Sunday, 20 November 2016

47th International Film Festival if India inaugurated

४७ व्या इफ्फीक चे दिमाख दार उद्घाटन

- हर्षदा वेदपाठक

गोव्यातील शामाप्रसाद मुखर्जी स्टेडीयमध्ये आज मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकाया नायडू, रक्षा मंत्री मनोहर पर्रिकर, गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर उपस्थित होतेत. यावर्षीच्या इफ्फिमध्ये 88 देशांचे 200 चित्रपट पाहता येतील.
प्रसिद्ध गायक एस.पी. बालसुब्रमणियम यांचा चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल यावेळी सत्कार करण्यात आला.

उद्घाटन समारोहा नंतर आफ्तर इमेज हा चित्रपट दाखवण्यात आला. जगप्रसिद्ध पोलिश दिग्दर्शक अन्द्र्झेज वाजदा यांनी दिग्दर्शित केलेला तो शेवटचा चित्रपट आहे. ऑस्कर पुरस्काराने सम्मानित करण्यात आलेल्या या दिग्दर्शकाचा हा शेवटचा चित्रपट आहे. दुर्दैवाने नव्वद वर्षाचे हे दिग्दर्शक ऑक्टोबर महिन्यात निर्वतले. दिव्यांग असलेल्या चित्रकार महिलेवर आफ्टर इमेज हा चित्रपट आधरित आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात आजारी असलेले वाजदा, चित्रपटाच्या प्रत्येक दृष्य आणि संवादावर नजर ठेवून होतेत हि माहिती चित्रपटाच्या निर्मात्या मिचाल क्विएकिन्स्कि देतात. मृत्युपूर्वी वाजदा यांनी चित्रपटाचे सगळे चित्रीकरण पूर्ण केले होते, तसेच पार्श्वसंगीत देखील करून ठेवल्याची माहिती त्या पुढे देतात. तसेच संकलनानंतर त्या चित्रपटाचा प्रोमो कसा तयार करायचा याचा तपशील देणारे पत्र देखील त्यांनी लिहून ठेवल्याचे त्या सांगतात.

वाजदा यांच्या ६४ चित्रपटाप्रमाणे आफ्टर इमेज हा चित्रपट भुरळ घालणारा आहे ते वेगळे सांगायला नको. मुख्यत्वे कला आणि कलाकार यांच्यावर आधारीत असलेला हा चित्रपट कोणत्याही प्रश्नाची उत्तरे देत नाही तर फक्त प्रश्न विचारतो हे विशेष.    

No comments:

Post a Comment