Monday, 4 April 2016

Review - Kung Fu Panda 3, a delightful experience

Kung Fu Panda 3 Review - By Harshada Vedpathak


हा गरमीचा सिजन अगदी मनोरंजनाच्या कुशीत घालवायचा असेल तर कुंम्फु पान्डां 3 हा चित्रपट ऐक अतिशय उत्तम पर्याय म्हुणुन या आठवड्यात उपलब्ध झालाय. एक अजय योध्दा म्हणुन नावारुपाला येण्याचं भाग्य लाभलेला पो हा पांडा, स्वतसह विश्वास नसल्यागत अगदी थातुरमातुर कामामध्ये व्यस्त असतो. परंतु त्यांच्या कबील्यावर आलेल्या झोंबी योध्दाला ज्या शिताफतीने तो पछाडतो त्याचे चित्रण येथे पहायला मिळते. थ्री डी या तंत्रज्ञानाचा अतिशय सुंदर प्रयोग या चित्रपटात केलेला दिसुन येतो. आतापर्यत पाहिलेल्या पांडा सिरीजमधील भाग तिनमध्ये आधुनिक कथानकासह तंत्रज्ञानाचा नयनरम्यरीत्या केलेला वापर पहायला मिळतो.


लहान प्रेक्षकांना जेथे कुंम्फु पांडा खिळवुन ठेवतो तेथे हा चित्रपट मोठ्यांना पण विरंगुळा देणारा आहे, हि या चित्रपटाची खासीयत आहे.  पहिल्या दोन चित्रपटांमध्ये जेथे पांडा चे कथानक आपलेसे वाटत होते, तेथे भाग तिनमधिल भावनिक कथानकाची भरपाई, थ्री डीचे अऩोखेपण भरुन काढताना दिसते.


दिग्दर्शक अलेसझेन्डरो कारलोनी आणि जेनीफर युह नेल्सन यांनी कुंम्फु पांडा या चित्रपटात जॅक ब्लॅक, ऍन्जेलिना जोलीये, ब्रायन क्रॅनस्टोन, जे.के.सीमॉन्स, डस्टीन हॉफमन, जॅकी चॅन, केट हडसन या हॉलीवुडमधिल प्रसिध्द कलाकारांचा आवाज वापरल्यानं चित्रपटाला एक दमदार वलय प्राप्त झालं आहे. जेणेकरुन कुंम्फु पांडा हा चित्रपट मस्ट वॉच या सदरात बसत नसल्यास नवल. 

No comments:

Post a Comment