सर्वत्र चालू असलेल्या नोटा टंचाई मुळे प्रेक्षकानी मनोरंजना कडे पाठ फिरवली असे असतांना मात्र "वजनदार" या मराठी चित्रपटाला सकारात्मक कौल दिला आहे, "रॉकऑन" सारखा हिंदी चित्रपट समोर असून सुद्धा वजनदार चित्रपटाला प्रेक्षक गर्दी करत आहेत. शनिवार पासून अनेक चित्रपटगृहे तसेच मल्टिप्लेक्स मधे वजनदार चे शो वाढले आहेत. शुक्रवार पर्यंत प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती पण अचानक शनिवार पासून वजनदार या चित्रपटाला भरपूर गर्दी होऊ लागल्यामुळे आम्ही शो च्या संख्येमधे वाढ केली आहे, मराठी चित्रपटाचा आशय उत्तम असल्यामुळे हल्ली प्रेक्षक मराठी चित्रपट सम्पूर्ण परिवारासह आवर्जून पाहतात असे मत सिटीप्राईड या सर्वांत मोठ्या मल्टिप्लेक्स चेन चे सुगत थोरात यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment