Monday 22 May 2017

INTERVIEW - IRRFAN KHAN


इंग्रजी भाषा आपल्याला वरचढ बनवते हा सर्वसाधारण समज आहेइरफान खान

-    हर्षदा वेदपाठक

मागिल आठवड्यात प्रदर्शित झालेल्या हिंदी मिडीयम या चित्रपटाला सर्वस्तरावर पसंद केले जात आहे. देशभरात काही राज्यांनी त्याला टॅक्स फ्री देखिल केलं आहे. सर्वसाधारण प्रेक्षकांप्रमाणे पालकांनी हिंदी मिडीयमला पसंती दिली आहे. त्याबद्दल अभिनेता इरफान खान यांच्याबरोबर केलेली चर्चा....

हिंदी भाषा आणि त्या माध्यमातील शाळांबद्ल काय सांगाल ?

अगदी बालपणापासून मी हिंदीतच बोलत आहे. आम्ही कॉन्व्हेंटमध्ये जावे अशी माझ्या आईची खूप इच्छा होती, तरी आम्हाला मात्र हिंदी साहित्य अधिक जवळचे वाटे. इंग्रजी आपल्याला इतरांपेक्षा वरचढ बनवते किंवा त्यामुळे तुम्ही मुलींना प्रभावित करु शकता. हा सर्वसाधारण समज आहे. अगदी मी सुद्धा इंग्रजी बोलून मुलींवर छाप टाकण्याचा प्रयत्न केला आहे. हिंदी फिल्म इंडस्ट्री मात्र सेक्युलर आहे. येथे सगळ्या भाषांबद्दल समान भाव दिसून येतो. सगळे स्टार्स हिंदी बोलतात. आपल्यावर ब्रिटीशांनी अनेक वर्ष राज्य केल्यामुळे, इंग्रजी ही नेहमीच प्रभावी भाषा राहीली आहे. मग तो व्यवसाय असू दे किंवा नोकरी. भावना प्रभावीपणे मांडण्यासाठी भाषा ही एक वाहन असते असं मला वाटतं.

तुम्ही हॉलीवुडमध्ये काम केलं आहे. तेथील भाषेबद्दल तुम्हाला काय वाटते ?

तुम्हाला त्यांचा बोलण्याचा ऍक्सेंट अर्थात बोलण्याची विशिष्ठ ढब किंवा त्यांचे उच्चारण आत्मसात करावे लागते त्याशिवाय त्यांना ते समजत नाही. इंटरनेटमुळे मी माझ्या मुलांना हिंदी शिकवतो. वैयक्तीकरीत्या मी हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा वापरतो. ते जेंव्हा त्यांच्या आजी-आजोबांकडे जातात तेंव्हा त्यांना थोडेसे बंगाली माहित होते. आणि तुम्हाला तुमची भाषा माहित असणे हे आज सुसंगत आहे आणि आणखी दहा वर्षांनीही ते सुसंगतच असेल. वेगवेगळ्या भाषा माहित करुन घेण्यात काहीच चूक नाही.

विदेशी चित्रपटात काम करण्याचा अनुभव कसा होता?

माझा अनुभव खूपच चांगला होता. मी अमेरीका, इंग्लड, इराण, पाकिस्तान अशा वेगवेगळ्या देशांतील कलाकारांबरोबर काम केले आहे. अनेकदा त्यांच्याकडे कथानकाला महत्व दिले जाते. त्यामुळे तुम्ही जेव्हा व्यक्तिरेखा साकारता, तेंव्हा ते सोपे जाते.



इश्युबेस चित्रपट आपल्याकडे कमी तयार होतात. झालेच तर त्याला कलाकार मिळत नाहीत?

हिंदी मिडीयम या चित्रपटाप्रमाणे मी भूमिका कधीच केलेली नाही, चित्रपटाला स्विकारताना कलाकार असा विचार कधीच करत नाहीत. मला वाटतं एका अभिनेत्यासाठी कोणतीही मर्यादा नसते.

हिंदी मिडीयममधिल बालकलाकारा दिशिता सेहगल विषयी काय सांगाल?

ती एवढी चांगल्या प्रकारे प्रशिक्षित, स्मार्ट आणि हुशार होती, की आम्हाला तिच्याकडून खूप काही शिकता आले. ज्या प्रकारे तिने यात काम केले आहे, ते पहाता ती उपजतच अभिनेत्री आहे, असेच म्हणावे लागेल. यातील क्लायमॅक्स खूपच अवघड होता आणि तो चित्रीत करताना त्यासाठी खूप वेळ लागला.

एक विद्यार्थी म्हणून तुम्ही कसे होतात? विद्यार्थीदशेतील काही आठवणी सांगाल?

आम्ही सकाळी नऊ वाजता शाळेत जात असू आणि सहा वाजता परत येत असू. मी खूप खेळत असे. एक विद्यार्थी म्हणून मी अगदी वाईट होतो. खूप जास्त झोपायची सवय होती मला. मी आहे की नाही हेदेखील माझ्या वर्गमित्रांना समजत नसे. मागच्या बाकांवर बसणाऱ्या मुलांपैकी मी एक होतो. खूपच लाजराबुजरा होतो मी. माझा गणित विषय मात्र चांगला होता.

मग या लाजाळूपणावर कशी मात केलीत?

ती मी कधीच करु शकलो नाही, पण एक अभिनेता म्हणून मी लोकांशी बोलू शकतो, जेंव्हा लोकांचा सामना करायची वेळ येते तेव्हा मी अजूनही लाजाळूच आहे.

एक कलाकार म्हणून तुम्हाला हॉलीवुड आणि हिंदी चित्रपटांच्या फिमध्ये तफावत जाणवते काय ?

चित्रपटांसाठी मला येथे चांगली फी मिळते. तर तेथे मी एखादी मालिका करत असेन तर मला चांगली चांगली आर्थीक प्राप्ती होते. परंतु मला दोन्ही
ठीकाणी कलाकारांना काय फि देतात याची कल्पना नाही. 


हॉलीवूडमध्ये एखादा आगामी चित्रपट आहे का?

होय, ऐक चित्रपट मी तेथे करत आहे. मी त्याविषयी बोलण्यापेक्षा स्टुडीओने त्याविषयी घोषणा केली तर बरं होईल.


हिंदी माध्यमाच्या शाळांबद्दल तुमचे काय मत आहे?

त्यांना चांगले शिक्षक मिळू शकतात, अशा ठिकाणी हिंदी माध्यमाच्या शाळा असाव्यात आणि हिंदी माध्यमे चांगले करतील असा विश्वास पालकांना मिळायला हवा.








No comments:

Post a Comment