परिक्षण – जंगल बुक एक सुंदर पर्वणी
-
हर्षदा वेदपाठक
जॉन फाराउ दिग्दर्शित जंगल बुक या चित्रपटात लांडग्यांनी वाढवलेल्या
मोगलीला, त्याच्या ताब्यात दयावे नाहीतर परिणामांना सामोरे जावे हे फर्मान शेरखान हा
वाघ काढतो. जंगल सोडुन, माणसांच्या वस्तीत जाण्याच्या तयारीत असलेल्या मोगलीला
त्या प्रवासात स्वताची ओळख कश्याप्रकारे पटते हे डीस्ने निर्मित जंगल बुक या
चित्रपटात पहायला मिळते. मोगलीच्या या प्रवासात विहंग जंगल, अफाट प्राणी संपदा
यांचे सुंदर चित्रण दिसुन येते. मोगलीला नेहमीच मदत करणारे पॅन्थर आणि भालु यांची
मानवाच्या मुलाला वाचवण्यासाठी केलेली मदत दाद मागणारी ठरते. ऐकंदरीत जंगल बुक हा
चित्रपट हा ऍनीमेशऩ असुन त्यात मोगली झालेला निल सेठी हा ऐकमेव बालकलाकार आहे.
मुंबईमध्ये इंग्रजी आणि हिंदी भाषेत जंगल बुक हा चित्रपट प्रदर्शित
होत असुन चित्रपटाच्या इंग्रजी आवृतीसाठी निलसह, बिल म्युरे, बेन किंग्जले, इद्रीस
अल्बा, ल्युपीता नयोगो, स्कारलेट जॉन्सन, ख्रीस्तोफर वाल्केन यांनी आवाज दिला आहे.
तर हिंदी आवृत्तीसाठी इरफान खान, ओम पुरी, नाना पाटेकर, प्रियांका चोपडा, शेफाली
शहा, बग्ज भार्गवा कृष्णा, आणि मोगलीच्या भुमिकेसाठी जास्लीन सिंग यांनी आवाज दिला
आहे.
दिड तासाच्या जंगल बुकमध्ये निल सेठी हा एकमेव कलाकार आहे. जो त्याच्या
पहिल्याच चित्रपटात संवादासह अभिनय करताना आत्मविश्वासाने वावरतो. मोगली म्हणुन
निलचे डीजीटल टेक्नॉलॉजीबरोबर जुळवुन घेणे त्याच्यातील कलाकार म्हणुन परिपक्तवाता
दर्शवते.
या वर्षी प्रदर्शित झालेल्या जंगल बुक या चित्रपटासाठी वापरलेली
व्हीज्युअल्स इफेक्ट, सी.जी.आय. इफेक्ट सर्वेत्तम असुन दिग्दर्शक जॉन यांना त्याचा
केलेला पुरेपुर वापर हि चित्रपटाची जमा बाजु आहे. चित्रपटाची गाणी आणि पाश्वसंगीत
या साहसकथेला पुढे नेताना पहायला मिळते. लहान मुलांचा प्रेक्षकवर्ग समोर ठेवुन
दिग्दर्शकानं संपुर्ण चित्रपटाची बांधणी काळजीपुर्वक केल्याचे दिसुन येते. त्याला प्रोढ
प्रेक्षकवर्ग देखिल भुलेल यात वाद नाही. या विक ऐन्डच्या लांबलचक रजेचा फायदा जंगल
बुकला बॉक्स ऑफीसवर घवघवीत यश मिळवुन देईल यात वाद नाही.
No comments:
Post a Comment