Tuesday 16 May 2017

REVIEW – Sarkaar 3




परिक्षण - सरकार तीन

- Harshada Vedpathak


निलेश गिरकर आणि राम गोपाल वर्मा लिखीत सरकार तिन या चित्रपटात पुन्हा एकदा, घराणेशाही आणि गुन्हेगारी वर्चस्व या विषयाला समोर ठेवुन लिहीलेलं कथानक आहे. सुभाष नागरे याची दोन्ही मुलं वारल्यावर तो आपल्या नातवासह, आपली सत्ता कश्याप्रकारे संभाळतो. त्यात त्याला दगा देणारया जवळच्या आणि परिचीत लोकांचा तो काटा कश्याप्रकारे काढतो ते पहायला मिळते.



सुभाष नागरे यांच्या भुमिकेत, अमिताभ बच्चन हे नहेमीप्रमाणे भाव खाऊन जातत. तर त्यांच्या नातवाच्या भुमिकेतील अमीत साद क्षवेधी ठरतो.  गॅंगस्टर म्हणुन जॅकी श्रॉफ यांच्या भुमिकेला इतर पात्रांच्या तुलनेत खोली नसल्याचे जाणवते.



दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी सरकार आणि सरकार भाग दोन मधिल उत्सुकता येथे देखिल कायम ठेवली आहे. विवीध ढंगी कॅमेरा ऐगलने घेतलेली दृष्ये सरकार तिनच्या विषयाला गडदता, गुढता देण्यास यशस्वी ठरतात. तसेच चित्रपटाचे   पाश्वसंगीत देखिल व्यक्तीरेखा खुलवण्यास साथ देताना दिसतात.



मागिल दोन सरकार प्रमाणे याही सरकारचा बॉक्स ऑफीसवर दबदबा राहील असं दिसतय.


No comments:

Post a Comment