Monday, 11 April 2016

मोठया पडदयावर पहिल्यांदा गणवेशाचा आदर, अभिमान आणि जबाबदारी याचं भान टिपणारा "गणवेश"



       मोठया पडदयावर पहिल्यांदा गणवेशाचा आदरअभिमान आणि जबाबदारी याचं भान टिपणारा "गणवेश"  

'गणवेश' या शब्दाला एक अभियानआदर आणि कर्तव्यदक्षता अशा अर्थाचे तीन पदल जोडलेले आहेत.'गणवेश' आपल्या आयुष्यात वयासोबत वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक अर्थांनी बदलत जातो. 'विजयते एन्टरटेन्मेंट' निर्मित आणि अतुल जगदाळे दिग्दर्शित 'गणवेश' हा सुद्धा असाच लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसोबत सगळ्या टप्प्यांवर प्रवास करणारा ठरेल याची आम्हाला खात्री आहे. शाळेतल्या प्रत्येक मुलाने हा चित्रपट पहिलाच पाहिजे कारण यातून त्या मुलाला आयुष्यभरासाठी एक प्रेरणा मिळणार असून गणवेशाचा आदरअभिमान आणि जबाबदारी याचं भान त्याच्यामध्ये येणार आहे. शिक्षकांनीही मुले आणि पालकांसोबत हा चित्रपट पहावा कारण मुलांना प्रेरित करण्यासाठी तेच सर्वप्रथम त्यांच्या आयुष्यात येणारा घटक आहेत. लहानपणी या शिक्षकांनी आम्हाला आमच्या पालकांसोबत 'गणवेश' चित्रपट दाखविला होता ही आठवण विद्यार्थी आणि शिक्षक दोघांसाठीची आनंददायी ठेव असणार आहे.

महाराष्ट्रातील शाळांमध्ये 'गणवेश' चित्रपटाविषयी भलतेच आकर्षण असून अगदी पहिली पासून ते दहावी पर्यंतच्या मुलामुलींनी हा चित्रपट पहाण्याचा निश्चय व्यक्त करीत चित्रपटाच्या 'टीझर'चे कौतुक केले आहे. या चित्रपटातील छोटा दोस्त मधुकरला भेटण्यासाठी तमाम बालदोस्तमध्ये विशेष कुतूहल तयार झाले आहे.


'गणवेश' सर्वांपर्यंत पोहचावा म्हणून विशेष टीम तयार करण्यात आली असून ती महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये या चित्रपटाविषयी माहिती देऊन हा चित्रपट विद्यार्थीपालक आणि शिक्षकांना या चित्रपटाचे महत्व कथन करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना विशेष यश प्राप्त होत असून अंतरराष्ट्रीय बँक आयसीआयसीआयही या मोहिमेत सक्रिय सहभागी झाली आहे. 'गणवेश' पाहिल्यानंतर हा अनुभव नेमका कसा होताह्यावर निबंध मालिकेतून व्यक्त होण्याची विद्यार्थी मित्रांना संधी मिळणार असून त्यांच्या विचारांना एक व्यासपीठ देत महाराष्ट्रातील भावी युवा पिढीच्या विचारधारेचा मागोवा घेऊन त्यातून'सर्वोत्कृष्ठ निबंधकारनिवडून त्यांना रोख रक्कमेद्वारे गौरविले जाणार आहे. महाराष्ट्रातील २५ हजार शाळांतील विद्यार्थ्यांपर्यंत 'गणवेश'चे स्वयंसेवक पोहचण्यासाठी प्रयत्नशील  आहेत.

प्रसिद्ध सिनेमॉटोग्रफर अतुल जगदाळे 'गणवेश'द्वारे दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत करीत असून एका आगळ्या वेगळ्या विषयावरील या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच सर्वांचे लक्ष वेधले आहे.

'विजयते एन्टरटेन्मेंट' या संस्थेने 'गणवेश'ची निर्मिती केली आहे. प्रसिद्ध कॅमेरामन अतुल जगदाळे निर्मिती दिग्दर्शनात 'गणवेश'सोबत पदार्पण करीत आहेत. लोकप्रिय गीतकार गुरु ठाकूर यांच्या गीतांना संगीतकार निहार शेंबेकर यांनी संगीत दिले आहे. 'गणवेश'ला आघाडीचे गायक नंदेश उमप आणि उर्मिला धनगर यांनी स्वरसाज चढवला आहेतर पार्श्वसंगीत मंगेश धाकडे यांचे आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत किशोर कदम,मुक्ता बर्वेदिलीप प्रभावळकरस्मिता तांबेगुरु ठाकूरनागेश भोसलेसुहास पळशीकरगणेश यादवशरद पोंक्षे आणि बालकलाकार तन्मय मांडे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

No comments:

Post a Comment