Saturday, 16 April 2016

Less will became much more - Shahrukh Khan


वेगळा चित्रपट देण्याची खुमखुमी काही औरच असते - शाहरुख खान

-      हर्षदा वेदपाठक

शाहरुख खान अभिनीत फॅन या चित्रपटाबद्दल जाणुन घ्यायची इच्छा  अनेकांना आहे. त्यामागे त्याचा वेगळा लुक असेल किंवा त्याने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी फॅनला रोवल्यामुळे असेल. पण खुद्द शाहरुख देखिल वयाच्या पन्नाशीमध्ये अभिनयाबद्दल ऐक वेगळा प्रयोग करताना, उत्साहात दिसुन आला. आणि त्याच्या चाहत्याना त्याचा नविन चित्रपट आवडेल याची त्याला खात्री वाटते हे यशराजमध्ये घेतलेल्या त्याच्या मुलाखतीमध्ये दिसुन आलं. सविस्तर मुलाखत पुढे...
फॅन या चित्रपटाच्या प्रोमोमध्ये ऑबसेशन आणि कनेक्शन दोन्ही दाखवलं गेलं आहे, तर तुम्ही वैयक्तीरीत्या त्यामध्ये कितपत विश्वास ठेवता ?
आम्ही फॅनची जी परिभाषा ठरवली आहे ती म्हणजे, जो तुमच्या पासुन दुर आहे त्यावर अफाट प्रेम करा. खरं तर फॅन (चाहता) हा शब्द फॅनॅटिक (अती उत्साही, वेडा चाहता) या शब्दाचा अपभ्रंश आहे. म्हणुन त्यात कोणत्याही बंधनाशिवाय, अटीखेरीज प्रेम करणे हे आलेच. तुम्ही कसे पण रहा, पण तुमचा फॅन तुम्हाला कोणत्याही परिस्थीतीत प्रेम करतच राहणार. मला नाही वाटत ऑबसेशन आणि कनेक्शन एकच आहे म्हणुन.
लुक क लाईक हि फॅन या चित्रपटाची गरज होती काय. तुम्ही वास्तविक लुक अ लाईक जेव्हा पाहता तेव्हा तुमची काय रिअॅक्शन होते ?
फॅन हा चित्रपट पाहताना, ती भुमिका डबल रोल या दर्जात अजिबात बसायला नको होती. तर दोन्ही व्यक्तीरेखा वेगवेगळ्या वाटायला हव्यात हे आम्ही आधीच ठरवले होते. दुसरी गोष्ट म्हणजे दिग्दर्शक  मनिष शर्माला हा चित्रपट माझ्याबरोबरच बनवायचा होता. कारण, त्या चित्रपटामध्ये जो कलाकार आहे, त्यानं खरच अभिनय केलेला असावा. आणि तुम्हाला माहीत आहे, की मी पंचविसएक वर्ष काम केलं आहे. त्यामुळे माझ्या कामाचं फुटेज मिळुन जाईल. पण तेच जर इतर कोणाला घेतलं असतं तर त्याच्यासाठी वेगळं शुट करावं लागलं असतं. आणि तेवढं करुन लोकांना विश्वास देता येईल की नाही याची खात्री नाही. जो आर्यन खन्नाचा फॅऩ आहे त्यानं तसं दिसावं हे ठरलं नव्हतं तर त्यामध्ये आर्यनची झलक असावी इतकच काय ते ठरवलं गेलं होत. बाकी चेहरा पण बदलला गेला आहे. त्यामुळे चित्रपट पाहताना, खरा आर्यन आहे की त्याचा फॅन गौरव आहे हा प्रश्न सतत पडत राहणार. आणि तसं वाटत राहणं हि त्या चित्रपटाच्या कथानकाची गरज देखिल होती. मी, जेव्हा कधी माझ्या लुक अ लाईक ला पाहतो तेव्हा (हसुन) मी स्वतालाच अधिक हॅन्डसम समजतो.
चित्रपटामध्ये अनेक जणं म्हातारी होण्याचा मेकअप करतात तर काही तरुण दिसण्यचा. वास्तविकरीत्या काय क्लिष्ट आहे तरुण दिसणं कि म्हातारं. त्या दिशेनं गौरवची भुमिका किती आव्हानात्मक होती ?
माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदाच एखादया कलाकाराला डी एज्ड करुन तरुण दाखवण्याचा प्रयत्न भारतात केला गेला आहे. नाही तर वेम्पायर किवा पुरुष कलाकाराला महिला करण्याकरीता थ्री डी चा प्रयोग केला गेला आहे. तसं करण्यामागे खुप मेहनत करावी लागते. मला वाटतं तरुण साकारणं फार सोपं होतं. माझी शरीरयष्टी पाहिलीत तर ती ब़ॉईश आहे, मॅनली नाही. त्यामुळे थोडं वजन कमी केलं, चालढाल बददली आणि मी तरुण झालो. तर विर झारा या चित्रपटात मला म्हातारा रंगवण्याचा मेकअप करावा लागला होता. त्यातही सगळ्यात कठीण काम म्हणजे राणी मुखर्जीला मुलगी म्हणुन हाक मारणे. असो... माझं स्टेट ऑफ माईन्ड हे तरुण आहे. मी माझ्या मुलांबरोबर अधिक वेळ राहतं असल्यानं मी तरुण वाटतो असे मला वाटते. माझ्या चुलबुल्या भुमिकांना माझी मुलं, पापा तुम्ही लहानच वाटता हि कम्पीलीमेन्ट देत असतात. म्हणुनच मी म्हणतो, तरुण भुमिका निभावणे फार सोपं आहे.
मला दुखापत झालेली असतानाच मी फॅनचं चित्रीकरण केलं होतं. दिग्दर्शक मनिष हा दिल्लीचा आहे त्यामुळे त्याच्याकडुन दिल्लीची बोली भाषा जाणुन घेतली. वजन कमी केलं. उंची कमी केली. तोंड थोडं पुढे काढुन बोलु लागलो. फक्त केसाची स्टाईल काय ती सेम ठेवली. बाकी चेहरयाच्या हावभावासाठी थ्रीडी चा वापर केला आहे. आणि ती पध्दीती फक्त अमेरिकेतच आहे. तेथे एका प्रचंड मोठ्या ब़ॉलमध्ये हजारों बल्प लागलेले असतात. आणि अनेक कॅमेरा पण असतात. तेथे मला दोनशे एक्सप्रेशन्स द्यावे लागलेत. तेथे चेहरयाच्या प्रत्येक बारीक हालचालींचे फोटो निघतात. त्या इमेजेसना प्रत्यक्ष शुट केलेल्या इमेजवर चिटकवतात. अमेरिकेत मी दोन दिवसाचे चित्रीकरण केलं ते आम्हाला हातात मिळायला दिड वर्ष लागलं. कारण त्या टेक्नीकमध्ये चेहरयावरील प्रत्येक बारकाव्याला ते टिपतात. चेहरयावरील सुरकुत्या काढल्या जातात, त्यामुळे वेळ लागतो. हॉलीवुडदेखिल अश्या तंत्रचा वापर त्यांच्या चित्रपटात याच वेळखावुपणामुळे क्वचितच करते. डबिंग करताना तर मला कोणती दृष्य कधी दिली होतीत तेच आठवेना. अभिनय कसा होतोय. लाईट कशी आहे याकडे कोणाचेही लक्ष नव्हते. बारा बारा तासात फक्त पंधरा विस सेकंदाचे सिन निघायचेत. आम्ही पार दमलो देखिल होतोत. आता फिल्म पाहताना या सगळ्या गोष्टीचे नवल वाटते.     
चित्रपटा इतका पछाडलेला चाहता तुम्हाला कोठे भेटला आहे काय ?
अधिकतर मी लोकांना भेटत नाही त्यामुळे मला ते ठावुक नाहीय. मात्र जगाच कोठेतरी असे लोकं असतील कदाचित असं मला वाटते. अमेरिकेतल्या एका फॅनने माझ्यासाठी चंद्रावर जागा घेवुन ठेवली आहे. तर ट्विटरवरील माझी ऐक फॅन सुंदरसुंदर चित्र काढत असते. माझ्या सगळ्या महिला चाहत्या फार चांगल्या आहेत, ऑबसेसीव्ह वगैरे नाहीत. काही वर्षीपु्र्वी मला एका विदेशी महिलेचा सतत फोन येत होता. एकदाचा तिचा मी फोन घेतला तर, त्या महिलेनं मला स्वप्नात पाहिल्याचे सांगुन माझे तेव्हा मणक्याचे ऑपरेशन होणार होते. त्या ऑपरेशनमध्ये मी दगावल्याचे पाहिल्याचे सांगीतले. ते ऐकुन मी पण चमकलोच. लंडनला पोहोचल्यावर तेथे छप्पन पानांच एक स्टेटमेन्ट होतं त्यात नव्वद मुद्दे होते. ते ऑपरेशनपुर्व साईन करावे लागतात. ती सही करताना, मी खुपच दडपणासाखी होतो. त्या महिलेच्या सततच्या फोन करण्याच्या पध्दतीला केअर म्हणावे की ऑबसेशन, ते मला नाही ठावुक.
आयकॉन ऑफ द नेशन म्हणुन, फॅनने कोणती लिमीट क्रॉस करु नये असे तुम्हाला वाटते ?
