Saturday 22 September 2018

Kalpana Lajmi passed away

प्रसिद्ध दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांचे आज मुंबईत प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले.

रुदाली, एक पल, दमन, चिंगारी यासारख्या स्त्री सक्त विषय असलेल्या चित्रपटांसाठी त्या प्रसिद्ध होत्या. कल्पना लाजमी या प्रसिद्ध चित्रकार ललिता लाजमी यांच्या कन्या, तर प्रसिद्ध दिग्दर्शक गुरूदत यांच्या भाची होत्या. लाजमी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्याकडे सहाय्यक म्हणून केली. त्यांच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीची सुरुवात ही डॉक्युमेंटरी फिल्मेकर म्हणून 1988 साली झाली.

चाळीस वर्ष लाजमी ज्यांच्या बरोबर राहिल्या त्या भूपेन हजारिका यांच्यावर आधारित पुस्तक त्यांनी लिहिले. भूपेन हजारिका ईज आय नो हिम या पुस्तकांचे प्रदर्शन 8 सप्टेंबर रोजी श्याम बेनेगल यांच्या हस्ते करण्यात आले. तेव्हा देखील त्या कार्यक्रमाला  उपस्थित राहू शकल्या नाहीत. तब्येत खूपच खराब असल्याकारणाने डॉक्टरांनी त्यांना कुठल्याही परिस्थितीत डिस्चार्ज देण्यास नकार दिला होता. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. मागल्या वर्षी त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान करण्यात आले होते.

मृत्यूसमयी कल्पना लाजमी यांचे वय 61 होते. त्यांच्या निकटवर्ती कुटुंबांमध्ये फक्त यांची आई ललिता लाजमी आहेत

No comments:

Post a Comment