Thursday, 14 April 2016

चीटर या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च




मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केलेले दिग्दर्शक, अभिनेते अजय फणसेकर पुन्हा एकदा एक आगळा वेगळा विषय "चीटर" या सिनेमाच्या माध्यमातून घेऊन येणार आहेत.

अजय फणसेकर  दिग्दर्शित स्वीस एन्टरटेनमेंट प्रा, लि. च्या. फुरखान खान, प्रदीप शर्मा यांची प्रस्तुती असलेला,  निर्माते प्रविणकुमार उदयलाल जैन यांची निर्मिती असलेल्या "चीटर" सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा सिनेमातील अभिनेता वैभव तत्ववादी, अभिनेत्री पूजा सावंत, ऋषिकेश जोशी, सुहास जोशी,वृषाली चव्हाण जीवन कालारकर संगीतकार अभिजित नार्वेकर, गीतकार अखिल जोशी, गायक अवधूत गुप्ते, गायिका आनंदी जोशी आणि तंत्रज्ञ मंडळींच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात झाला.

"चीटर"च्या ट्रेलरचे प्रकाशन मोठया शानदार पद्धतीने साजरे झाले त्यावेळी दिग्दर्शक अजय फणसेकरांनी  सांगितले की, ह्या चित्रपटाचे ८० टक्के चित्रिकरण हे मॉरिशियस येथे झालेले आहे, ह्या सिनेमातील कलाकार आणि निर्माते यांचे संपूर्ण सहकार्य मला खूप मिळाले, तेथे चित्रिकरण करताना नैसर्गिक अडचणी आल्या त्यावर मात करून आम्ही सर्वांच्या सहकार्याने पूर्ण केले, खरतर आजवर केलेल्या माझ्या सिनेमांपेक्षा ह्या सिनेमाचा जॉनर हा पूर्णपणे वेगळा असून मी पहिल्यांदाच हाताळला आहे आणि प्रेक्षकांना नक्कीच पसंतीस उतरेल अशी मला आशा आहे. अभिनेता वैभव तत्ववादी यांनी सांगितले की, ह्या सिनेमात अभय अग्निहोत्री ही भूमिका मी साकारलेली  आहे, ह्या मुलाला एकच गोष्ठ माहित असते ती म्हणजे फक्त खोटे बोलणे, खोटे बोलणे, आणि खोटे बोलणे त्यामुळे आजवर न पाहिलेल्या विविध छटा ह्या माझ्या भूमिकेत तुम्हाला दिसतील.

पूजा सावंत हिने आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की माझ्या भूमिकेचे नाव “ मृदुला “ आहे पण मला “ मिमो “ म्हणतात, मी आणि वैभव ने बरेच दिवसानंतर एकत्र काम केले आहे, एका वेगळ्या पद्धतीची भूमिका असून काम करताना खूप आनंद झाला.

ह्या सिनेमात चार गाणी असून वेगवेगळ्या मूडची गाणी आहेत, सिनेमातील दोन गाणी सुप्रसिद्ध गायक सोनू निगम आणि आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजात रेकॉर्ड करण्यात आली आहेत. सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी या सिनेमाचे शीर्षक गीत गायले आहे त्याशिवाय उर्मिला धनगर च्या आवाजातील “ झाकरी “ नृत्यावर आधारित एक गीत हे या सिनेमाचा आकर्षणाचा भाग आहे.

No comments:

Post a Comment