स्टारडम कसे हाताळावे तेच
मला कळले नाही - अरविंद स्वामी
हर्षदा
वेदपाठक
विस वर्षापुर्वी रोजा आणि
बॉम्बे या दोन चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत आलेले अरविंद स्वामी स्टार
झाले खरे. पण मागिल पंधरा वर्ष ते गायबच होतेत, त्यामागे वैयक्तीक प्रश्न आणि
अपघात हे कारण ते सांगतात. आता ते पुन्हा ऐकदा चर्चत आले आहेत ते डीअर डॅड या
चित्रपटाद्वारे. मुलाखतीदरम्यान ते सिंगल पॅरेन्टींग आणि बिझनेसमध्ये बिझी
असल्याचे देखिल ते कबुल करतात. एकंदरीत अरविंद स्वामी हे रसायन जाणुन घेण्याचा हा
प्रयत्न...
बॉम्बे, रोजा सारखे सुपरहिट
चित्रपट केल्यावर तुम्ही गायब झालात, नंतर काही वर्षापुर्वी राजा को रानी से प्यार
हो गया (2000) हा चित्रपट केलात त्यानंतर तुम्ही चित्रपटसृष्टीपासुन लांबच गेलात ?
मी जेव्हा थलापती या दाक्षिणात्य चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत आलो, तेव्हा केवळ विस वर्षाचा होतो. रोजा
दरम्यान मी ऐकवीस वर्षाचा होतो तर बॉम्बेदरम्यान तेविस वर्षाचा. लोकांना आश्चर्य
वाटेल पण मी कधीच अभिनेता किंवा स्टार व्हायला आलो नव्हतो. जेव्हा मला प्रसिध्दी
मिळु लागली तेव्हा ते स्टारडम कसे हाताळावे ते मला कळले नाही. काही लोकं असतात
ज्यांना अभिनेताच व्हायचे असते. त्यामुळे त्यांना जेव्हा लोकांचे अटेन्शन मिळते ते
ऍन्जॉय करतात. मी मात्र माझ्या नावाची क्रेझ, फॅन्स लोकांचा वेडेपणा बघुन असहज
झालो. या सगळ्या गोष्टींना पचवायला मी तयार पण नव्हतो. त्यामुळे मला त्या ऍन्जॉय
देखिल करता आल्या नाहीत. वयाच्या ऐकोणतीसाव्या वर्षी आजुबाजुला पाहता मला लक्षात आले की मला आयुष्यात वेगळे काही तरी करायचे आहे. त्यात मला स्वतःला देखिल
शोधायचे होते. त्यामुळे अभिनयापासुन थोडं लांब जायला पाहिजे असं मला वाटलं. ऐक
स्टार या नात्यानं मी माझे स्वातंत्र्य हरवुन बसलो होतो हे मला जाणवलं. वैयक्तिकरीत्या
वेगळं काही करायचं ठरवल्यावर माझ्याकडे व्यावसाय आणि टेक्नॉलॉजी संबधीत काही
संकल्पना होत्या. माझी दोन मुलं आहेत त्यांनापण मला वेळ दयायचा होता. आज मागे वळुन
पाहताना वाटतं की आता मी मॅच्युअर्ड झालो आहे. आणि मला समजलं माझ्यामध्ये काय
प्रॉब्लेम होता तो... आता मी ते प्रश्न सोडवु शकतो. आयुष्याच्या या टप्पावर मी
स्वतःला फार उत्तमरीत्या समजु शकतो असे मला वाटते.
चित्रपटसृष्टीपासुन तुम्ही
जेव्हा लांब होतात तेव्हा काय करत होतात ?
व्यावसायातील काही बारकावे
शिकत होतो. तेथे मला अगदी सुरवातीपासुन शिकावं लागलं. कारण मला जो बिझनेस मिळणार होता तो मी स्टार
असल्यामुळे नव्हे तर माझ्या योग्यतेमुळे. त्यासाठी मला फार मेहनत करावी लागली. त्याखेरीज
माझ्या फादरहुडने मला दहा वर्ष खुप बिझी ठेवले. पुर्ण दहा वर्ष मी सिंगल पॅरेन्ट
राहीलो आहे. आज माझी मुलगी ऐकोणीस वर्षाची आहे तर मुलगा पंधरा वर्षाचा आहे. मी
वयाच्या पंचविशीमध्ये वडील होऊन गेलो. दुर्भाग्यानं माझा डायव्होस झाला. आणि
मुलांच्या संगोपनाची जवाबदारी माझ्यावर येऊन पडली. मला वाटतं पॅरेन्टिंग हे चोवीस
तासाचे काम आहे.
तुम्ही कश्याप्रकारचे वडील
आहात. फादरहुडमध्ये सगळ्यात कठीण काम काय ?
