Wednesday 13 January 2016

'मिस्टर अँड मिसेस सदाचारी'चा ट्रेलर आणि टायटल साँग

                       लग्नाच्या माहोल मध्ये लाँच झाला 'मिस्टर अँड मिसेस सदाचारी'चा धमाकेदार ट्रेलर आणि टायटल साँग 


 


इंडियन फिल्म्स स्टुडियोज निर्मित 'मिस्टर अँड मिसेस सदाचारी' हा सिनेमा वैभव आणि प्रार्थनाची जोडी आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी चांगलीच पर्वणी ठरणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने त्यांना पुन्हा एकदा पाहण्याची संधी मिळणार आहे. रोमँटिक आणि अॅक्शनचं परफेक्ट कॉम्बिनेशन असलेला  'मिस्टर अँड  मिसेस सदाचारी' हा  सिनेमा १९ फेब्रुवारी रोजी येत्या शिवजयंतीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर आणि टायटल ट्रॅक लाँच मंगलदायी वातावरणात पार पडला. पुणेरी ढोल ताशाचा गजर, लग्नाचा माहोल, उपस्थित पाहुण्यांना फेट्याचा मान आणि स्वागताला खुद्द मिस्टर अँड मिसेस सदाचारी म्हणजेच अभिनेता वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे. लव्ही-डव्ही किंवा चॉकलेट बॉयची ईमेज वैभवने आधीच्या काही सिनेमात रंगवली आहे. मात्र मिस्टर अँड मिसेस सदाचारी हा अॅक्शन सिनेमा त्यांच्यातील आणखी एका गुणाची चमक दाखवून देईन.  या सिनेमात रोमँटिक, अॅक्शन, इमोशनल ड्रामा असणार आहे, ज्याची झलक आपल्याला ट्रेलरमधून दिसेल.  त्यासोबतच वैभवचा डॅशिंग लूक आणि प्रार्थनाचा पारंपारिक तसेच मॉडर्न लूक पाहायला मिळेल. विशेष म्हणजे, नयनरम्य अशा मॉरिशअसमध्ये सिनेमाचे चित्रिकरण झाल्याने सिनेमाला एक वेगळीच लकाकी आली आहे. कोल्हापूर चित्रनगरीचे विज्युअल्स देखील या ट्रेलरमध्ये आहेत. या सिनेमाच्या ट्रेलरनंतर  'मिस्टर अँड मिसेस सदाचारी' चे टायटल सॉंग लोंज करण्यात आले. वन्स मोअरची दाद मिळालेल्या या टायटल सोंगला लोकांनी पसंतीची पावती दिली. या गाण्याचे मूळ संगीत व्ही. हरी कृष्ण यांनी दिले असले तरी त्याला पंकज पडघन यांनी आपला मराठमोळा तडका दिला आहे. या सिनेमाच्या टायटल सोंगबद्दल बोलताना पंकज पडघन यांनी सांगितले कि, 'लोकांना ठेका धरायला भाग पडेल असे हे गाणे आहे. या सिनेमात माझे तीन गाणी असून हि तिन्ही गाणी विविध जॉनरची आहेत. लोकांना ती नक्कीच आवडतील.' तसेच रोहित राउत याच्या आवाजातल्या या गाण्याचे बोल ओमकार मंगेश दत्त यांनी लिहिली आहेत.

या कार्यक्रमात मिस्टर आणि मिसेस सदाचारी त्यांच्या भूमिकेविषयी भरभरून बोलले. 'या सिनेमा बद्दल वैभव म्हणाला, माझी अगदी वेगळी भूमिका आहे, या सिनेमाच्या निमित्ताने मला डॅशिंग लूकमध्ये लोकांसमोर यायला मिळतंय.  प्रार्थना आणि मोहन जोशी यांनी दिलेल्या कम्फर्ट झोन मुळे हे शक्य झाले'. वर्षाच्या सुरुवातीलाच हा सिनेमा प्रदर्शित होत असल्याकारणामुळे मिसेस सदाचारी म्हणजेच प्रार्थना बेहरे  देखील खु खुश आहे. ती म्हणते 'माझ्या आतापर्यंत केलेल्या प्रत्येक कामाला लोकांनी पसंती दिलेली आहे, या सिनेमातील माझा अभिनय सुद्धा पसंत करतील अशी मी आशा करते. तसेच या सिनेमात जेवढी अॅक्शन आणि स्टट आहे तेवढाच तो रॉमेटिक पण आहे'  सिनेमाची कथा बाप मुलाच्या नाते संबंधावर आधारित आहे. वैभव आणि ज्येष्ठ अभिनेता मोहन जोशी या बापलेकाची फ्रेश जोडी पहिल्यांदा ऑन स्क्रीन दिसणार आहे, याबद्दल बोलताना मोहन जोशी म्हणाले , 'मिस्टर अँड मिसेस सदाचारी' टीम सोबत काम करताना मजा आली असल्याचे सांगितले. तर आईच्या व्यक्तिरेखेत असणा-या उमा सरदेशमुख यांनी ''बाप आणि मुलामध्ये होणारे भावनिक अंतर सांभाळणारी माझी व्यक्तिरेखा असल्याचे सांगितले. आतापर्यंत वितरण क्षेत्रात कार्यरत असलेले आशिष वाघ 'मिस्टर अँड मिसेस सदाचारी'  या सिनेमातून पहिल्यांदाच दिग्दर्शकाची भूमिका पार पाडत आहे. नृत्यदिग्दर्शक फिरोज खान यांनी या गाण्यावर वैभव आणि प्रार्थना यांना ठेका धरायला लावले आहे. सिनेमाची पटकथा आणि संवाद प्रवीण विठ्ठल तरडे आणि उमा कुलकर्णी यांची आहे. उत्पल आचार्य आणि आशिष वाघ या दोघांनीमिळून
 या सिनेमाची निर्मिती केली आहे.

No comments:

Post a Comment