सोशल
मिडीयामध्ये सगळच यायला पाहिजे – अमिताभ बच्चन
हर्षदा
वेदपाठक
वजीर
या चित्रपटात एक वेगळी भुमिका साकारल्यावर अमिताभ बच्चन हे तिन
या चित्रपटात दिसलेत. युध्द या मालिकेनंतर ते रिभु दासगुप्ता यांच्याबरोबर काम करीत
आहेत. तिन या चित्रपटाला पहिल्या आठवड्यात बारा करोडच्या आसपास गल्ला जमा करता
आला. ऐकंदरीत तिन हा चित्रपट, त्यांचे कलकत्ता प्रेम, त्यांनी तिनसाठी गायलेलं
गाणं या प्रश्नांना बगल देत फक्त सिनेमा आणि अवांतर विषयावर केलेली बातचित.....
वजीर
या चित्रपटानंतर पुन्हा एकदा थ्रीलर प्रकारातील तिन हा चित्रपट केलात. त्यामागे
पहिल्या चित्रपटापेक्षा वेगळा ऐक चित्रपट करायचा हा विचार होता काय ?
मिस्ट्री
किंवा थ्रीलर कोणत्याही प्रकारचा चित्रपट असो त्यात एक प्रश्नचिन्ह असतेच. त्या
अनुषंगे रोमॅन्टींक किंवा ऍक्शन चित्रपट हा कसा असेल ते देखिल ठरलेले असते. तसेच
थ्रीलर चित्रपटांचे असते. मी त्यासाठी खास प्रयत्न करत नाही, मात्र जे तसे चित्रपट
तयार करतात ते त्याबद्दल सांगु शकतात. मला जी नोकरी मिळते (भुमिका आवडते) ती मी
स्विकारतो.
आतापर्यंत
तुम्ही अनेक भुमिका केल्यात. त्यात कधी तुम्हाला वेगळेपणा देणे किंवा सुधारणा
करण्याची गरज वाटली काय ?
नक्कीच.
प्रत्येक भुमिका हि आमच्यासाठी आव्हान असते....मी त्यावर फारसा विचार करत नाही. अनेक
नविन कथा लिहील्या जात आहेत ते बघुन जरा बरं वाटतं, खासकरुन नवनविन दिग्दर्शक जे
असे विषय आणतात,
मला त्याचे अप्रुप वाटते. इतकेच नव्हे तर प्रेक्षक सुध्दा असे चित्रपट पसंद करु
लागले आहेत, त्यामुळे लेखक, निर्माता, दिग्दर्शकाला
नवनविन विषय आणायची हिम्मत होते. याखेरीज मला वाटतं टिव्ही आणि इन्टरनेटवर अश्या
अनेक गोष्टी येऊ लागल्या आहेत, ज्या चित्रपटांना निकराची स्पर्धा देऊ लागल्या
आहेत. विदेशी कन्डेन्टला सुध्दा विसरुन चालणार नाही. या सगळ्यामुळे प्रेक्षकाला
ड्रॉईंग रुममधुन सिनेमागृहात कसं काय आणायचं, तेच फार मोठं आव्हाऩ आहे.
तुम्ही
कारकीर्दीत आणि आयुष्यात अनेक चढउतारांना पाहिले असेल...सहन केले आहे. मात्र आताची
पिढी आव्हान सहन करु शकत नाही. त्यावर तरुण पिढीला काय सल्ला दयाल ?
प्रत्येकाच्या
जिवनात आव्हानं हि येतच असतात. त्यावर उपाय म्हणजे त्यांचा सामना करणे. मला वाटतं
त्यालाच जिवन म्हणतात...अडचणींचा सामना नाही केला तर जिवनात जगायचं कसं. प्रयत्नांमधुन
मार्ग काढण्याची सवय करावी आणि जो पर्यंत यश येत नाही तोपर्यंत प्रयत्न करणे हेच
आपल्या हातात आहे.
हरिवंशराय
बच्चन यांच्या कवितांना सोप्या भाषेत आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार अशी बातमी
होती. त्याबद्दल काय सांगाल ?
आजकालच्या
पिढीला कविता, संस्कृती, साहीत्य यात फारसा रस ऩाही असं दिसुन येत आहे. हल्लीची
मुले आपली मातृभाषा सोडुन इंग्रजीमध्ये अधिक रमतात. ते पाहुन जयाला सुचलं की, का
नाही बाबुजींच्या कवितांचा अनुवाद त्यात्या भाषेत करावा. सोबत त्याचा इंग्रजी
अवतार ही दयायचा. मधुशाला हे 1933 साली लिहीलं गेलेले काव्य होतं. 1940 दरम्यान
ऑक्सफर्ड विश्वविदयालयातील ऐका प्राध्यापिकेनं त्याचा द हाऊस ऑफ वाईन या नावानं इंग्रजी
अऩुवाद केला होता. त्याला सर्वस्तरावर पसंद केलं गेलं होतं. बाबुंजींच्या
शंभराव्या जयंतीनिमीत्तानं आम्ही एक पुस्तक तयार केलं होतं. त्यात एका बाजुला
मधुशाला हिंदीत छापली होती आणि त्याच्याबाजुला इंग्रजी भाषांतर सादर केले होतं.
त्याला देखिल खुप पसंती मिळाली होती. बरयाचदा मी जेव्हा विदेशात जातो तेव्हा ज्या
लोकांना हिंदी समजत नाही, त्यांसाठी बाबुजींच्या हिंदी कवितांचा तेथे बसल्याबसल्या
अनुवाद देखिल करतो. तो त्यांना आवडतो. अश्याच ऐका मैफीली दरम्यान त्या मंडळींनी मला
त्या कवितांचे जमेल तितके भाषांतर करायला सांगितले, आणि पुढे ते आपापल्या भाषेत ते
करतील हा प्रस्ताव आला. सध्या त्याच्यावर काम सुरु आहे.
सबरजीत
हा चित्रपट पाहुन तुम्ही अभिनेता रणदिप होडा याला स्तुतीपर पत्र पाठवलेत. तुमच्या
काळात तुम्हाला कोणी तसे पत्र लिहिले होते काय. त्याच चित्रपटात ऐश्वर्याचे काम पण
उत्तम होते, तिला देखिल पत्र लिहिलेत काय ?
कोणी
चांगलं काम केलं, तर मी त्याला पत्र पाठवतो आणि मला ते आवडते देखिल. मला मात्र तसे
पत्र कोणी लिहीलेच नाही. ऐश्वर्या तर घरातलीच आहे, तिला काय पत्र लिहीणार आणि
घरातल्या लोकांची स्तुती जाहीर करणे योग्य देखिल नव्हे.
तुमच्या
तिन्ही बंगल्यांची नावे अऩोखी आहेत. त्याबद्दल थोडक्यात सांगाल ?
प्रतिक्षा
हे बंगल्याचे नाव ठेवण्यामागचे कारण म्हणजे, बाबुजींच्या कवितेमधिल ऐक ओळ होती. ..स्वागत
सबके लिये, यहॉ पर नही किसी के लिये प्रतिक्षा...त्यावर माझ्या पहिल्या बंगल्याचे नाव
प्रतिक्षा ठेवलं. जलसा या बंगल्याचे खरं नाव मनसा होतं. आमच्या घराण्यात जी पहिली
स्त्री होती तिचं नाव मनसा होतं. हि माहिती तुम्हाला बाबुजींच्या आत्मकथेमध्ये
सुध्दा वाचायला मिळेल. मनसा हे नाव जेव्हा ठेवलं तेव्हा लोकांनी सांगीतले की ते नाव
ठेवु नका. हल्लीच आम्ही एक लहान जमीनीचा तुकडा जलसाला लागुनच विकत घेतला आहे.
त्याचं नाव मनसा ठेवलं आहे. जनक हे नाव बाबुजींच्या सांगण्यावरुन ठेवले गेले होते.
तुमचे
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या जवळ असणे. त्यानंतर पनामा इश्युमध्ये तुमचे नाव
येणे या दोन मुद्यांना सोशल मिडीयावर खुप प्रसिध्दी दिली गेली. त्याबद्दल काय मत
व्यक्त कराल ?
त्यावर
मी माझे स्पष्टीकरण आधिच दिलेले आहे. तरी माझी, मोदी यांच्याबरोबर जवळीक आहे असं
लोकं म्हणत असतील तर त्यात तथ्य नाही. काही वर्षीपुर्वी आम्ही पा हा चित्रपट केला
होता. त्या चित्रपटाला टॅक्स फ्री लेबल मिळावं म्हणुन, आम्ही प्रत्येक राज्याला
पत्र पाठवले होते. त्यावर निर्णय घ्यायला वेळ लागतो. म्हणुन आम्ही काही राज्यांचा दौरा
करायचे असे ठरवले. तसे केल्याने काम पटकन होईल हा विचार होता. असेच आम्ही गुजरातमधिल
सरकारी अधिकारयांना तो चित्रपट दाखवायला गेलो, तेव्हाचे मुख्यमंत्री मोदी होते. ते
म्हणाले मला देखिल तो चित्रपट पहायचा आहे. त्यांनी तो चित्रपट पाहिला आणि टॅक्स
फ्री केला. तेथे झालेल्या अवांतर गप्पांमध्ये मोदीजीनी, भारतात सगळ्यात जास्त आरकॉईलॉजिकल
वास्तु या गुजरात मध्ये असल्याची माहीती दिली. तेव्हा त्यांनी आम्हाला गुजरातमध्ये
येऊन चित्रीकरण करण्यासाठी आमंत्रण देखिल दिले. मी ते स्विकारले आणि गुजरातमधिल अश्या
या अमुल्य ठेव्याची लोकांना माहीती आहे काय म्हणुन विचारले तर त्यांनी मला, तुमच्यातर्फेच
लोकांना माहिती दया असे सांगितले. दोन दिवसानंतर त्यांच्या टुरिस्ट विभागाची पुर्ण
टिमच येथे मला भेटायला आली. आणि आम्ही त्या विषयावर माहितीपट केला.
