बजेटवर घाला - इफ्फी कर्टन
रेझर पत्रकार परिषद
- हर्षदा वेदपाठक
गोवा येथे आज 47व्या
इंन्टरनॅशनल फिल्म फेस्टीवल ऑफ इंडीयाची पत्रकार परिषद पार पडली. डीरेक्टरेट ऑफ
फिल्म फेस्टीवल सिन्थिल राजन आणि ऐन्टटेनमेन्ट सोसायटी ऑफ गोवाचे सीईओ अमेय
अभ्यंकर यांचा त्यात सहभाग होता. नेहमीच्या श्रेणीसह यावर्षी लेझर शो, स्वच्छ भारत
या विषयावर आधारीत चित्रपट तसेच नुकत्याच पार पडलेल्या ब्रीक्स परिषदेतील स्पेशल पॅकेज
हि या वर्षीच्या महोत्सवाची खासीयत राहणार आहे. तसेच डेलीगेटमध्ये पसंद केल्या
गेलेल्या चित्रपटांना मानांकन दिले जाणार आहे. सोबत लहान मुलांबरोबर पालकांना
फॅमेली अनुभव मिळुन येण्यासाठी म्हणुन मुलांचे एक सदर तयार करण्यात आले आहे. विशेष
म्हणजे, फिल्म इन्टटयुट हि संस्था चित्रपट विषयक काही सदरांवर मास्टर क्लासेस
घेणार आहे. या दरम्यान सत्तर वर्षाच्या चित्रपट इतिहासावर ऐका प्रदर्शनाचे आयोजन
देखिल करण्यात आलं आहे.
2004 साली गोव्यात सुरु
असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी गोवा राज्य सरकार आपले स्वताचे
इन्फ्रास्टकचर उभारेल हि घोषणा करुन अनेक वर्ष लोटली तरी देखिल गोव्यामध्ये
चित्रपट महोत्सवासाठी पुरकता आलेली नाही. यावर विचारता, अमेय अभ्यंकर सांगतात,
आम्ही योग्य साच्याच्या शोधात आहोत, ते कळुन आल्यावर आम्ही त्याचा पाठपुरावा करु (कोणता
साचा ते त्यांना ठावुक नसणार कारण तेव्हाचे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर परीकर
यांनी केलेल्या आखणीची त्यांना कल्पना नसेल हे दिसुन आले. मात्र परिस्थिती सावरण्यापुरते
त्यांनी ते व्यतव्य केले हे अनेक वर्ष चित्रपट महोत्सव कव्हर करणारयांच्या लक्षात
आल्याखेरीज राहीले नाही). सावरतच, ते 2019 पर्यंत गोव्यात, चित्रपट महोत्सवासाठी
एन्टटेनमेन्ट हब तयार होईल हि माहिती देतात. दहा दिवस चालणारया या चित्रपट
महोत्सवाला आता नऊ दिवसावर आणले आहे. त्यामागचे कारण विचारले असता सिंथील राजन
सांगतात, आम्ही क्वालीटी आणि कन्टेन्ड यात अजीबात कसुर करणार नाही. परंतु,
केन्द्राने बजेटवर घाला घातल्याच्या बातमीबद्दल त्यांना विचारला ते सांगतात, एम.
ओ. यु. नुसारच बजेट आखले जातात. काही चित्रपटांचे रिपीट स्क्रीनींग कॅन्सल करत
असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.
गोवा
राज्य सरकार हे बजेट कमी करम्याच्या मागे असुन त्यास केन्द्राचा पाठींबा देखिल
आहे. मात्र, अर्थहिन वेळखाऊ उद्घाटन मागे सारुन फक्त दिप प्रजवलन केल्यास कोणाचीच
काही हरकत नसेल. फिल्म फेस्टीवल हा मुळातच एक सोहळा असुन तो चित्रपट, डेलीगेट आणि
सिनेप्रेमींच्या एकत्रीत येण्याने साजरा होतो (त्यासाठी नाचगाणं, फुड कोर्टची गरज
नसते), मग त्यासाठी वेगळे मनोरंजनाचे गाडे कशाला हा प्रश्न उपस्थित होतो. बरं त्या
गाडयाला हाकायला पुन्हा करोडो रुपये फुकायचे. तेच पैसे जर दहा दिवसाच्या चित्रपट
महोत्सवात गुंतवले तर सिनेमाचा प्रसार आणि प्रचार व्हावा तसेच, चित्रपट विषयक
चर्चा व्हावी, अभिजात विदेशी चित्रपट पाहुन देशी चित्रपटकर्त्यांनी प्रेरणा घ्यावी
या उद्देशाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सावाची घडी पन्नास वर्षापुर्वी घातली
गेली, त्याला विचारसरणीला हा छेद दिल्यासारखा आहे.
मनोहर
परीकर यांनी जेव्हा गोव्याला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सावचे स्थाईक स्थळ करा हे
जाहीर केले तेव्हाच...गोव्यात चित्रपट संस्कृती नाही... चित्रपट महोत्सवाचे
इनफ्रास्टचर गोव्यात नाही...यामुळे चित्रपट महोत्सवाचे पतन होईल हे काही पत्रकार,
चित्रपटप्रेमी, चित्रपटकर्ते सांगत होते...सात दिवसाचा चित्रपट महोत्सव होणे हि
आंतरराष्ट्रीय चित्रपटाला घातक गोष्ट आहे...आणि आता त्या दिशेने पहिलं पाऊल पडलं
आहे...यापुढे सावध राहण्याची खरच गरज आहे...कारण कार्नीव्हल आणि फेस्टीवल यात फरक
आहे...तो समजला तर तरता येईल नाही तर .... नुकसाना चित्रपटांच आहे...तुमचं आहे आणि
आमचंही...
No comments:
Post a Comment