Friday 17 August 2018

RIP Atal Bihari Vajpayee


उत्कृष्ट राजनितिज्ञ,अजातशत्रु, कवी ,पद्मविभुषण, भारतरत्न माजी पंतप्रधान मा.श्री अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन .

*अटल है ध्यास अटल है विश्वास*भारतीय जनता पार्टी चे सर्वोच्च नेतृत्व श्रधेय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1925 ला ग्वाल्हेर मध्य प्रदेश राज्यात जाला वयाच्या 15 व्या वर्षा पासून अटलजी चा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ च्या कार्याशी जवळ चा संबंध आला संघ स्वयंसेवक ते संघ प्रचारक अश्या विविध महत्वपूर्ण जबाबदाऱ्या त्या यशस्वी रित्या पार पाडल्या  लखनऊ  विद्यापीठा तुन  एम ए चे शिक्षण  ज़ालेले अटलजी ना राजशास्रात पीएचडी करावयाची होती परंतु संघ विचाराने प्रेरित होऊन संघ कार्यात त्यांनी स्वताला वाहून घेतले
देशाच्या राजकारणात जवळपास ६० वर्ष अविरत उत्साहाने आणि अतिशय सभ्यतेने वावरणा-या राजकारण्यांमध्ये अटलजींचे नाव आदराने घेतले जाते. एक हिंदी कवी म्हणून जीवनाची  सुरुवात करणारे अटलजी, हे शामाप्रसाद मुखर्जी यांच्या सहवासात आले. त्यांचे सचिव बनले आणि अटलजींच्या नेतृत्वाला परिसस्पर्श झाला. १९५७ मध्ये बलरामपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत पहिल्यांदा पाऊल ठेवणारे वाजपेयी, बलरामपूरला निवडणूक लढवायला जाताना कोणतेही रिझव्‍‌र्हेशन नसलेल्या तिस-या वर्गाच्या डब्यात, जिथे सामान ठेवतात त्या वरच्या बाकावर झोपून बलरामपूरला पोहोचले होते. त्यांच्या लालित्यपूर्ण लिखाणात (अपनी अपनी बात) त्यांनी त्या प्रवासाचे अतिशय सुंदर वर्णन केलेले आहे. संसदेमध्ये पहिल्यांदा दाखल झाल्यानंतर तरुणपणातल्या त्यांच्या अमोघ वाणीने त्यांनी विरोधी पक्षाच्या बाकाला आणि विषयांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. विरोधी पक्षाच्या बाकावर बसलेल्या सदस्याला, सत्ताधारी पक्षाच्या बाकावरचे सदस्य किती सन्मानाने वागवतात आणि त्याचा कसा आदर करतात, याचे उदाहरण वाजपेयीच आहेत. त्यावेळचे सर्वोच्च लोकप्रिय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हेही वाजपेयी यांच्या अत्यंत मुद्देसूद, अभ्यासपूर्ण भाषणाने प्रभावीत होत असत आणि याच पंडितजींनी तेवढय़ाच मोकळेपणाने १९५८ सालातच सांगून टाकले होते की, ‘प्रधानमंत्री पद के लिए अटलजी का एक दिन पक्का..’ पंडितजींचे ते शब्द २८ वर्र्षानी खरे ठरले.सन १९५७ पासून ५० वर्षा पेक्षा जास्त वर्ष कार्य करणारे एकमेव खासदार आहेत आणीबाणी  मध्ये 19 महिने कारवास भोगले नंतर 1977 मध्ये देशा चे परराष्ट्र मंत्री जाले  पुढे आरएसएस च्या विचार घेऊन भारतीय जनसंघ ची भारतीय जनता पार्टी 6 एप्रिल 1980 ला बनली मुंबई येथे स्थापन ज़ालेल्या भाजपा चे प्रथम अध्यक्ष होण्याचा गौरव अटलजी  प्राप्त जाला 1980 ते1996 या 16 वर्षा च्या काळात अटलजी नी भाजपा चे विस्तारा साठी संपूर्ण हिन्दुस्थान भर प्रवास केला १९९६च्या लोकसभेत १६२ जागा मिळवणा-या भारतीय जनता पक्षाला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून मान्यता मिळाली आणि अवघ्या १३ दिवसांकरिता वाजपेयी पंतप्रधान झाले. लोकसभागृहात पुरेसे बहुमत मिळवता आले नाही म्हणून मतदान होण्यापूर्वीच त्यांनी राष्ट्रपतींकडे जाऊन राजीनामा सादर केला. पुन्हा 1998 साली  व1999 साली अटलजी तिसऱ्यादा देशा चे पंतप्रधान जाले या 6 वर्षा चे पंतप्रधान पदा चे काळात 1998 साली पोखरण राजस्थान येथे अणुस्फोट करून त्यांनी देशाला विश्वात शक्तिशाली महासत्ता म्हणून सादर केले
पंतप्रधान होण्यापूर्वी जनसंघाचे संस्थापक सदस्य, खासदार (१९५७, १९६२), जनसंघाचे अध्यक्ष (१९६८ ते १९७३), लोकसभेतल्या जनसंघ गटाचे नेते (१९५७ ते १९७७), जनता पक्षाच्या सरकारात परराष्ट्रमंत्री (१९७७ ते १९७९), भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष (१९८० ते १९८६), भारतीय जनता पक्ष संसदीय दलाचे नेते (१९८० ते १९९६),  भारताचे पंतप्रधान,  (१९९६ आणि १९९८ ते २००४) अशी त्यांची प्रदीर्घ संसदीय कारकीर्द आहे. या कारकिर्दीप्रमाणेच सामान्य माणसाला वाजपेयी माहिती आहेत ते एक अमोघ वक्ते आणि सभा गाजवणारे नेते म्हणून. जुन्या जनसंघाने आणि नंतर भाजपाने ‘प्रधानमंत्री की अगली बारी-अटलबिहारी’ अशा अनेक वेळा घोषणा दिल्या होत्या. त्या घोषणा वाजपेयी यांच्या नेतृत्वामुळेच वास्तवात उतरू शकल्या. ते पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांचा चेहरा कधी ‘कट्टर’ वाटला नाही पण हिंदु धर्म , संस्कृति , परंपरा आणि इतिहास या बाबत ते संवेदनाक्षम होते या सर्व गोष्टी बाबत त्यांना प्रचंड अभिमान गर्व होता  आणि त्यांची सर्व जाती-धर्माना बरोबर घेऊन जाण्याची सर्वव्यापक भूमिका कधीही लपून राहिली नाही.  राजकीय हिंसाचाराला वाजपेयींचा जसा विरोध होता तसाच जाती-धर्माच्या नावावर राजकारणात टोकाचे मतभेद करण्यालाही त्यांचा विरोध होता. बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा त्या सगळ्या उन्मादात वाजपेयी कुठेही सामील झालेले नव्हते आणि ‘जे झाले ते योग्य झालेले नाही’, असे त्यांचे प्रांजळ मत त्यांनी अगदी स्पष्टपणे नोंदवलेले होते. ते काँग्रेसचे विरोधक होते; पण, देशाच्या उभारणीत काँग्रेसचा जो प्रचंड त्याग आहे, त्याबद्दल नेहमीच ते आदराने बोलत असत. विरोधी बाकावर असतानाही पंडितजींच्या परराष्ट्र धोरणाची स्तुती करताना त्यांना कधी संकोच वाटला नाही आणि स्वत: परराष्ट्रमंत्री झाल्यावरही पंडितजींबद्दल गौरवाचे उद्गार काढताना त्यांनी कधी हात आखडता घेतला नाही

