Wednesday 6 July 2016

After Befikra Tiger Shroff can be seen as Munna Jackson

आतापर्यंत आपण टाइगर श्रॉफला ऐक्शन करताना पाहिले असेल. पण बेफिकरा या चित्रपटाद्वारे तो रोमॅंटिक भूमिकेत दिसणार आहे. दिशा पटनी या नवअभिनेत्री बरोबर तो पहिल्यांदा काम करत आहे. बेफिकरा या चित्रपटाच्या प्रदर्शन पूर्व दिशा अणि टाइगरच्या प्रेमप्रकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे. काही दिवसपूर्वी या चित्रपटाचा प्रोमो दाखवण्यात आला, त्या पत्रकार परिषदेमध्ये टाइगर आणि दिशेला त्या बाबत विचारता टाइगरने दिशा आपली चांगली मैत्रीण असल्याचे सांगून तिच्या बरोबर काम करताना सहजता येत असल्याचे सांगितले. तर आपण दोघाना अभिनय, व्यायाम आणि खेळाची आवड असल्याने एकत्रीत वेळ घालवत असल्याचे सांगितले. टाइगर एक उत्तम नृत्यकार आहे हे आपण जाणतो. त्याच्याबरोबर बेफिकरामध्ये पदलालित्य जूळवताना खुप मेहनत घ्यावी लागल्याचे ती कबूल करते.  भारतात हृतीक रोशन याला टाइगर आपला गुरु मानतो तर जगप्रसिद्ध गायक नृत्यकार माइकल जैक्सन हा त्याचा आदर्श आहे. या सगळ्या मुद्याना दिग्दर्शक शब्बीर खान मुन्ना जैक्सन या त्यांच्या आगामी चित्रपटाद्वारे कैप्चर करायचे ठरवले आहे. आणि त्या चित्रपटात टाइगर बरोबर असलेली दिशा पटनीची कैमिस्ट्री वापरायला शब्बीर खान विसरले नाहीत बेफिकरा या चित्रपटाचे यशराजच्या बेफिकरे बरोबर काहीच देनेघेणे नसल्याचे सांगून, बेफिकराचे लेखक निर्माता आपला चित्रपट हा मागील नऊ महीने तयार होत आहे. त्या दरमियान बेफिकरे या चित्रपटाबद्दल काही ऐकले नसल्याचे सांगतात. 

No comments:

Post a Comment