माझ्या मुलांना जेव्हा माझी
गरज होती तेव्हा मी त्यांच्यासाठी घरी होतो, या गोष्टीचा मला अत्यानंद आहे. त्यांच्याबरोबर
मी प्रत्येक बाबतीत चर्चा करतो तसेच त्यांच्या कुशंकांसाठी तयार असतो. मला वाटतं
फादरहुड खुप चॅलेन्जींग आहे, ऐकतर मुलं मोठी होत असतात तेव्हा आणि दुसरे म्हणजे
तुम्ही सिंगल पॅरेन्ट असता तेव्हा. मुलींना वेगळ्या प्रकारे वाढवायचे असते तर मुलाचे
संगोपन वेगळ्याप्रकारे करायचे असते हे मी शिकलो. घरात आणि वागणुकीत काय चालेल
किंवा काय चालणार नाही हे त्यांना मी स्पष्टरीत्या सांगीतले आहे. मला वाटतं,
मुलांना घेऊन आपण अधिक जजमेन्टंल व्हायला नकोत. तुम्ही हे कसं काय करु शकता किंवा
वागु शकता, हे मुलांना कधीच विचारु नये किंवा सांगु नये असं मला वाटतं. तसं
केल्यानं मुलं तुमच्यापासुन दुर होऊ लागतात आणि गोष्टी लपवु लागतात. तुम्हाला
त्यांची विचारसरणी आणि दृष्टीकोण यांचा आदर करायला पाहिजे. मला वाटतं मुलं जेव्हा
टिन ऐज्ड असतात तो कालावधी मुलांसाठी आणि पालकांसाठी फार कठीण असतो.
तुमची दोन्ही मुलं तुमच्या
अभिनय कारकीर्दीकडे कश्याप्रकारे पाहतात ?
दहा वर्ष मी चित्रपटांपासुन
दुर होतो. त्यामुळे त्यांना माझ्या स्टारडमचा अंदाज नव्हता. मागिल तिन वर्षात मी
साऊथ मधिल काही चित्रपट केले, तेव्हा त्यांना कळले मी अभिनेता आहे म्हणुन. हल्लीच
प्रदर्शित झालेले माझे दोन तामिळ चित्रपट त्यांनी पाहिलेत. तेव्हा त्यांना माझी
फॅन फॉलोईग किती आहे ते दिसुन आले.
मणी रत्नम यांनी तुम्हाला
चित्रपटसृष्टीत आणलं. आता त्यांच्याबरोबर तुमचे संबध कश्याप्रकारचे आहेत ?
मणी सर हे नेहमिच मला फादर
फिगर राहीले आहेत. माझ्या वृत्तपत्रातील जाहीराती पाहुन त्यांनी मला माझा पहिला
चित्रपट दिला. मी त्यांचा खुप आदर करतो. त्यांच्यामध्ये आज देखिल तोच प्रेमळपणा
आहे. तिन वर्षापुर्वी मी त्यांच्याबरोबर कदाल हा चित्रपट केला होता.
फार मोठ्या कालावधीनंतर
तुम्ही हिंदी चित्रपट करीत आहात. डीअर डॅड हा चित्रपट स्विकारण्यामागिल कारण काय ?
या चित्रपटाची कथा मला फार
आवडली. खरं तर ती थोडी गुंतागुंतीची कहाणी आहे. अनेक दृष्य हि अनपेक्षित आणि क्वचितच पहायला मिळणारी आहेत. कथा ऐकल्यावर मी खुपच अस्वस्थ झालो. ती
कहाणी जर ऐक अभिनेता म्हणुन मला बैचन करत आहे तर प्रेक्षकांना देखिल ती आवडेल असं
मला वाटलं. पंचेचाळीस वर्षाचा वडील आणि त्याचा चौदा वर्षाचा मुलगा यांची कथा डीअर
डॅड या चित्रपटात आहे. खरं तर हि ऐका अश्या माणसाची कहाणी आहे जो जाणतो, त्याला
आयुष्यात कोठे जायचे आहे ते. पण त्या नियोजीत स्थळी पोहोचायला त्याची वाट कोणती
असणार आहे ते त्याला ठावुक नाही. इतकं असुनही हा चित्रपट मेलोड्मॅटिक नाही किंवा
त्यात भाषणबाजी पण नाही. एकदम सरळ चित्रपट आहे हा.
तुमचा चित्रपट येत आहे
म्हटल्यावर हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकांची काय रिऍक्शन झाली. बॉम्बे गर्ल, मनिषा
कोयराला बरोबर तुम्ही संपर्कात आहात काय ?
सध्यातरी मी तामिळ
चित्रपटांवर लक्ष
केंद्रीत करत आहे. हिंदीतुन मला अनेक चित्रपटांसाठी
विचारणा होत आहे. अनुपम खेर यांनी आमच्या चित्रपटाचा टेलर पाहिला आणि आवडल्यानं त्तो
ट्विटपण केला होता. हिंदीत मी कोणाबरोबरही संपर्कात नाहीय
No comments:
Post a Comment