वाजपेयींचे भाषण जेवढे मोहून टाकणारे असायचे, अगदी तेवढेच त्यांचे ललित लेखनही प्रासादिक आहे. काही काळ ते पत्रकारही होते. ‘पांचजन्य’ या साप्ताहिकात ते लेखन करीत असत. त्यांचा आणखी एक गुणविशेष म्हणजे व्यवसायाने राजकारणी असताना मनाने ते कवी होते आणि त्यामुळेच त्यांच्या अनेक कवितांमधून त्यांच्या रसपूर्ण अशा साहित्याचा परिचय भारतीय रसिक वाचकांना झालेला आहे. त्यांचे कवितासंग्रहही प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या कवितांच्या काव्य गायनाचे कार्यक्रमही रंगू लागले. पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांची मने जुळली. याचे आणखी एक कारण म्हणजे राजकारणात राहूनही या दोघांची मने कवींची होती, हळूवार होती, संवेदनाक्षम होती. त्यामुळे लोकसभेत आक्रमक होणा-या या दोन्ही नेत्यांनी आपल्या हळूवार भावनांचे प्रदर्शन साहित्यामध्ये अतिशय लालित्यपूर्ण रितीने केलेले आहे.
आशा या महान देशभक्त ,तपस्वी ,आदर्श थोर युगपुरुषा   ची जीवन यात्रा पूर्ण जाली , भारतीय राजकारणातील एक महान पर्वा चा अंत जाला स्वर्गीय अटलजी च्या पवित्र आत्मास शांती लाभो हीच हिंदु चे आराध्य दैवत प्रभु श्रीराम  चरणी प्रार्थना .

सौजन्य

No comments:

Post a Comment