Monday 12 September 2016

INTERVIEW with Bar Bar Dekho actor Sidharth Malhotra



बार बार देखोमधुन बरच काही शिकण्यासारखे आहे – सिध्दार्थ मल्होत्रा

-      हर्षदा वेदपाठक

चित्रपटसृष्टीत नवखा असुन देखिल सिध्दार्थ मल्होत्रा या अभिनेत्याकडे, अनेक बडया बॅनरचे चित्रपट आहेत. बार बार देखो या त्याच्या आगामी चित्रपटात तो एका अनोख्या भुमिकेत दिसला आहे.

तु पहिल्यांदाच कॅतरीना कैफबरोबर काम करत आहेस, काय सांगशिल  त्याबद्दल ?

सेटवर कश्याप्रकारे वावरायचे हे कोणी तिच्याकडुन शिकावे. इतक्या वर्षाच्या अनुभवानंतरही ती, चित्रीकरणाचा तिचा पहिलाच दिवसच आहे अश्याप्रकारे वागताना दिसते. तिला पाहुनच मला स्वताला देखिल किती मेहनत करावी लागेल ते मी शिकलो.

रोमॅऩ्टीक चित्रपट चालण्यासाठी प्रमुख कलाकारांची केमीस्ट्री फार महत्वाची असते.  तु आणि कॅतरीनाने ती कश्याप्रकारे तयार केली ?

सुरवातीला ते फार कठीण काम होते. त्यासाठी आम्ही एकमेकांबरोबर खुप वेळ घालवायचो. चित्रपटाच्या कथेनुसार आमची पात्र हि एकमेकांना बालपणापासुन ओळखत असतात. त्यामुळे आमच्यामध्ये एक कम्फर्ट झोन देखिल असणे महत्वाचे होते. त्यासाठी आमचे वर्कशॉप घेतले गेलेत.  त्यात पहिल्यांदा आम्हाला एकमेकांच्या डोळ्यात पंधरा मिनीटे डोळे न बंद करता बघायचे होते.  त्यात कॅतरीनाने पहिल्यांदा डोळे मिटलेत. त्यानंतर आम्ही एकमेकांना ओळखायला लागलोत आणि आम्ही एकत्रीत दृष्ये दयायला लागलोत. हा सगळा अभ्यास आम्हाला करायला लागला कारण प्रेक्षकांना प्रमुख कलाकार आवडणे, त्यांची बांधुन ठेवणारी केमीस्ट्री महत्वाची असते आणि ती पाहताना सहज दिसली पाहिजे. नाहीतर सगळा चित्रपट तोंडावर पडेल.

बार बार देखो हा चित्रपट स्विकारण्यामागिल कारण काय ?

तो चित्रपट स्विकारण्यामागिल कारण म्हणजे त्या चित्रपटाचे कथानक हे वेगळे असल्याने मला आवडले. जयच्या भुमिकेबरोबर मी सार्धम्य साधु शकतो. आपल्याकडील तरुण मुलं हल्ली आयुष्यात वैयक्तीक बाबतीकडे दुर्लक्ष करुन, फक्त करीयरवर लक्ष देताना दिसतात.  त्यांच्यासाठी बार बार देखो हा चित्रपट एक धडा आहे. चित्रपटाच्या अखेरीस प्रेक्षकांसाठी  एक संदेश आहे. तो म्हणजे, तुमचं जिवन आणि काम यांची सांगड घातली गेली पाहिजे. अगदी समाधानकारक कथा या चित्रपटात आहे तर त्याची पटकथा हि मी आतापर्यत वाचलेल्या कथांमध्ये सर्वेत्तम आहे असं मला वाटतं.

आतापर्यत तुला आवडलेल्या टाईम ट्रॅव्हल्स या विषयावर बेतलेले चित्रपट कोणते ?

टाईम ट्रॅव्हल्सवर आधारीत चित्रपट आवडणारयांपैकी मी नाही. बॅक टु द फ्युचर हा असाच एक गाजलेला चित्रपट आहे. स्ट्रार ट्रेक हा पण सगळ्यांना आवडलेला चित्रपट आहे. परंतु बार बार देखो मध्ये तुम्हाला कोणत्याही मशिनखेरीज टाईम ट्रॅव्हल पाहता येणार आहे.

भुमिका कितपत आव्हानात्मक होती ?

आतापर्यंत मी साकारलेल्या भुमिकांपैकी, बार बार देखो हा चित्रपट माझ्यासाठी खुप आव्हानात्मक होता. वेगवेगळ्या वयामध्ये मला त्या टाईम झोनमध्ये भावनात्मकता दाखवायची होती. नवरा किंवा वडील होणं आणि चाळीशीच्या पुढील अभिव्यक्ती  दाखवायची होती मला. त्यामुळे जयची भुमिका करताना माझी दमछाक झाली खरी.

एकेदिवशी तु चाळीशीचा होऊन उठलास तर कश्याप्रकारे हाताळशील स्वताला ?

(हसुन) आता माझ्या दिसण्यावर जशी स्तुती मिळते ती तशीच पुढे मिळत राहो असं मला वाटतं. वैयक्तीक आणि व्यावसायिक आयुष्य हे समसमान जगायला आवडेल मला. त्यात मी व्यावसायीकरीत्या खुप काही मिळवलं असेन. तर वैयक्तीकरीत्या अनुभवसमृध्द व्हायला आवडेल मला. काम आणि कुटुंब या दोहोंचा बॅलेन्स करा हेच या चित्रपटामधुन मी शिकलो  आहे.

टाईम ट्रॅव्हल करुन जर काही बदलायची संधी मिळाली तर काय करशील ?

मी माझ्या प्रगतीपुस्तकातील मार्क बदलेन. माझी आई माझ्या शैक्षणिक प्रगतीवर खुपच नाराज असायची. मी जेव्हा नववी इयत्तेमध्ये होतो तेव्हा बिचारीला खुपच स्ट्रेस दिला आहे. मला परत परिक्षेला बसुन खुप मार्क कमवायला आवडेल.

काळाच्या मागे जाउन कोणत्या चित्रपटात तुला भुमिका करायला आवडेल ?

अमिताभ बच्चन अभिनीत हम या चित्रपटात मला, त्यांचीच भुमिका करायला आवडेल. त्या चित्रपटातील बच्चन यांनी रंगवलेला हिरोईझम खुप सशक्त आहे. पुढे हाच माणुस आपल्या कुटुंबासाठी कसा नमतो ते देखिल तितक्याच सशक्तपणे दाखवलं गेलं आहे. अश्या चित्रपटात काम करायला नक्कीच आवडेल.








No comments:

Post a Comment