Tuesday, 26 April 2016

Children drama competition in Marathi

अ.भा.मराठी नाट्य परिषदेचे पहिले बालनाट्य संमेलन नोव्हेंबर २०१५ रोजी सोलापूर येथे संपन्न झाले. संमेलनाला बालचमुंचा, शिक्षकांचा आणि प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. रंगभूमीच्या उज्वल भविष्याचा विचार करता, बालरंगभूमी जास्त परिपूर्ण, सकस आणि निकोप होणे गरजेचे आहे. आजचा बाल कलाकार हा उद्याचा उज्वल आणि सर्वांग सुंदर असा कलाकार बनू शकतो. ह्याचसाठी नाट्य परिषदेतर्फे, पहिल्या बालनाट्य संमेलनाध्यक्षा मा. सौ. कांचनताई सोनटक्के, ह्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई, पुणे, सांगली, अकोला, औरंगाबाद, नांदेड इ. ठिकाणी एक दिवसांची शिबीरे आयोजित करण्यात आली होती. सदर शिबिरांमध्ये कांचनताईंनी शिक्षक, बालनाट्य लेखक व दिग्दर्शक यांना बालरंगभूमी विषयी, त्याच्या लेखन आणि सादरीकरणाविषयी खूपच मोलाचा सल्ला दिला. नाट्य परिषदेच्या ५८ शाखांनी वेगवेगळ्या विभागाच्या ठिकाणी शाखेतर्फे ५ ते ६ शिबिरार्थी प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवले होते. सर्व शाखांकडून हया उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.

हया उपक्रमाचा पुढील टप्पा अ.भा.मराठी नाट्य परिषदेतर्फे आम्ही जाहीर करीत आहोत. परिषदेतर्फे बालनाट्य लेखन स्पर्धा घेण्यात येत आहेत. सदर स्पर्धेचे नियम व अटी तसेच स्पर्धकाने भरून पाठवण्याचे  फॉर्म सोबत जोडत आहोत, ते स्पर्धकांना द्यावेत.

आपण शाखाप्रमुख / नाट्यप्रेमी / बालरंगभूमीकार / पत्रकार हया नात्याने सदर माहिती लवकरात लवकर आपल्या स्थानिक वर्तमान पत्रात छापण्यास द्यावी. आपल्या शाखेकडून जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा ही अपेक्षा. नाट्य परिषदेतर्फे बाल रंगभूमीसाठी सुरु केलेली ही चळवळ आपल्या मार्फत गावोगावी पोहोचले ह्यात शंका नाही.

बालनाट्य संहिता पाठवण्याची अंतिम तारीख ७ जून २०१६ ही असून संहिता अ.भा.मराठी नाट्य परिषदेच्या, मुंबई कार्यालयात पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी दुपारी २ ते ७ या वेळेत फोन.नं. ०२२-२४३००५९४, ०२२-२४३७७६४९ येथे संपर्क साधावा.

बालनाट्य लेखन स्पर्धा

नियम व अटी :-

०१ )        बालनाट्य लेखन ४० ते ५० मिनिटांच्या सादरीकरणासाठी असावे. (हस्त / टंक लिखित)
०२ )        आशय -  विषयाची मांडणी व कथानक ५ ते १२ हया वयोगटासाठी अनुकूल व पोषक असावे.
(पालक, शिक्षक व मोठ्या व्यक्तींचे प्रबोधन करणारे विषय नसावे.)
०३ )        बालनाट्य संहिता ही पूर्णपणे नवीन असावी. सदर बालनाट्याचा प्रयोग हया पूर्वी कोठेही झालेला नसावा
०४)        स्पर्धेचा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात, स्थानिक वृत्तपत्रातून जाहीर करण्यात येईल. त्यासाठी स्पर्धकांशी वेगळा पत्रव्यवहार केला जाणार नाही.
०५)         परीक्षकांचा निर्णय स्पर्धकांना / सर्वांना बंधनकारक राहील.
०६)         बालनाट्य संहिता पाठवण्याची अंतिम तारीख ७ जून २०१६ असून संहिता ३ प्रतीत खालील पत्यावर                                                                                                                                                                                                                                              पाठवाव्यात. अंतिम तारखेनंतर आलेल्या संहितांचा विचार स्पर्धेसाठी केला जाणार नाही.
पत्ता – अ.भा.मराठी नाट्य परिषद, यशवंत नाट्य मंदिर,
मनमाला टँक रोड, दादर-माटुंगा रोड, मुंबई ४०००१६                                                                                                                                                                                                                                                                                            फोन नं. ०२२-२४३००५९४
०७)         सर्वोत्कृष्ट दहा बालनाटिकांचा संग्रह पुस्तक रूपाने, परिषदेच्या नावे, प्रकाशित केला जाईल.
०८)         प्रकाशनाचे सर्व हक्क परिषदेकडे राहतील.
०९)         ह्यासाठी पारितोषिका व्यतिरिक्त, परिषदेतर्फे लेखकास कोणतेही मानधन दिले जाणार नाही.
१०)         नाट्य परिषदेचे सभासद असणे स्पर्धकावर बंधनकारक नाही.

v पारितोषिकांचा तपशील खालील प्रमाणे
·       प्रथम क्रमांक – रोख रु. ७०००/-
·       द्वितीय क्रमांक – रोख रु. ५०००/-
·       तृतिय क्रमांक - रोख रु. ३०००/-

हया व्यतिरिक्त उत्तेजनार्थ सात पारितोषिके प्रत्येकी रु.१०००/- ची देण्यात येतील. 












No comments:

Post a Comment