पनामा
विषयाचे म्हणाल तर, त्यावर वृत्तपत्रामध्ये छापुन आल्यावर सरकारतर्फ एक कमीटी
स्थापली गेलीय. त्यांनी मला पाठवलेल्या सगळ्या नोटीसींना मी उत्तर दिलय. यानंतरही
त्या कमीटीची काही मागणी असेल, तर मी
त्यांना त्यात सहयोग देईन.
सोशल
मिडीया मधिल कमेन्टसला तुम्ही कितपत महत्व देता ?
सोशल
मिडीयामध्येय सगळच यायला पाहिजे या मताचा मी आहे. मत व्यक्त करण्यापासुन मी कोणाला
थांबवत नाही. हल्लीच्या या माध्यमाने सगळ्यांना एक आवाज दिला आहे. सुरवातीला लोकं
काय विचार करत होते, ते समजत नव्हतं निदान आता बरयाच गोष्टी कळुन येत आहेत.
प्रत्येकामध्ये काहींना काही तरी कमतरता असते. लोकं जेव्हा सांगतात तेव्हा एैकायला
काय हरकत आहे असं मला वाटतं. माझ्या प्रत्येक सोशल मिडीयावर रिसपॉन्स हे ऐक सदर
आहे. तेथे माझ्या प्रत्येक वाचकाला मत प्रदर्शित करायचा अधिकार दिलेला आहे. त्यांनी
मांडलेल्या त्या मतावर देखिल मला मत मांडण्याची सोय आम्ही केलेली आहे. याप्रकारे
मी वाचक आणि लेखक असा संबध जपला आहे. माझे सगळे चाहते हे खुपच सक्षम आहेत असं मला
वाटतं. ते माझ्या प्रत्येक कामाला, चित्रपटाला बारकाईने पाहतात आणि मत व्यक्त
करतात. जेथे अश्लिल शब्द वापरले जातात तेथे मी त्यांना वेळीच थोपवुन तसे शब्द वापरु
नये असा सल्ला देतो. आणि तरी देखिल ती व्यक्ती एैकत नसेल तर मात्र त्याला ब्लॉक
करतो.
हल्ली
मराठी चित्रपटांना जो सुगीचा काळ लाभला आहे त्याबद्दल काय सांगाल ?
हे
आताचं यश नाही. तर खुप आधिपासुनच मराठी सिनेमा, साहीत्य हे संपन्न राहीलं आहे. बाबुजींच्या
कवितांचा पहिला अनुवाद हा मराठीत झाला होता. त्यामुळे मराठी साहीत्य हे नेहमीच
जागरुक राहीलं आहे असं मी म्हणेन. चित्रपटांच म्हणाल तर मराठी सिनेमा देखिल उत्तम
आहेत असच मी म्हणेन. ह्ल्ली खुपच मराठी सिनेमा येत आहेत. मी त्यांचा प्रसंशक आहे.
माझे मेकअप आर्टीस्ट दिपक सावंत यांच्या काही मराठी चित्रपटांत मी काम देखिल केलं
आहे. मी सुध्दा मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. मध्यंतरी मला महेश
मांजरेकरने, हिंदी नटसम्राटमध्ये काम करण्यासाठी विचारले होते. पण मी जेव्हा नाना
पाटेकर यांचा अभिनय पाहिला, तेव्हाच ठरवलं हि या अभिनयाच्या पुढे कोणी जाऊच शकत
नाही. इतकं सुंदर काम त्यांनी केलं आहे. त्यांच्या स्पर्धेत मी जाणं योग्य ठरणार नाही.
म्हणुन मी त्यांना नकार देऊन टाकला.
सरतेशेवटी
आयुष्याचा धडा म्हणुन काय सांगाल ?
मनका
हो तो अच्छा ना हो तो ज्यादा अच्छा...हे मी खुप वेळा सांगीतलं आहे आणि त्यावर माझा
विश्वास देखिल आहे.
No comments:
Post a Comment