आता लोकं कपडे बदलण्याच्या तुलनेत आपले पार्टनर बदलतात - तनुज
विरवानी
- हर्षदा
वेदपाठक
दोन
साधेसरळ चित्रपट केल्यावर तनुज विरवाणी, वन नाईट स्टॅन्ड हा बोल्ड विषय असलेल्या चित्रपटात दिसणाऱ आहे. त्याबदद्ल त्याच्याबरोबर केलेली बातचित...
तुला
पहिल्यापासुनच अभिनेताच व्हायचे होते काय ?
अजिबात
नाही. मला लेखक दिग्दर्शक व्हायचे होते. त्यामुळे मी नामवंत दिग्दर्शकाबरोबर दोन
चित्रपटांसाठी सहायक म्हणुन काम केलय. पण सेटवर काम करताना माझ्या असं लक्षात आलं
की, सेटवर येऊन कॅमेरासमोर अऩेक भुमिकेत जगता येऊ शकते. त्या अऩुभवाचा उपयोग मी
लघुचित्रपट करण्यासाठी केला. त्यानंतर जेव्हा अभिनेता व्हायचे ठरवले तेव्हा मानसिक
आणि शारीरीक बदल करत मी अभिनेता झालो.
वन
नाईट स्टॅन्डमध्ये तुझी भुमिका बरयापैकी बोल्ड आहे. त्याची तयारी कश्याप्रकारे
केलीस ?
माझे
पहिले दोन चित्रपट मी बॉईश लुकमध्ये होते तर या चित्रपटात मला लग्न झालेला माणुस
दिसायचे होते. त्यामुळे शारीरीक फिटनेस मिळवुन मी लुकवर मेहनत घेतली. त्यानंतर
आमचे वर्कशॉप झालेत जेणेकरुन काही बोल्ड दृष्य कश्याप्रकारे दयायचित ते समजुन घेतलं.
सन्नी
लिओनी बरोबर काम करण्याचा अनुभव कसा राहीला ?
सुरवातीला
तर मी घाबरलो होतो. कारण ती एक स्टार आहे आणि मी नवखा. पण सेटवर ती खुप सलोख्याने
वागायची. सगळ्यांबरोबर हसत खेळत वागायच्या त्या सवयीमुळे तसेच वर्कशॉप केल्याचा
फायदा मला झाला.
वन
नाईट स्टॅन्ड हा चित्रपट तु करत आहेस यावर रती अग्नीहोत्री यांची काय प्रतीक्रीया
झाली ?
त्यांच्या काळात लोकं वेगळ्या प्रकारे वागायचीत, पण आता लोकं कपडे बदलण्याच्या
तुलनेत आपले पार्टनर बदलतात. तिला जेव्हा या चित्रपटाचं कथानक ऐकवलं गेलं, आवडलं
तिला ते. ऐका वेगळ्या विषयासह चित्रपटात संदेश दिला जातोय, तो सगळ्याच कुटुंबियांना
आवडेल असे तिला वाटले.
तु आणि कमल हासन यांची धाकटी मुलगी, अक्षरा यांच्याबद्दल बरयाच बातम्या ऐैकू
येत आहेत. त्याबद्दल काय सांगशिल ?
पुरानी
जिन्स या चित्रपटामध्ये माझ्याबरोबर सारीकाजी काम करीत होत्यात, त्या दरम्यान आमची
ओळख झाली. आम्ही चांगले मित्र आहोत. अश्या बातम्या आल्यात की मी, तिच्या बहिणीला,
श्रृतीला फोन करतो आम्ही तिघं खळखळुन हसतो, कारण तश्याप्रकारच्या बातमींवर त्तोच ऐकमेव
उपाय असतो.
No comments:
Post a Comment