Sunday 14 May 2017

INTERVIEW - YAMI GAUTAM


मला वेगळ्या पठडींच्या भुमिकांची आवड आहे – यामी गौतम

-    हर्षदा वेदपाठक


 सरकार या चित्रपटातील तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील?


सरकार हा निश्चितच उत्कंठावर्धक असा चित्रपट आहे. मी त्यामध्ये अनु करकरे ही व्यक्तिरेखा साकारत आहे. माझ्या वडीलांचा खून झाला आहे आणि मला त्याचा बदला घ्यायचा आहे. या व्यक्तिरेखेसाठी माझीच निवड का केली, हा प्रश्न मला देखील पडला होता. त्यावर दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्याकडे अगदी सोपे उत्तर होते, कारण मी तुला यापूर्वी अशा भूमिकेत कधीच बघितलेले नाही. आणि एक फेअर ऍन्ड लव्लीमुलगी बंदूक कशी चालवते ते पहाणे खूपच रंजक असेल. मग मलाही त्याविषयी उत्सुकता वाटली. कारण मला, आतापर्यंत केलेल्या भूमिका करण्याची इच्छा होतीच. त्याचबरोबर वेगळ्या पठडीतला चित्रपट करुन पहाण्याची आणि काहीशी ग्रे भूमिका रंगविण्याचीही इच्छा होतीच. सरकारमध्ये काहीही आक्षेपार्ह नसून, कथेचा प्रवाह आहे. मला अशाच प्रकारच्या भूमिकेसाठी एक चांगले व्यासपीठ किंवा चित्रपट हवा होताच.

रामगोपाल वर्मांबद्दल काय सांगशील? त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?

त्यांचा रंगीला हा माझा अतिशय आवडता चित्रपट आहे. त्यामध्ये प्रेम, विनोद, भावभावना आणि खूपशी गाणी, असे सगळेच होते. त्याचबरोबर त्यातील मुन्ना आणि मिली यांसह सगळ्याच व्यक्तिरेखाही भन्नाट होत्या. रंगीलाबरोबरच सरकार, सत्या, भूत यांसारखे त्यांनी केलेले चित्रपट पाहून मला वाटले होते की ते खूपच संवेदनशील व्यक्ती असतील. तुम्ही त्यांना एखादा प्रश्न विचारलात तर ते कदाचित संकोच करतील. पण ते तुम्हाला अतिशय मनोरंजकरीत्या संवादात गुंतवून ठेवू शकतात. ते सेटवर फारसे बोलत नाहीत. खूपच वेगळे आहेत ते. काबिलपाठोपाठ सरकार येत आहे आणि अनु ही खूपच वेगळी व्यक्तिरेखा आहे. त्यासाठी मला किती तयारी करावी लागेल, याबाबत मी त्यांना विचारले. कारण काबिलसाठी मी शारिरीक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या खूपच तयारी केली होती. त्याचबरोबर मी आतापर्यंत कधीही बंदूक बघितली नसल्याचेही त्यांना सांगितले. त्यावर त्यांनी मला तू फक्त सेटवर ये एवढेच सांगितले. जर तुम्ही या व्यक्तिरेखेकडे पाहिले, तर समजेल की यामध्ये केवळ दिसणे महत्वाचे नाही. यामध्ये कोणताही मेक-अप नाही, केस विस्कटलेले, पुरुषी घड्याळ, शर्ट आणि जिन्स आणि पुरुषी बॅग असा माझा अवतार आहे.  ती एका उद्योगपतीची मुलगी आहे. एकदा का तुम्ही त्या व्यक्तिरेखेत शिरलात की सेटवर तुम्ही वेगळेच होता. तुम्हाला सवय असते की लोक तुम्हाला ग्रेट टेक, लेट अस टेक वन मोअर, यांसारख्या प्रतिक्रीया देतात. पण रामु फक्त ओके म्हणतात. ते पाहून मला धक्काच बसला. त्यावर त्यांनी मला सांगितले की त्यांचे ओके म्हणजेच उत्तम.... ते खूपच वेगळ्या प्रकारे दृष्य चित्रित करतात. तंत्रज्ञान आणि कॅमेऱ्याच्या सहाय्याने ते प्रत्येक दृष्याला खोली आणतात. कोणताही विचार मनात ठेवून येऊ नकोस, हे त्यांनी मला चित्रीकरणपुर्व सांगितले होते.

या भूमिकेसाठी काही संदर्भ बघितलेस का? मी

रामू सरांना मी त्याबद्दल विचारले असता, त्यांनी मला सांगितले की कोणालाही बघून किंवा कोणतीही संकल्पना मनात ठेवून येऊ नकोस. तुम्ही जेंव्हा शून्यापासून सुरुवात करता, तेंव्हा जास्त मजा येते. सरकारमध्ये बच्चन साहेबांबरोबर मी काम करणार असल्याचे मला समजले, तेंव्हा मला वेगळेच वाटले. ते एक ब्रॅंड आहेत. मला वाटले होते की, मी त्यांच्याशी खूप काही बोलेन पण प्रत्यक्षात मात्र मी शांत असे आणि त्यांना बोलताना ऐकत असे आणि ते प्रत्येकालाच ती व्यक्ती खूप खास असल्याची जाणीव करुन देतात. त्यांच्यामुळे आपण झाकोळून जाऊ असा विचारही मी कधी केला नाही. तुम्ही अशा क्षुद्र विचारांसह काम करु शकत नाही. सेटवर येण्यापूर्वीच असे विचार डोक्यातून बाहेर काढून टाकणे आवश्यक असते. नाही तर तुम्ही एक असुरक्षित अभिनेते बनता. जी माझ्या मते खूपच वाईट भावना असते. तुम्ही फक्त त्या भूमिकेचा आनंद लुटा आणि मग घाबरण्यासारखे काहीच नसते. तुम्ही एका चित्रपटाचा भाग असता आणि  भूमिका करत असता.

काबी नंतर सरकार या दोन चित्रपटानंतर कारकिर्दीविषयी काही खास योजना आखल्या आहेस का?

कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच मी एका गोष्टीबाबत स्पष्ट होते की मला चांगल्या आणि वैविध्यपूर्ण भूमिका करायच्या आहेत. कदाचित विविध प्रकारचे चित्रपट करायची इच्छा असेलही, पण कदाचित तशी संधी मला मिळणार नाही. मला काही कोणी गॉडफादर नाही आणि माझ्या स्वतःच्या बळावरच मी काम करत आहे. प्रत्येकापुढे त्याची स्वतःची आव्हाने, अडचणी असतात. तुम्हाला शून्यातून सुरुवात करावी लागते आणि काही धोकेही पत्करावे लागतात. विकी डोनर नंकर काही काळ माझ्याकडे काम नव्हते. मला काळजी करण्याची किंवा असुरक्षित वाटून घेण्याची गरज नव्हती.  तर  स्वतःवर विश्वास ठेवणे आवश्यक होते. मी चपळ आहे. चांगले नृत्य करु शकत होते आणि अधिक चांगला अभिनयही करु शकत होते. मात्र पळ काढू शकत नव्हते. आत्मपरिक्षण गरजेचे होते. त्यामुळे थोडी गती धिमी केली आणि माझ्या भूमिकांमध्ये सातत्य राखले. व्यवसायिक चित्रपट आता बदलासाठी तयार आहे, हे पाहून मला खूप आनंद वाटतो. जर तो चांगला असेल तर तो चालेल किंवा चालणार नाही. विकी डोनर हा एक कौटुंबिक चित्रपट ठरला.

फेअर ऍन्ड लव्ली वरुन उठलेल्या वादाबद्दल काय सांगशील?

तुम्ही जेव्हा सक्षमीकरण, स्वातंत्र्य, माझे आयुष्य आणि माझी निवड आणि माझी विश्वासार्हता याबद्दल बोलता, तेंव्हा मी देखील त्या जाहीरातीबाबत प्रामाणिकपणे सांगते. मी स्वतःच्या जीवावर मोठी झालेली व्यक्ती आणि मुलगी आहे, मग माझ्या विश्वासार्हतेवर प्रश्न का? मी दुसऱ्या कोणाच्या विचारसरणीने माझी कारकिर्द चालविणार नाही. मला वाटते दशकांपूर्वी आपण जशा जाहीराती बनवत होतो. तशा जाहीराती आपण आता करु शकत नाही आणि करुही नयेत. यामध्ये सकारात्मक बदल झाला आहे. गोरे नसण्याने तुम्ही दुःखी होऊ शकता हे जाहीरातीद्वारे दाखविण्याचा तुम्हाला हक्क आहे. यावर उपाय शोधण्याची वेळ आली आहे. मला कोणी माझ्यापुढील समस्या किंवा माझ्या प्रवासाविषयी विचारत नाही. तुमच्या ब्रॅंडची जाहीरात करा पण त्यामुळे कोणी दुखावता कामा नये, यासाठी काहीतरी उपाय असेलच. ब्रॅंड त्यावर काम करत आहे. मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी एक प्रतिष्ठान सुरु केले आहे. प्रयत्न आणि बदलांच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊलच असल्याचे मला वाटते.



काबिलमुळे तुला बरेच दरवाजे खुले झालेत का?

नक्कीच. सध्या मी काही पटकथा वाचत आहे आणि त्यातील काही रंजक आहेत आणि काही मी यापूर्वी केलेल्या. निर्माते लवकरच त्याविषयी घोषणा करतील.



अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांविषयी काय सांगशील?       



त्यांच्या मला आवडणाऱ्या चित्रपटांची मी एक यादीच केली आहे. मला खात्री आहे की ते आतापर्यंत लाखो चाहत्यांना भेटले असतील. शोले, जंजिर, दिवार, त्रिशूल, पिंक, पा हे माझे आवडते चित्रपट आहेत.  ते एक उत्युंग व्यक्तीमत्व आहेत यावर कोणाचेही दुमत होणार नाही.



तू आतापर्यंत काम केलेल्या स्टार्समध्ये तुला काय साम्य आढळले?



हृतिक ते मि. बच्चन, जॉन ते सगळेच खूप वक्तशीर आहेत.





नेपोटीझमबद्दल काय सांगशील?



जर तुम्ही त्याचा साहित्यिक अंगांनी जरी विचार केलात, तरी ते तुम्ही एका वाक्यात सांगू शकत नाही. ते कदाचित अधिक कठीण असेल, पण मला आनंद आहे की मला काही अधिक प्रमाणात मेहनत करावी लागली. शेवटी तुमचे कामच बोलले पाहिजे. तुम्ही त्या गोष्टीचा आदर केला पाहिजे आणि काम हा त्यावरचा एकमेव उपाय आहे.



आर्थिकदृष्ट्या तु कश्याप्रकारे संभाळतेस सगऴे व्यवहार?



मी एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली आहे. मी कितीही उंचावर पोहचले तरी मी किंमतीचे लेबल पहाणारच. पैसा माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि तो तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणे आणि त्याचे मूल्य जाणणे आवश्यक असते. मी पैशाचा विचार करुन कधीही काम करत नाही. माझ्या आजीसाठी मी एक छोटेसे शेत आणि घर घेतले आहे. त्यामध्ये खरे तर जास्त करुन भावनिक गुंतवणूक अधिक आहे.



तुझ्या बहिणीबाबत काय सांगशील?



ती खूपच गुणवान आहे. ती जास्त मोकळीढाकळी आहे. चांगली वक्ता आणि सुंदर आहे ती. जेंव्हा मला काही पोषाख करायचा असतो, तेंव्हा मी तिलाच विचारते. उद्या जर काही चांगले काम आले तर ते ती जरुर करेल.


No comments:

Post a Comment