फॅनच्या सायकीमध्ये हे कर किंवा ते करु नको हे त्यांना कोणी सांगायची गरज नसते. फॅनडम मध्ये विचार करुन काहीच काम केल जात नाही. जे करावेसे वाटते ते तो करतो, नाहितर तो फॅन ठरत नाही. मी फक्त त्यांना स्वतःला इजा करु नका हे ऐवढच सांगु शकतो. कारण काही जणांना वाटतं कि त्या पध्दतीने ते मला इम्प्रेस करु शकतात. फॅनने स्वतालाच इजा करुन घेणे योग्य नव्हे. जेव्हा तुम्ही स्टार होता तेव्हा तुम्ही एक पब्लीक फिगर असता, तेव्हा तुमची प्रायवेट लाईफ हि अधिक प्रायवेट राहत नाही. आता माझ्या कुटुंबियांनी देखिल ती गोष्ट स्विकारली आहे की मी फक्त त्यांचा एकट्याचा नाही. ते अनेकवेळा माझ्या बरोबर वेळ घालवु इच्छीतात पण मी तेव्हा प्रमोशन, शुटींग निमित्ताने बिझी असतो तर ते समजुन घेतात. माझ्यासाठी माझ्या घरातले अशी ऍडजस्टमेंन्ट करतात त्याचे त्यांना वाईट नाही वाटत, तर मलाच कधीतरी ते वाईट वाटते. पण जेव्हा माझी मुलं स्वतःहुन बाहेर असतात तेव्हा लोक त्यांना काहीनाही ते विचारतात, त्याचे त्यांना वाईट वाटते. आता पापा आपल्या बरोबर नसताना सुध्दा लोकं आम्हाला विचीत्र नजरेने का पाहतात ते त्यांना कळत नसते. ऐका मुलीचा पिता अ्सल्याने मला वाटतं कि लोकांनी तिला भलबुरं बोलु नये, तसं काही झालं तर मला फार वाईट वाटते. राग पण येतो. म्हणुन मी माझ्या मुलांना विदेशात शिक्षणासाठी पाठवले आहे. जेणकरुन ते माझ्या सभोवती असलेल्या लोकांच्या नजरेपासुन दुर राहुन शिक्षण पुर्ण करतील.
चित्रपटामध्ये जो तुमचा तरुण फॅन आहे, ती भुमिका तुम्हीच का करायची असे ठरवलेत. तुमचा मुलगा तुमच्या ऐवढाच हॅन्डसम आहे तर त्याच्या नावाचा विचार गौरवच्या भुमिकेसाठी केला गेला काय ?
जो कोणी फॅन हा चित्रपट करेल त्यासाठी ती भुमिका डबल रोलचीच होती. कारण दुसरया माणसाला (कलाकाराला) माझ्यासारखं दिसणे गरजेचे होते. तशी कथानकाची डिमांडच पण होती. हा चित्रपट सुरु स्विकारण्यापुर्वी मला जर आदित्य किंवा मनिषने, तुझ्या तरुण रुपासाठी आम्ही कोणा दुसरया कलाकाराला घेतो असे मला सांगीतले असते तर कदाचित मी फॅन हा चित्रपटच स्विकारला नसता. ज्या चित्रपटात मी स्टार असताना, दुसरा कलाकार असणे याला काही अर्थच नव्हता. आर्यन खन्नाची भुमिका कोणीही उभारु शकतो फक्त त्यासाठी पंधरा विस वर्ष कामाची पाश्वभुमी हवी. नाहीतर प्रमुख कलाकार हा अभिनेता आहे हेच दाखवायला मुळात वेळ लागेल. आर्यनची भुमिका वास्तवातील आणि माझ्या चित्रपट कारकीर्द या सभोवती फिरणारी आहे. त्यात माझ्या अनेक पत्रकार परिषदा, माझ्या चित्रपटांचे काही अशं आहेत. हि सगळी पार्श्वभुमी, अमिताभ बच्चन, आमीर, सलमान, अक्षय याकडे आहे, त्यामुळे त्यांना आर्यनची भुमिका सहज जमली असती. माझ्या मुलाचं म्हणाल तर त्याला अभिनय येत नाही. गौरवच्या भुमिकेसाठी अभिनयक्षमतेची गरज आहे तसेच कॅमेराची माहीती असणे गरजेचे आहे.
तुमच्याकडे अनेक वर्षाच्या कामाचा अनुभव असुन, अजुन काही आव्हानात्मक करायचे राहीले आहे काय. खेरीज अशी कोणती गोष्ट आहे जेणेकरुन तुम्ही नर्व्हस होता ?
मी व्यावसायिक अभिनेता आहे आणि अभिनय करणे हे माझे काम आहे. मग मी येणारे काम आव्हानात्मक कसे म्हणु. तुम्ही ज्या मुलाखती घेता किवा बॅन्केचा कॅशीयर जसा कॅश मोजतो तो कोठे त्या कामाला आव्हानात्मक मानतो. कलाकार म्हणुन तुम्ही स्वतःला सिरीयसली घ्या पण अभिनयाबद्दल फारसं सिरीयसली कोणी बोलत नाही. आपल्या कामाबद्दल सिरीयसली बोलणं हे फार कंटाळवाणे असते. मी अश्या काही भुमिका केल्या आहेत ज्या भुमिका निभावताना पहिले स्वताला कन्विन्स करताना त्रास होतो. मग पुढे असा प्रश्न पडतो कि हे प्रेक्षकांना कश्या प्रकारे पटवुन देता येईल. जेव्हा तुम्ही व्यावसायिक सिनेमा पाहता तेव्हा हिरो म्हणुन मी तुम्हाला आवडु शकतो कारण तो चित्रपट मुळात काल्पनिक कथेवर आधारीत असतो. तर विर झारा, चक दे, स्वदेस सारख्या चित्रपटात त्या प्रमुख कलाकराला सगळे मदत करतात. फॅनमध्ये गाणं नाहीयय कारण चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला तो रिअल वाटला पाहिजे. आणि वास्तविक जगात आपण ऊठुन गाणी गायला सुरवात नाही ना करत. वास्तविक कथानक रंगवणे मला आव्हानात्मक वाटत नाही. कारण तेथे तुम्हाला तुमचे संवाद, लुक, परिधान, सहकलाकार हे मदत करतात.
पंचविस ऐक वर्षाचा तुमचा प्रवास कसा काय झाला. आणि या दरम्यान तुमचे पोटेन्शियल पुर्णपणे वापरले गेले असे तुम्हाला वाटते काय ?
आदित्य चोपडा, करण जोहर, संजय लिला भन्साळी, अजीज मिर्झा आणि मनिष शर्मा मला तसं नेहमीच सांगतात. (हसुन) परंतु त्यांनी माझे पोटेन्शियल कॅप्चर करणारे चित्रपट लिहायला पाहिजे ना, ते तसं लिहीतच नाहीत, काय करावे? हल्ली आदित्य असं करु लागला आहे की, ज्या कथानकांचे मुळ काल्पनिक असेल तर त्याचा शेवट वास्तवदर्शी करु लागला आहे. ते तुम्ही रब ने बनादि जोडी या चित्रपटात पाहिलं असेल. खरं पाहता माझ्या रोमॅन्टीक इमेजला आदित्य चोपडाच कारणीभुत आहे. त्यानेच मला फॅन करण्यासाठी विचारणा करताना अरे यार यह फिल्म तु अच्छी कर लेगा हे म्हणाला. मी स्वतः कथानक लिहीत नाही आणि माझ्यासाठी कथानक लिहा हे हि मी कोणाला सांगत नाही. अभिनेता म्हणुन मला कोणत्या प्रकारचे चित्रपट करायला पाहिजे ते देखिल मला ठावुक नाही.  मला वाटतं माझ्यासाठी कोणीतरी कथा लिहुन मला सांगावं, हि भुमिका तुच करु शकतोस. त्या विश्वासाने मी प्रेरीत होतो आणि मी ती भुमिका प्रयत्नपुर्वक चांगली करायचा प्रयत्न करतो. पुर्वी मला भन्साली म्हणाले होते, जर तु नसतास तर मी देवदास हा चित्रपटच केला नसता. मी तेव्हा फार मोठा स्टार नव्हतो. त्यामुळे त्यांनी मला तसे सांगणे माझ्यासाठी खुप मोठी गोष्ट होती. अश्या संधी माझ्या वाटेत आल्या तर मी मेहनत करतो. नाही आल्या तरी काम करतोच. आणि पुढच्या भुमिकेसाठी आणखिन मेहनत घेतो.  
शाहरुख खान कोणाचे फॅन आहेत ?
माझ्या मुलांकडुन मला मिळणारया प्रेमाचा मी दिवाना आहे. त्यांच्या बरोबर जरी मी नसलो तरी माझ्या गाडीत त्यांचा असलेल्या फोटोकडे पाहुनही मी सुखी होतो. मला वाटतं मी त्यांचा मोठा फॅन आहे.
दिलवालेच्या मुलाखती दरम्यान तुम्ही एक चित्रपट करणार असं सांगात होतात. नंतर मी, वर्षागणिक आणखीन चित्रपट करेन हे हि म्हणालात. तर आता तुमच्या आगामी तिन चित्रपटांमधुन तुम्ही विवीधता देताना दिसत आहात त्याबद्दल काय सांगाल ?
मी ऐक चित्रपट करुन कंटाळुन जातो. आता तुम्ही मला वर्षागणिक तिन चित्रपट करताना पाहाल. दरम्यान मी मल्टीस्टारर पासुन लांब रहायचं ठरवलं आहे. मी ऐक बीझी स्टार आहे. त्यामुळे माझ्या बरोबर इतरही लोकं बिझी असतातच. मग सगळ्यांच्या तारखा मिळणं फार कठीण होऊन बसतं. मी आजारी पडल्याने फॅन आणि रईस हे दोन चित्रपट लांब गेलेत. जे यावर्षी प्रदर्शित होतील. मनिषने दहा वर्षापुर्वी फॅनचे कथानक लिहीले होते. मला ज्या काही कामासाठी विचारणा होते त्यापैकी चांगले काम निवडुन करायचा मी प्रयत्न करतो. फॅननंतर मी इम्तयाज अलीचा चित्रपट करतोय आणि हे तिन्ही चित्रपट एकमेकापासुन वेगळे आहेत. मी जेव्हा वर्षात तिन चित्रपट करेन तेव्हा मला सुध्दा त्यामध्ये वेगळेपणा जाणवेल. मला वाटतं ऐक कलाकार म्हणुन मला देखिल त्याचा फायदा होईल. आता या तिन चित्रपटांचे विषय पाहता मी समाधानी आहे.

