Friday, 22 April 2016

Interview - Randeep Hooda on Laal Rang



आम्हाला अपयश झेलता येतं मात्र यश पचवता येत नाही – रणदिप होडा
-      हर्षदा वेदपाठक
भुमिका कितीही कठीण असो, पडदयावर तिला  अगदी सहजरीत्या साकारण्यात रणदिप होडा याचा हातखंडा आहे. हायवे, रंगरसीया, मै और चार्लस् या चित्रपटांमध्ये विवीधता देणारा रणदिप, लाल रंग या चित्रपटात ब्लड माफियाच्या भुमिकेत दिसेल. त्याबद्दल त्याच्याबरोबर केलेली बातचित,

लाल रंग या चित्रपटाची खासीयत काय सांगशिल ?

मी मुळात हरयाणाचा आहे आणि त्या चित्रपटाची पार्श्वभुमी हरयाणाची आहे. त्यामुळे लाल रंग या चित्रपटात मी बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्यांदा हरयाणवी संवाद बोलताना मी थोडा बाचकलो देखिल होतो. बालपणीची आठवण काढत, शब्दांचे उच्चार आणि लकब बरोबर आली की नाही हेच आठवत होतो. दिग्दर्शक अफझल जेव्हा माझ्याकडे या चित्रपटाची संहीता घेऊन आला तेव्हा मला तो विषय मला फार भावला. कारण ब्लड माफीया हा प्रकारच मुळात फार तुच्छ आहे. सोबत प्रेम, दोस्ती आणि दगाबाजी हे विषय देखिल आहेतच. आणि म्हणुनच हा चित्रपट मी स्विकारला. अगदी मस्तमौला आणि दबंग अशी हि भुमिका आहे आणि पहिल्यांदाच मी ती साकारत आहे.

ब्लड माफिया या विषयच मुळात घाबरवणारा विषय आहे ?

रक्ताची स्मगलिंग या विषयावर लाल रंग हा चित्रपट आधारीत आहे. ब्लड बॅन्कचा एक नियम असतो त्या अंतर्गत जो रक्त घेउन जातो त्यालाच ते परत दयायचे असते, त्यांना रक्त विकायची परवानगी नसते. आपल्याकडे रक्तदानाचे विवीध गैरसमज आहेत. त्यात ज्या पुरुषांची नसबंदी झाली असेल आणि त्यानं रक्त दान केलं तर त्याला वाटते की तो कमकुवत होईल म्हणुन. यासह अनेक चुकीचे गैरसमज आहेत. पण रक्त दान केल्यावर, तुमचं रक्त काही महिन्यातच पुन्हा त्याच पातळीत तैय्यार होत. त्यामुळे लोकं रक्ताच्या बदल्यात पैसे देणं पसंद करतात. त्यात कधीकधी रक्ताची किंमत पाच हजारापर्यत पण जाते. त्याची भरपाई मग एखादा रिक्शावाला किंवा गरीबाला पकडुन पाचशे रुपये आणि बिस्कीटाचं पॉकेट देऊन करतात. आणि बाकी साडेचार हजार माफीयाच्या खिशात जातात. हे वास्तव दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कथानक हरियाणात घडत असल्यानं थोडं मनोरंजक झालय. भारताच्या दुसरया कोपरयात हे कथानक घडलं असतं तर ते डार्क क्राईम स्टोरी म्हणुन चालुन गेलं असते.

लाल रंग हा प्रेम आणि रागचे प्रतिक आहे. तुझ्या लेखी लाला रंगाचा अर्थ काय ?

(हसुन) सध्या तरी लाल रंगाचा अर्थ माझ्यासाठी रक्त हाच आहे. खरं सांगायचं तर लाल रंग हा माझा आवडता रंग आहे. जेव्हा केव्हा मला संधी मिळते तेव्हा मी लाल रंगाचे कपडे वापरतो. लाल रंग हा फॅशन आणि रुबाबाचा रंग आहे. माझ्यासाठी लाल रंग एक जुनुन आहे.

चित्रपटसृष्टीत आऊटसायडर होण्याचा कितपत फायदा किंवा नुकसान असते, असं तुला वाटतं ?

रोहतक सारख्या लहान शहरातुन येऊन आज मी या मुक्कामाला पोहोचलोय त्याचा मला अभिमान आहे. ऐका कलाकाराला अभिनय करणे, वजन वाढवणे किंवा कमी करणे, नृत्य करणे, भाषा शिकणे हे अजिबात कठीण नाही तर काम मिळवणं हेच सगळयात कठीण काम आहे. त्यानंतर फरक सुरु होतो तो इंन्डस्टी आणि नॉन इंन्डस्टीमध्ये. येथे कालाकारांच्या मुलांना कमीतकमी पहिली संधी तरी मिळते. मग त्यांनी काम बरोबर नाही जरी केलं तरी त्यांची स्तुती होते. मी मात्र या सगळ्या प्रकाराला नकारात्मक घेतलेलं नाही तर, मला अजुनही या इंन्डस्टीची चालचलणुक अजुन कळलेली नाहीयय. लहान शहरात राहणारया लोकांचा एक अडचण असते आणि ती म्हणजे, आम्हाला अपयश झेलता येतं मात्र यश पचवणे जमत नाही. एखादया चित्रपटासाठी जेव्हा कास्टींग होत असते तेव्हा त्याची बातमी मला अजिबात समजत नाही तर, इंन्डस्टीमधिल लोकांना त्याची बरोबर माहिती असते. माझी कारकीर्द अशीच सुरु आहे, ज्या काही कामासाठी मला विचारणा होते, त्यापैकी उत्तम काम निवडुन साकारायचा प्रयत्न मी करतो.

बरयाचदा चित्रपट चालत नाहीत. तेव्हा त्या नकारात्मकतेला, अपयशाला तु कश्या प्रकारे पचवतोस ?

चित्रपट कोणत्याही प्रकारचा असो त्यासाठी मेहनत ही करावीच लागते. मला वाटतं, की कथानक उत्तम होतं त्यामुळे चित्रपट लोकांना आवडेल पण तसे होत नाही. चित्रपटाच्या यशात, जाहीरातींचा खुप मोठा हात असतो. बरयाचदा चांगले चित्रपट लोकांपर्यत पोहोचतच नाहीत. किंवा त्या चित्रपटांना तितकी प्रसिधीदी मिळत नसावी कदाचित. तर बरेचदा अतीप्रसिद्दी केलेले चित्रपट हे रद्दीच असतात. तर कधी चांगल्या चित्रपटांना प्रेक्षक लाभत नाहीत. मला वाटते इंडस्टीत हा बॅलेन्स होणं फार महत्वाचे आहे. तुरळक चित्रपट वगळता मला माझ्या अधिकतर चित्रपटांचा अभिमान आहे.

No comments:

Post a Comment