योग्य
जोखीम घेतली तर यशस्वी होता येतं - टायगर श्रॉफ
हर्षदा
वेदपाठक
हिरोपंन्ती
या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीचे लक्ष वेधल्यावर टायगर श्रॉफ, बागी या
चित्रपटासह येत आहे. या चित्रपटातील ऍक्शनची खुप स्तुती होऊ लागली आहे. एकंदरीत या
ज्युनीअर श्रॉफच्या बागी इमेजबद्दल केलेली चर्चा...
बागीचे
प्रोमो पाहता तो ऐक वेगळा चित्रपट जाणवतो, रिस्क घेतली आहेस असे तुला वाटते काय?
जर
तुम्ही तुमच्या जिवनात रिस्क घेत नाही तर जिवन जगण्याची मजा ती काय. तिच रिस्क
तुम्ही योग्यप्रकारे घेतलीत तर तुम्ही यशस्वी ठरता असं मला वाटतं. अश्याप्रकारेच
जिवनात गंमत आणता येईल. ऐक कलाकार म्हणुन मी माझ्या भुमिकांबदद्ल रिस्क घेणे पसंद
करतो. मला वाटतं त्याचमुळे जिवनात ग्रोथ करु शकतो.
हिरोपंन्तीनंतर
पुन्हा ऐकवार तु शब्बीर खानबरोबर काम करत आहेस. तुमची कर्फ्मट लेव्हल खुप चांगली
आहे काय ?
दोन
वर्षानंतर तुम्ही अश्या दिग्दर्शकाबरोबर काम करत आहात, ज्याच्याबरोबर तुम्ही तुमचा
पहिला चित्रपट केला होतात. माझ्यासाठी ती फार आनंदाची बाब आहे. त्यामुळे सगळा क्रु
तोच होता. चित्रीकरण करताना फार पॉझेटिव्ही वातावरण राहीलं सेटवर, काम आणि विरंगुळा
यापैकी कशाचाच क्षिण आला नाही. सेटवर दिग्दर्शकांनी आम्हाला खुप स्टेस
फ्री वातावरण दिलं हे सांगायची गरज नाही.
बागीमध्ये
तुझी ऍक्शन क्षमता, नृत्यलालीत्य आणि अभिनय या सगळ्यांची उत्तम सांगड घातलेली दिसुन येते ?
हिरोपंन्ती
दरम्यान मी नविन असल्यानं मला कॅमेरा काय किंवा मार्क काय असतो ते ठावुक नव्हते.
ते मला सगळं शब्बीरनं शिकवलं. खरं तर त्यानं मला क्राफ्टची ऐबीसीडी शिकवली म्हटले
तरी चालेल. या दुसरया चित्रपटादवारे माझी चित्रपटाची समज वाढली असे म्हटले तरी
चालेल.
हिरोपंन्तीचा
टायगर आणि बागीचा टायगर यांत काय फरक सांगशिल ?
हिरोपंन्तीच्या
तुलनेत बागी या चित्रपटातील माझी भुमिका खुप मॅच्युअर्ड आहे. वयानं हा थोडा मोठा
आणि विचारशिल आहे. हिरोपंन्ती मध्ये माझी भुमिका ऐका दिशेनं जाणारी होती. तर यात
तुम्हाला वेगवेगळ्या शेडस् दिसतील. आणि ते तुम्ही चित्रपटाच्या प्रेमोमध्ये पाहिलच
असेल.
वास्तविक
जिवनात तु किती बागी आहेस ?
एकदम
सरळ स्वभावाचा माणुस आहे मी. माझं ईमान आणि अधिकार यांना घेऊन मी बागी होऊ शकतो.
बागी
मधिल ऍक्शन पाहता तु, ऍक्शनला वेगळी दिशा देत आहेस असं वाटतं ?
