चित्रपट हे समाजाचे प्रतिबिंब असल्याने आपल्या समाजात आपल्या आसपास घडत असलेल्या घटना रुपेरी पडद्यावर उमटल्याशिवाय राहत नाहीत, डी.एस.फिल्म्स निर्मित आणि ॠषीराज क्रिएशन कृत, निर्माता दिलीप शहाआणि राजेंद्जी साळी लिखित, दिग्दर्शित आर्त हा मराठी चित्रपट त्याचे उत्तम उदाहरण ठरले आहे. नुकताच या चित्रपटाचा फस्ट लुक अनिसच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर यांच्या हस्ते मुंबईत संपन्न झाला, त्यांच्या सोबत अनिस च्या अॅड.रंजना गवांदे देखील उपस्थित होत्या.
यावेळी मुक्ता दाभोळकर म्हणाल्या की, खरोखरच हा धाडसी विषय करणे आव्हानात्मक बाब आहे, चित्रपटामुळे जनजागृती होईल आणि सरकार लवकरात लवकर त्यावरचा कायदा मंजूर करेल, यावेळी त्यांनी जातपंचायत बद्दलचे अनेक भयानक सत्य घटना सांगितल्या. आमच्या या कार्याला आर्त चित्रपटामुळे खूप मदत होईल, सर्वांनी हा चित्रपट नक्की पहावा.
शीतल साळुंके, गणेश यादव, जयराज नायर, संतोष मयेकर, अजित सावंत, अजित भगत इ. कलाकारांच्या प्रमुख भूमिका असलेला आर्त हा मराठी चित्रपट येत्या २० मे २०१६ रोजी सम्पूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे, चित्रपट हा जातपंचायत या व्यवस्थेवर कटाक्ष टाकतो, महाराष्ट्रात कसारा, नंदुरबार अशा अनेक ग्रामीण भागांत आणि संपूर्ण देशभरात अनेक राज्यात अशा पीड़ित महिलेंच्या घटना रोज वर्तमानपत्रातून वाचायला मिळतात, परंतु यावर सिनेमा करण्याचे धाडस कुणी करत नाही, परंतु गल्लाभरु विषयाला बगल देत मी हा विषय खुप सवेंदनशीलपणे चित्रपटात मांडला आहे अशी प्रतिक्रिया लेखक दिग्दर्शक राजेंद्र जी.साळी यांनी व्यक्त केली आहे,ते पुढे सांगतात की, अशा विषयाला स्थापित आणि ज्यांची काही ठराविक इमेज आहे असे कलाकार घेणे मी हेतुपुरस्कर टाळले आहे, सर्वात महत्वाचे म्हणजे माझ्या ह्या धाडसी विषयाला चित्रपट निर्माता म्हणुन दिलीप शहा यांनी विश्वास दाखवला त्यासाठी मी त्यांचा खुप आभारी आहे.
लेखक दिग्दर्शक राजेंद्र जी.साळी पुढे सांगतात की, या विषयाची दाहकता फक्त चित्रपटगृहात न राहता संपूर्ण देशभरात व्हावी यासाठी आणि या बाबतचा कायदा लवकर मंजूर व्हावा यासाठी आम्ही लोकसभेच्या सर्व सदस्यांसाठी एक विशेष खेळ आयोजित करणार आहोत.
No comments:
Post a Comment