कोरीयन चित्रपटांवर
स्पेशल फोकस
इफ्फीत आलेल्या अनेक
स्पेशल पॅकेजपैकी कोरीया देशावर फोकस ठेवुन तेथील अठरा चित्रपटांना आणले गेले आहे.
हे सगळे चित्रपट वेगवेगळ्या पठडीचे असुन त्यांची जातकुळी आणि विषय वेगवेगळे
असल्याची माहीती कोरीयन राजदुत चो ह्युन पत्रकार परिषदेत देतात. कोरीयन चित्रपटांत
भारताप्रमाणे, कलाकारांना महत्व दिले
जातेच, मात्र त्या पेक्षाही लेखक आणि कथाप्रवाहाला अधिक महत्व देत असल्याची माहिती
ते देतात. कोरीयात चित्रपट आणि नाटक यांना खुप पसंती दिली जात असल्याचे सांगुन,
त्यांच्याकडेही हॉलीवुडचे चित्रपट हे संकट असल्याचे ते स्पष्ट करतात. त्यावर उपाय
म्हणुन, फिल्म कमीशनची स्थापना करण्यात आल्याची ते माहिते देतात. पुर्वी जेथे
चाळीस पन्नास चित्रपट तयार होत तेथे आता दोनशे पर्यंत कोरीयन चित्रपट तयार होतात.
देशी चित्रपटांबरोबरच कोरीयन कमीशन, सहनिर्मीती करते मात्र त्यात वर्षभरात फक्त
तिनच चित्रपटांना संधी दिली जाते. पुर्वी जेथे कोरीयन चित्रपटांना सेन्सॉरशिप होती
तेथे आता सेन्सॉरमुक्त चित्रपट तयार होत असल्याने, त्याचा फायदा चित्रपटांना होत
असल्याची माहिती चो ह्युन देतात.
No comments:
Post a Comment