तुम्ही जेव्हा चित्रपटक्षेत्रात आलात तेव्हा कुमार गौरवचे फॅन होतात. इतक्या वर्षानंतर तुम्ही पण सेलीब्रीटी झालात तर स्वतात किती बदल झालेला जाणवतो ?
चित्रपटसृष्टीत यायच्या आधी मी बॅंगलोर येथे लव्ह स्टोरी हा चित्रपटच पाहिला होता. ऐकाच दिवशी तिन वेळा चित्रपट पहिल्यावर मी स्वतःला कुमार गौरव समजु लागलो होतो. त्या चित्रपटात कुमार गौरव यांनी घातलेला लाल चौकडीचा शर्ट पण मी विकत घेतला होता. अजुनही कधी कधी मी वापरतो तो शर्ट, फॅनमध्ये पण मी तो शर्ट घातला आहे. आणि हे मी कुमार गौरव यांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्यांना सांगीतले देखिल होते. तेव्हापासुन मी काही फारसा बदललो नाही. मला वाटतं माझ्यापेक्षा चांगले कालाकार या क्षेत्रात आहेत. मग ते अमितजी असोत की आलीया असो, दोघांची काम करण्याची पध्दती वेगळी आहे. मला त्यांची काम करण्याची पध्दत मला आवडते. त्यांच्याकडुन बरच काही शिकता आल मला. या सगळ्या गोष्टींचा एक कलाकार म्हणुन मला नक्कीच फायदा होणार. मला नाही वाटत मला सगळं येतं म्हणुन. जेव्हा नविन कलाकार माझ्याबरोबर अभिनय संदर्भात  गप्पा मारतात. मला आवडते ते कारण बरच काही जाणुन घेता येतं. पण पंचविस वर्षानंतर मला वाटत की मी सहा सात उत्तम चित्रपट केलेत. पुन्हा तसे चित्रपट करता येतील की नाही ते मला ठावुक नाही. चांगल्या चित्रपटाचा शोध घेण्याची प्रेरणा मला उत्साहित करते. चित्रपटामधुन येणारा पैसा कोणाला आवडत नाही. वेगळा चित्रपट देण्याची खुमखुमी काही औरच आहे. मी वेगळ्या भुमिका करत गेलो कारण लोकांना वाटलं मी त्या निभावु शकतो म्हणुन. मात्र मागच्या पाच वर्षात मला झालेली दुखापत आणि केलेले मल्टीस्टारपट या सगळ्यांनी माझा खुप वेळ घेतला. आता मात्र माझ्याकडे वेळ आहे कारण माझी तब्येत बरी आहे. दोन म्हणजे माझी मुलं मोठी झाली आहेत. माझ्याकडे नविन काही करण्याची उमेद आणि भुक दोन्हीपण आहे. पंचवीस वर्षापुर्वी मी जसा होतो आताही मी तसाच आहे असं मला वाटतं.
पंचवीस वर्षाच्या कालावधीत तुम्हाला जगभरातील अनेक पुस्कार, मानमरातब मिळाला आहे. त्याचा उपयोग करत तुम्ही आंतरराष्टीय स्तरावर काही करायचा विचार करत आहात काय ?
मी जर मोठेपणा सांगत नसेन तर फॅन हा चित्रपट आंतरराष्टीय स्तराचा आहे असं मी म्हणेन. मला अजुनपर्यत कोणीही विदेशात कामासाठी विचारणा देखिल केलेली नाही. तेथे जावुन काम शोधायची मला गरज नाही. पण जी लोकं तेथे गेलीत त्यात इरफान खान, प्रियांका चोपडा, दिपीका पडुकोण ओम पुरी, अनिल कपुर आणि अनेक लोकांनी तेथे काम केलय. ते सगळे उत्तम कलाकार आहेत. मला खरंतर या लोकांच्या हिमतीचीच दाद द्यावी असे वाटते. ती खुप चांगली गोष्ट आहे कारण याद्वारे इतर कलाकार नव्हे तर दिग्दर्शक देखिल प्रेरणा घेतील असे मला वाटते. मला मात्र त्याप्रकारची संधी कधीच मिळाली नाही तसचे विचारणा देखिल झालेली नाही. आणि मी तश्या संधी घ्यायला तयार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट. मी नेहमीच सांगत आलो आहे, की मी भारतामधुन विदेशी लोकांना आवडेल असा चित्रपट, निर्माता म्हणुन तैयार करेन आणि मला माझ्या या विचारसरणीचा अभिमान आहे. आम्ही केलेला रावण असाच एक उत्तम दर्जाचा चित्रपट होता. ज्यामध्ये सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर केला गेला होता. आम्ही तो चित्रपट केला नसता तर फॅन देखिल करु शकलो नसतो. यापुढे आम्ही अवकाशावर आधारीत चित्रपटपण बनवु शकतो. आताची आमची मेहनत कधी ना कधी रंग आणेलच. आणि आम्ही नाही करु शकलो तर आमच्या नंतर सात आठ वर्षात जो कोणी चित्रपट तयार करेल तो याच कारणामुळे चित्रपट तयार करेल यात वाद नाही. आता आपल्याकडे जागतिक दर्जाची टेक्नॉलॉजी आहे. आपले कलाकार बाहेर जावुन काम करु लागले आहेत. आणखीन काय पाहिजे आहे आपल्याला...
ग्लॅमर दुनियेत ताणतणाव नेहमीच वाढलेला असतो. महत्वाकांक्षेला रोखणारं कोणीच नसतं.   अश्यावेळेस आपलं चित्त स्थिर ठेवुन, विचारांना कसं शांत करता येईल असं तुम्हाला वाटतं ?
सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे तुम्ही जे पडदयावर वावरता ते प्रत्यक्ष जिवनात तसं नसते. ती तुमची इमेज नसते तर तुम्ही त्या इमेजसाठी काम करत असता. ती इमेज तयार करायला फार मेहनत करावी लागते. पण तरी देखिल ते तुम्ही नसता. यावर कलाकराने विश्वास केला तर तुमचं चित्त थारयावर रहायला हरकत नाही. तुम्ही स्वतः जेव्हा त्यावर विश्वास ठेवता तेव्हा तुमच्या आजुबाजचे लोग देखिल त्यावर विश्वास ठेवतात. माझ्यापरिनं मी एक ठरवलं आहे - जगाने काहीही बोलु दे, करु दे, मला फक्त माझं काम करायचं आहे. मी वास्तवीकरीत्या वागतो. आणि माझ्यामध्ये आत्मविश्वास देखिल आहे. आभिनय हा मी पंचविस वर्ष करीत आहे मग भुमिका कोणतीही असो. यापुढेही करत राहणार. पण तो जो पडदयावर दिसतोय तो मी नाही ते मनात कोरुन ठेवायला पाहिजे.
हल्लीच ऐका तरुण अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती, त्या दिशेनं हि विचारसरणी फार महत्वाची आहे. जर तुम्हाला अपेक्षित ध्येय गाठता नाही आलं. तर त्या  वाईट दिवसांमधे जास्त विचार करु नका. तुम्ही आत्मविश्वासाच्या जोरावर पार व्हाल. माझ्या बरोबरील सगळ्या नवकलाकारांना मी नेहमीच ऐेक सल्ला देतो. वाईट दिवस कोणालाच चुकत नाहीत. तुम्ही चांगले कलाकार आहात आणि त्या कालावधीतुन बाहेर येऊ शकाल. तु्म्ही उत्तम अभिनय करु शकत असाल तर तुम्हाला कोणीच थांबवु शकत नाही. थोडया कालावधीसाठी फेल जाल, नंतर जोमाने कामाला लागाल. मी माझ्या क्रिकेट टिमला पण तेच सांगतो. मॅच नाही जिंकलीत तर, हरकत नाही. तुम्ही चांगलं खेळलात ना तर आपण परत जिंकु. महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही सुरवात केली तेव्हा तुम्ही कोणीच नव्हता. कोणीतरी तुमच्यामधिल कलानिपुणता पाहिली आहे त्यामुळे आज तुम्ही एका स्तराला पोहोचला आहात, अजुनही लोकं तुमच्याकडे आशेनं पाहत आहेत. ते शोधतील तुम्हाला आणि परत आणतील. कारण तुमच्याकडे टॅलेन्ट आहे. पण हेच जर टॅलेन्ट नसेल तर ते सुध्दा तुम्हाला माहीत पाहिजे. माझा जेवढा हक्क आहे तेवढं तरी मला मिळेलच. लोकं तुमची जेव्हा स्तुती करतात तेव्हा भाळुन जाऊ नका. माझ्या वाढदिवसाला लोकं माझ्या घरासमोर येऊन नाचतात. पण ते माझ्यासाठी नाही नाचत तर माझ्या इमेजसाठी नाचतात, ते मला लक्षात ठेवलं पाहीजे.
मुंबईला मायानगरी समजुन, पडदयावर जे काही दिसत आहे, त्याला वास्तव समजुन अऩेक लोकं टे्न पकडुन मुंबईला येतात. हे जे स्वप्न आहे ते काही प्रमाणात सिनेमा बदलु लागल्यानं आता बदलु लागलं आहे. तर कालाकाराला माणुस समजुन, तो आपल्यासारखा भावुक आहे असं मानणारी माणसं येथे येतील काय ?
