Sunday 9 September 2018

Eco friendly Ganpati


इको फ्रेंडली गणपती साजरा करण्यासाठी नाहर ग्रुप ने दिले त्यांच्या नाहर अम्रित शक्तीच्या रहिवाशांना प्रोत्साहन

इको डेकॉर व ग्रीन गणेशा बनविण्यासाठी आयोजित केली कार्यशाळा

सप्टेंबर ०७ २०१८, मुंबई: मागील काही वर्षांपासून 'गो ग्रीन' चा संदेश देण्याची प्रथा यंदा ही सुरु ठेवत नाहर ग्रुप ने त्यांच्या 'अवर ग्रीन गणेशा' या इनिशिएटिव्हसाठी मुंबईतील चांदिवली येथे नाहर इंटरनॅशनल स्कुलमध्ये ६ व ७ सप्टेंबर २०१८ रोजी दोन कार्यशाळा आयोजित केले. इको डेकॉर व ग्रीन गणेशा बनविण्यासाठी असणाऱ्या या कार्यशाळेमध्ये नाहरच्या अम्रित शक्ती टाउनशिप मधील २०० रहिवाशी सहभागी झाले होते. पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) ज्यामुळे विसर्जनानंतर समुद्री जीवांना आणि पर्यावरणाला तीव्र नुकसान होतो, त्याचा वापर न करता शाडू मातीचा वापर करून पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती व मखरांची सजावट बनविण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते.

या इनिशिएटिव्ह बद्दल बोलताना मंजू याग्निक, उपाध्यक्ष, नाहर ग्रुप, यांनी सांगितले," सरकारने स्वच्छ भारत अभियान पासून आता ग्रीन (इको फ्रेंडली) गणेश चतुर्थी व नुकताच झालेल्या प्लास्टिक व थर्माकॉल बंदी सारख्या मोहीमची सुरुवात केली असून पर्यावरचे संरक्षण आणि स्वच्छ परिसरात राहण्याच्या संघर्षाला ते अधिक तीव्र करतो. सरकारच्या या मोहिमेचे दखल घेत आम्ही नाहर ग्रुप 'गो ग्रीन' इनिशिएटिव्हला मागील काही वर्षांपासून प्रोत्साहन देत आहोत व हा वर्ष आमचा सलग दुसरा वर्ष आहे ज्यात 'अवर ग्रीन गणेशा' इनिशिएटिव्हसाठी आम्ही आमच्या रहिवाशी व त्यांच्या मुलांसाठी इको डेकॉर आणि ग्रीन गणेशा बनविण्यासाठी दोन कार्यशाळेचे आयोजन करत आहोत."   

पुढे बोलताना त्यांनी म्हटले, "लोक आता जास्त इको सेन्सिटिव्ह होत असून नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करण्याच्या महत्वाबद्दल ते सावध होत आहेत. 'अवर ग्रीन गणेशा' इनिशिएटिव्हला जास्तीत जास्त लोक प्रोत्साहन देत आहेत आणि इको-फ्रेंडली गणेशा व सजावट कसे बनवायचे ते शिकण्यासाठी स्वतःचे नाव नोंदवत आहेत याचा आम्हाला खूप आनंद आहे." 

यासहित नाहर ग्रुप इको-फ्रेंडली गणेशाच्या विसर्जनासाठी नाहर अम्रित शक्ती टाउनशिप मध्ये नाहरच्या नेक्टरफिल्डमधील पटांगणात १० दिवसासाठी मानवनिर्मित तलाव बनवून विशेष व्यवस्था करणार आहे. हे विसर्जनाचे पाणी निसर्गाला पुन्हा देण्याच्या भावनेने टाउनशिपमधील वृक्षांना पाणी देण्यासाठी वापरले जाईल.



No comments:

Post a Comment