Wednesday 22 March 2017

तेजस तुंगार लिखित 'जळू' या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणास लवकरच सुरवात


                    

 'चित्रपटाचा विषय हाच 'चित्रपटाचा खरा हिरो' अशी ओळख असलेल्या आशयघन मराठी चित्रपट सृष्टीत अजून एक नवी संस्थे चे आगमन होत आहे, ती म्हणजे साई नक्षत्र प्रोडक्शन. निर्माते अजितकुमार धुळे यांच्या 'साई नक्षत्र प्रोडक्शन' निर्मित, तेजस तुंगार लिखित 'जळू' या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणास लवकरच सुरवात होणार असून सी.आय.डी, आहट, मधली सुट्टी, कॉमेडी एक्सप्रेस यांसारख्या एका पेक्षा एक मालिकांचे संकलक निखिल भोसले ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन संकलन कारणार आहेत. चित्रपटातील नृत्यदिग्दर्शन प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर करणार असून नितीन चांदोरकर हे कार्यकारी निर्मिता म्हणून जबाबदारी पार पडणार आहेत

चित्रपटात ज्योती सुभाष, कमलेश सावंत यांसारखे एकापेक्षा एक कलाकारांचा समावेश असून त्यांची नावे लवकरच समजतील, असे 'जळू चित्रपटाचे निर्माते अजितकुमार धुळे यांनी म्हटले. वास्तववादी असणारा जळू हा सिनेमा महिलांना नक्कीच प्रेरणा देणारा असेल. महिला सशक्तीकरण होणे हे काळाची गरज आहे, तोच विषय घेऊन आम्ही जळू ची निर्मिती करीत असल्याचे निर्माते अजितकुमार धुळे यांनी सांगितले. सिनेमाचे चित्रीकरण एप्रिल मे महिन्यात होणार असल्याचे, दिग्दर्शक निखिल भोसले यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment