम हातात घेतलं नव्हतं. ते कोणबरं विसरेल.


ते पुढे सांगतात, मी जेव्हा 24 च्या चित्रीकरणाला सुरवात करणार होतो, तेव्हा मला अनेक देशीविदेशी चित्रपटांच्या ऑफऱ होत्यात. पण मी त्या स्विकारु शकलो नाही कारण मालिकेचं चित्रीकरण सुरु व्हायचे होते. तसचे दिल धडकने दो आणि वेलकम बॅक या चित्रपटासाठी मी तारखा दिलेल्या होत्यात.


अनिल कपुर यांनी मॉर्डन फॅमेली आणि प्रिझन ब्रेक या अमेरिकन मालिकांच्या रिेमेकचे हक्क विकत घेतले आहेत. त्यावर ते एखादया मुळ कथानकावर मालिका तयार करायचे स्वप्न सांगायला विसरत नाहीत. ऐक अभिनेता आणि कालाकार म्हणुन आता समृध्द झाल्याचं ते कबुल करतात. प्रत्येक दिवशी काहीना काही शिकायचा प्रयत्न करतो. 24 या मालिकेनं तर मला बरच काही शिकवलं आहे. आता मी वेगळं काही करण्याचा विचार करत आहे, ज्याला जगभर पसंद केलं जाईल असं मला वाटतं.


24 सिझन दोन ची माहिती देताना ते सांगतात, ऐ.टी.एस. अधिकारी जय सिंग राठो़ड परत येतो ते, देशाला एका प्राणघातक वायरस पासुन वाचवण्यासाठी.शरीर आणि मेंदु थकवणारी अशी हि आव्हानात्मक भुमिका आहे. या मालिकेचे फॉरमॅट, माझी भुमिका, कन्टेड आणि ज्या प्रकारे कथा प्रवाह जातो, ते सगळं थक्क करणारं आहे. म्हणुनच मी या मालिकेच्या प्रेमात आहे. मला वाटतं, प्रेक्षकांनी पण ती मालिका आवडेल.


अश्या या दमवणारया भुमिकेसाठी काय तयारी केली विचारता ते सांगतात, मी माझ्या आवाजावर मेहनत घेतली, त्यानंतर माझ्या बॉडी लॅग्वेजवर अधिक लक्ष दिले. माझ्यामधिल हा वेगळेपणा तुम्हाला या भागातच पहायला मिळेल. आणि हा वेगळेपणा हि मालिकाभर टिकवायचा आहे. कारण पहिल्या भागापेक्षा, जय सिंग राठोड या भागात ज्या परिस्थितीमधुन जातो त्यामुळे त्याला तसे वागणे भाग असते.


24 सिझन दोनमध्ये जय सिंग राठोड हा ऍन्टी हिरो अधिक वाटतो, पहिल्या भागात देखिल तो तसाच होता. जय सिंग हा ग्रे आहे, असं मी म्हणेन. तो वास्तवदर्शी आहे. टिप्पीकल हिरो नाही तो. तसेच तो जेम्स बॉन्ड देखिल नाही. तो चुका देखिल करतो. मात्र तो भाग ऐकच्या तुलनेत खुप डार्क आहे.


या मालिकेमध्ये तब्बु काम करणार अशी ऐक बातमी येत होती, तब्बु ऐक उत्तम अभिनेत्री आहे हे आपण सगळेच जाणतो. मी देखिल तिचा ऐक चाहता आहे. या मालिकेसाठी आम्हाला कलाकारांच्या ठराविक तारखा लागणार होत्यात, त्या ती देऊ शकली नाही. येत्या भागामध्ये ती काम करेल, असं तिने मला वचन दिलं आहे. तब्बुबरोबर काम करायला मिळणं म्हणजे पण एक मो़ठी बाब आहे. कामामध्ये झोकुन देण्यारयांपैकी ती एक आहे. या सगळ्यात पैश्याचा काही मुद्दा नाही. जर तिनं हो म्हटलं तर मी तिला तिच्या फिच्या तुलनेत दहापट अधिक दयायला तयार आहे.


घरचीच मालिका असल्याने, सोनम या मालिकेत दिसेल काय विचारता ते सांगतात, तिला प्रमुख भुमिका तेवढी रंगवायची आहे. (हसुन) तसं झालं तर मी काय काम करणार....


सिझन दोन मध्ये, भाग एकच्या तलुनेत सगळेच कलाकार नविन आहेत. या भागात अनिल कपुर यांची प्रेमिका झालेल्या सुवरीन चावला बरोबर त्यांचे एक चुंबनदृष्य देखिल आहे. या वयात अशी दृष्य दिल्यावर घरी काय प्रतिक्रीया उमटली, मी अनेक वर्ष याक्षेत्रात काम करत आहे. घरी सगळे शिक्षित आणि स्वावलंबी आहेत. त्यामुळे ते जाणतात की ते दृष्य हे माझ्या व्यावसायाचा एक भाग आहे, त्यात काही विशेष नाही. मालिकेत देखिल आम्हाला शक्य तितक्या प्रकारे वास्तविकता दाखवायची होती त्यामुळे ते दृष्य त्यात घातले गेले. 


त्यांच्या वयाचे कलाकार जेथे एकाच चाकोरीबध्दतेमध्ये अडकले आहेत. तेथे अनिल कपुर वेगळेपणा देताना दिसतात, भुमिकेच्या लांबीपेक्षा, भुमिकेची सखोलता महत्वाची वाटते. त्यामुळेच मी लांब पल्ला टिकु शकलो असं मला वाटते. जेथे मी राम लखन केला, तेथे ईश्वर देखिल केला. चित्रपट निवडताना त्यात धोका देखिल पत्करला. मग तुम्ही लम्हे पहा, विसारत पहा. किंवा स्लमडॉग मिल्येनर सारखा चित्रपट बघा, ज्यात मी ग्रे शेडची भुमिका केली होती.


दिल धडकने दो या चित्रपटात तर ते प्रियांका चोपडा आणि रणवीर सिंग यांचे वडील देखिल झाले होतेत. मी तर आजोबा किंवा पणजोबा पण रंगवायला तयार आहे, चित्रपट तेवढा माझ्या सभोवती फिरणारा असला म्हणजे झाले, हे ते खोचकपणे सांगायला विसरत नाहीत.


आभिनेत्री म्हणुन सोनम तर निर्माती म्हणुन रिया जेथे स्थिरावल्या आहेत. तेथे त्यांचा मुलगा हर्षवर्धन हा राकेश ओमप्रकाश मेहता यांच्या, मर्झीया या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत येत आहे. त्याबद्दल विचारता ते सांगतात, मी फार कमी बोललेलं बरं. त्याचे काम आणि चित्रपटाने अधिक बोलले तर बरं होईल. अनेकांना तर मला दोन मुली आहेत हेच ठावुक होतं. मला मुलगा आहे, हेच अनेकांना माहित नव्हतं. त्यांना जेव्हा हर्षवर्धनबद्दल कळलं तर खुप आश्यर्य वाटलं. मर्झीयाची टिम मेहनती आहे. आणि हर्षवर्धन देखिल आपल्या कामाला घेऊन खुप आशावादी आहे….



No comments:

Post a Comment