स्टारडम हा वेडेपणाचा ताफा नसावा, मग ते क्षेत्र कोणतेही असो. तेच स्टारडम जेव्हा मोठ्या आणि प्रेरणादायी प्रमाणात असते तेव्हा ते अनेकांना प्रेरीत करते. आपल्याकडे कलाकारांचे फॅऩ क्लब तयार होतात,  देवळं तयार केली जातात. हा सगळा प्रकार हॉलीवुडमध्ये नाही. परंतु आपल्याकडील स्टारडम आणि फॅनडम इतकं मोठं आहे की, त्या जोरावर आपण अऩेक वर्ष टिकलो आहोत आणि हॉलीवुडला टक्कर देत आहोत. ते जेव्हा संपेल तेव्हा लोकं चित्रपट पाहणार नाहीत आणि या क्षेत्रात पण येणार नाहीत. लोकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहीजे की, आम्ही कलाकार लोकं भावनिकतेच्या आहारी नसतो तर भावनिकतेला वश केलेले अ्सतो. ती देखिल ऐक कला आहे त्यापेक्षा वेगळं काहीच नाही. पडदयावर दिसणं सोपं काम नाही तर त्यामागची मेहनत फार महत्वाची असते.

तुमची मुलं कोणाचे फॅन आहेत आणि त्यांचे रोल मॉडेल कोण आहेत ?
त्यांचा वडील म्हणुन मी त्याचा रोल मॉडल आहे, कारण मी प्रचंड मेहनत करणारयांपैकी आहे म्हणुन आणि त्यांना माझा तो गुण आवडतो. मला वाटतं मुलं हे आपल्या आईवडींलाकडुन भरपुर काही शिकतात. त्यात ते गौरी करुन त्याग शिकलेत असं मी म्हणेन. कारण मला कामाची आवड आहे हे तिला ठावुक आहे त्यामुळे मी घरी फारसा वेळ देऊ शकत नाही हे ही ती जाणते. सुहाना आणि आर्यनला कोणीतरी दुसरं आवडते पण ते शिकतील त्यातुन. आणि जिवनाचा हाच तर प्रवास आहे की, लहान मुलांना एकटं सोडावं ते शिकतात हळुहळु.
यश चोपडा यांनी तुम्हाला फॅन या चित्रपटाचं कथानक ऐैकवलं होतं. तर फॅनचे कथानक हे तुमचे नसुन दुसरया कोणाचे आहे असं म्हटलं जात आहे, तुम्ही अश्या गोष्टींकडे कसं पाहता? पब्लीसीटी स्टंट म्हणायचा काय हा ?
नाही, ती बातमी चुकीची आहे. मी ऐका मुलाखती मध्ये मनिष शर्मा आणि यश चोपडा यांचं म्हणणे एकाच वाक्यात नमुद करत होतो. त्यामुळे तो गोंधळ उडाला असावा.
फॅनची कथा दुसरया कोणाची आहे हि बातमी मला ठावुक नाही. फक्त हा चित्रपट दुसरया कोणत्या तरी हॉलीवुडपटावर आधारीत आहे हि चर्चा मला ठावुक आहे. खरं तर फॅन तसा देखिल नाही. तर ऐक कादंबरी होती त्यात ऐेक फॅऩ आपल्या आवडत्या अभिनेत्रीला फक्त पत्र लिहीतो अ्सं कथानक होतं. पण ते पुस्तक काही मला सापडलं नाही. त्यावर ऐक चित्रपट पण तैय्यार झाला होता. दुदैवानं तो चित्रपट काही फारसा चालला नाही. आमच्या चित्रपटाचं कथानक फार वेगळं आहे.
चित्रपट जेव्हा प्रदर्शनाच्या वाटेवर असतो तेव्हा केस करणं हि फॅशन होऊन बसली आहे. मला मात्र ते  कमीपणाचं लक्षण वाटतेय. असच काहीसं रावण या चित्रपटाच्या प्रदर्शनपुर्व घडले होते. प्रदर्शनाच्या वाटेवर असलेल्या चित्रपटांबद्दल असं काही झालं की थोडा त्रास होतो खरा.
फॅनमध्ये तुमचं वैयक्तीक जिवन कितपत दाखवलं गेलं आहे ?
त्या चित्रपटात माझे वैयक्तीक आयुष्य अजिबात नाही. आदित्य माझ्या खुप जवळचा मित्र आहे. आणि मनिषला मी अनेक वर्ष ओळखतोय. त्यामुळे माझं जिवन पडदयावर दाखवणं चुकीचं ठरेल हे ते मानतात म्हणुन तो आर्यन खन्ना आहे. मला वाटतं चित्रपटात सगळयात कठीण काही भाग असेल तर तोच आहे की, माझं वैयक्तीक जिवन चित्रपटापासुन दुर राहीलं पाहिजे. मी घरी कसा वागतो कि्वा ऑफीसमध्ये स्टाफबरोबर कश्याप्रकारे बोलतो ते आम्हाला दाखवायचं नव्हतं. आणी मी कसा वागतो ते फक्त मला ठावुक होतं. ते पडदयावर साकारणं पण सोपं ठरलं असंत. मला वाटतं आर्यन खन्ना माझ्यापेक्षा खुप जवाबदारीनं वागणारा आहे. त्याला माझ्या इतका सेन्स ऑफ हयुमर नाही. मी मुलांमध्ये सहज मिसळतो, आर्यन नाही मिसळत. तर आम्ही या दोन गोष्टी वेगळ्या ठेवल्या आहेत. फॅन मधिल घर माझचं आहे. त्यामधिल चित्रपटही माझेच आहेत. मी या चित्रपटात आहे कारण मनिषला मी आवडतो, आणि माझ्या चित्रपटांचे आरकायव्हल फुटेज काढता आलं म्हणुन मी या चित्रपटात आहे. मला आर्यन सादर करणं खुप कठीण गेलं, कारण तो मी नाही आहे. गौरव तुम्हाला कोठेना कोठ सापडेल. पण आर्यन आणि मी फार वेगळे आहोत.
तुम्ही येथे पंचवीस वर्षापेक्षा अधिकचा कालावधी घालवला आहे. त्या दरम्यान खुप काही बदललं. पण अजुन देखिल तुमच्या बोलण्यात दिल्लीची आत्मियता दिसुन येते. हे दिल्लीपण आर्यन आणि गौरवमध्ये कितपत दिसुन येईल ?
होय दोघांमध्ये दिसुन येईल. मला वाटतं मी पंचविस वर्ष दिल्लीत होतो आणि आता पंचविस वर्ष मुंबईत आहे. अगदी विभाजन झालं माझ्या आतापर्यतच्या आयुष्याचे. मागे मी, सुभाष घई यांना, मला कधी दिल्ली किंवा हरयाणवी भुमिका दया हे सांगायचो. इतर काही चित्रपटात मी तश्या भुमिका पाहुन फार खुश होतो. पण आता असं झालं आहे की, या पंचविस वर्षात मी खुप सारं दिल्लीपण विसरलो आहे. मात्र मनिष आणि सेटवरील वरीच जण दिल्लीकर असल्याचा मला फायदा मिळाला. दिल्लीतील काही शब्द उच्चारताना मजा आली. आता तरी मी एकदाची दिल्लीकराची भुमिका निभावली त्याचं समाधान आहे.


चित्रीकरणदरम्यान जेव्हा एखादा फोटो लिक होतो तेव्हा त्या चित्रपटाचा आगळेपणा कमी होते असे तुम्हाला वाटते काय काय. रईसच्या लुकचे फोटो पण असेच लिक झाले होतेत ?
मला वाटतं सेटवरील सिक्युरीटी अश्या वागणुकीमुळे वाढेल. बाहेरच्या लोकांना सेटवर येऊ दिले जाणार नाही. स्कॅमब्रल येतील जेणेकरुन फोटो काढलेत तर ते दिसणारच नाहीत. हॉलीवुडप्रमाणे शुटींग सुरु होईल. साधा चित्रपट असेल आणि फोटो लिक झाला तर अडचण नसते. मात्र गौरवच्या रुपाला मला फार जपावं लागलं होतं. पहिल्याच दिवसाचं चित्रीकरण मन्नत मध्येच होतं आणि तो फोटो बाहेर आला. येत्या काही दिवसात चित्रपटाच्या प्रसिध्दीचं गणितच बदलेल. लेस विल बिकेम मच मोअर... होईल. प्रत्येक बातमीला रहस्यात ठेवली पाहिजे. तर लोकं पाहण पसंद करतील. नाहीतर सगळी कडुनच मटीरीअल येत आहेच ना. पहिल्यांदा फोटो येत असेल तर तो वाकडा तिकडा येऊ नये हि सगळ्या कलाकारंची अपेक्षा असते. म्हणुन मी नव्वद टक्के चित्रपट सेटवर करतो. सेटवर पण युनिटवाले फोटो काढुन नेतात. रईसच्या सेटवर आम्ही सगळ्यांचे फोन बाहेर ठेवले आहेत तरी फोटो (हसुन ) येतातच. तुम्हाला लुक आणि कथानक प्रोटेक्टीव ठेवायला पाहिजे. मात्र सगळेच जेव्हा तुमच्या फिल्मबद्दल इतके बोलतात तेव्हा तुम्ही गप्प बसावे आणि सगळं गुलदस्त्यात ठेवावं. मला वाटतं येत्या काही दिवसात सगळेच चित्रपट सेटवर तयार व्हावेत     
निर्माता म्हणुन बायोपिक करायचा विचार आहे काय ?
बायोपिक हे फार उत्कंठा वाढवणारे असतात ते खरय. पण मी अजुन त्यावर विचार केलेला नाही.





No comments:

Post a Comment