खरं
सांगायचं तर इंडस्टीमध्ये ऍक्शनला घेऊन कोणी फारसा प्रयोग केलेला नाही. आपल्याकडे
ऍक्शन हिरो म्हणुन फक्त ऐकच नाव घेतलं जातं आणि ते आहे अक्षय कुमार सर. ऍक्शन करुन
मी हिरो होईन हे मी म्हणत नाहीय. ऍक्शनला घेऊन चित्रपटसृष्टीत मला थोडा बदल करायचा
आहे ते मात्र नक्की. तसं पाहता आपल्याकडे सगळेच बाप माणसं आहेत, मला त्यांच्यात
राहुनच नाव कमवायचं आहे.
हिरोपंन्तीनंतर
बागी मध्येपण तु ऍकशन करीत आहेस. टाईपकास्ट व्हायची भिती नाही वाटत ?
उलट
मी खुश आहे की मला ऐक ओळख मिळत आहे. लोकं माझी गणती ऍक्शन हिरो म्हणुन करु लागले आहेत.
मला वाटतं हृतिक रोशन नंतर कोणीतरी नविनता आणण्याचा प्रयत्न केला आहे. येथे
स्पर्धा खुप आहे, त्यामुळे मला माझा वेगळेपणा तयार करत येथे टिकुन राहिलं पाहिजे.
श्रध्दा
कपुर तुझी बालपणीची मैत्रीण आहे. तिच्याबरोबर काम करताना अऩुभव कसा राहीला ?
आम्ही
ऐकाच शाळेत होतोत. चांगली मैत्रीण आहे ती माझी. शाळेत असताना ती प्रत्येक स्पर्धेत
भाग घ्यायची. ती शाळेतील हिरो होती असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही.
बालमैत्रीणीबरोबर एकत्रीत काम करण्याचा अनुभव खुप चांगला होता. काम करताना आमच्यामध्ये
खुपच सहजता होती. अगदी रोमॅन्टीक दृष्य करताना देखिल आम्ही सहज होतोत. बागी करताना,
बालपणीच्या खुप आठवणी आम्ही एकत्रीत जागवल्यात.
तु
आपल्या कोणत्या सहकलाकाराच्या कामावर नजर ठेवतोस. आणि कोणाला स्पर्धक मानतोस ?
खरं
सांगायचे तर मी हृतिक रोशन यांचेच काम पाहतो आणि मला त्यांचे काम आवडते. मला वाटते
ते महान आहेत आणि त्यांच्यासारखे कोणी होऊ शकत नाही. त्यांनी स्वतःसाठी ऐक वेगळाच
दर्जा तयार केला आहे. मला देखिल त्यांच्याप्रमाणे
दर्जात्मकता आत्मसाद करायची आहे. त्याचे लुक्स, अभिनय आणि ऍक्शन यांना तोड नाही.
तुझे
वडील जॅकी श्रॉफ यांनी पण काही चित्रपटांमध्ये ऍक्शन केली आहे. आता परत तुझी तुलना
त्यांच्याबरोबर केली जाईल असं तुला वाटतं नाही काय ?
मला
वाटतं आता आमची तुलना संपली आहे. ती भिती हिरोपंन्ती दरम्यान होती. जसा तो चित्रपट
प्रदर्शित झाला त्यानंतर ती तुलना संपली. माझे वडील माझ्यापेक्षा अधिक मॅचो आहेत,
त्यांचे व्यक्तीमत्व सुंदर आणि रुबाबदार आहे. मी कितीही ऍक्शन केली तरी माझा चेहरा
हिरो सारखा नाही हे मी जाणतो. आणि माझ्या जिवनाची हिच मोठी लढाई आहे असं मी
म्हणेन. अजुन देखिल मी माझ्या वडीलांसमोर बाळबोध वाटतो. आणि याच कारणामुळे मी माझी
रोमॅन्टीक इमेज तयार करु पाहत आहे, जो ऍक्शन करु शकेल.
तुझी
बहिण कृष्णा अभिनेत्री म्हणुन येणार आहे अशी जोरदार चर्चा आहे. त्याबद्दल काय
सांगशिल
मला
नाही वाटंत ती त्यासाठी काही प्रयत्न करीत आहे म्हणुन...