Wednesday, 10 August 2016

Akshay Kumar's interview on Rustoom



होय माझे चित्रपट दोन तिनशे करोडचा व्यवसाय करीत नाहीत - अक्षय कुमार   
हर्षदा वेदपाठक


देशभक्तीवर आधारीत चित्रपट करणे आणि ते स्वातंत्र्य दिनाच्या आसपास प्रदर्शित करणे हि अभिनेता अक्षय कुमारची खासीयत होऊ लागली आहे. रुस्तम हा त्याचा आगामी चित्रपट त्याच दिशेने आणखीन ऐक प्रयत्न मानायला हवा. यासह त्याचे चित्रपट दोन-तिनशे करोड का नाही करत, हि माहिती जाणुन घेण्याचा एक प्रयत्न...
रुस्तम या चित्रपटात तुम्ही देशाचं संरक्षण पण करत आहात आणि कायदयाच्या कचाटयात देखिल सापडले आहात. अशी भुमिका साकारणे कितपत कठीण होते ?

भुमिका साकार करणे माझ्यासाठी अजिबात कठीण नव्हते कारण मला फक्त संहीतेचा पाठपुरावा करायचा होता. आणि त्याप्रमाणे अभिनय करायचा होता, मात्र ऐक देशभक्त असलेला व्यक्ती खुनीपण आहे ते पटकथेमध्ये दाखवणे लेखकाला कठीण गेले असेल असे मला वाटते.

मग अश्या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी होकार भरण्यामागिल कारण काय ?

रुस्तम या चित्रपटाची कथा आणि संहिता मला आवडली. ऐक माणुस जेव्हा नात्यामध्ये बाहेरख्याली होतो तेव्हा काय होते ते अनेक चित्रपटात दाखवले गेले आहे. मात्र नात्यामध्ये एक स्त्री जेव्हा बाहेरख्याली होते तेव्हा काय होते हा विषय आपल्याकडे कधीच आलेला नाही. हा नविनपणा मला भावला आणि मी रुस्तम स्विकारला. महिलांना हा चित्रपट नक्कीच आवडेल हे मी खात्रीने सांगु शकतो.

याच घटनेवर दोन चित्रपट येऊन गेले आहेत. त्यातुलनेत या चित्रपटात वेगळेपणा तो काय असणार आहे ?

ते चित्रपट फक्त ऐकलाईन कथेवर आधारीत होतेत. तर रुस्तममध्ये त्याचे अनेक कांगोरे पहायला मिळतील. तसेच ज्या काही घटना तुम्ही येथे पाहाल त्या सत्य घटना आहेत. ऐकाच नानावटी केसमधुन घेतलेल्या नाहीत तर अनेक वास्तवदर्शी घटनांमधुन त्या घेतलेल्या आहेत. सुनिल दत्त आणि विनोद खन्ना यांनी या आधि केलेल्या चित्रपटांना तुफान यश मिळालं होतं. त्या यशाचे श्रेय हे त्या दोन कलाकारांनी चपखलरीत्या वठवल्या भुमिकेला देखिल जाते. मला रुस्तमद्वारे यश मिळेल काय हे त्या चित्रपटाच्या यशानंतरच ठरवता येईल असं मला वाटते.

तुम्ही आतापर्यत अनेक चित्रपटांत आर्मी, ऐअरफोर्स गणवेशातील भुमिका केल्या आहेत. देशभक्तीचे धडे देखिल दिलेत. रुस्तममध्ये तुम्ही नेव्ही ऑफीसरची भुमिका करत आहात. तर तुम्हाला आधुनिक काळातले मनोजकुमार म्हणायचं काय ?

मनोज कुमार यांचे काम खुप महान आहे. त्यामुळे माझी त्यांच्या बरोबर तुलना होऊच शकत नाही अणि ती तुलना योग्य देखिल ठरणार नाही. मनोज कुमार यांनी हाउसफुल्ल सारखे चित्रपट केलेले नाहीत. त्यामुळे आमची तुलना होणे शक्य नाही. मी एकाच प्रकारचे चित्रपट कलेले नाहीत. तसेच मी चकोरीबध्द भुमिका करीत नाही.

तुम्ही जॉली एल. एल. बी. हा चित्रपट करत आहात. तुमच्या स्टारपदाचा फायदा त्या चित्रपटाच्या भाग दोनसाठी होईल असे मत अर्शद वारसी यांनी व्यक्त केले आहे त्याबद्दल काय संगाल ?

प्रत्येक कलाकाराला वेगवेगळ्या भुमिका साकारायची संधी मिळते. वेलकम या चित्रपटाच्या भाग दोनमध्ये दुसऱ्या कलाकाराची भूमिका होती, त्यामुळे कोणत्याही विषयावर कोणाचाही जन्मसिद्ध हक्क नाही हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे. आता मी हेराफेरी नाही करत आहे, तर कोणी दुसरा कलाकार ती भुमिका करीत आहे. आणि हे असे होतच राहणार.


तुम्ही पंचवीस  वर्ष या क्षेत्रात आहात, तो प्रवास कसा झाला. तुमच्यासाठी यशाची व्याख्या काय ?


मला कोणत्याही बाबतीत खेद नाही, मी या इंडस्ट्रीचा भाग आहे याचा मला अभिमान आहे.  चित्रपटसृष्टीत मी काम करेन याचा देखिल विचार केला नव्हता. माझा सगळा प्रवास हा कोणत्याही खेदाशिवाय राहीलाय. कोणालाही माझी जागा घ्यायची इच्छा होईल. देवाने मला जे काही दिलं आहे त्यात खेदाची संधीच दिली नाही. आणि त्या देणगीचा मी आदर नाही केला तर माझ्यासारखा वाईट माणुस दुसरा कोणी नाही. यश म्हणाल तर ते आज आहे आणि उदया नाही.



दादा कोंडके यांच्यावर तुम्ही मराठी चित्रपट करणार होतात त्याचे काय झाले ?



अजुन संहीतेवर काम सुरु आहे, त्यामुळे अजुन त्या चित्रपटावर काहीच सांगता येत नाहीय. ऐक संहीता लिहायला खुप कालावधी लागतो. आम्ही त्यावर मागिल ऐकावर्षापासुन काम करत आहोत. अजुन मनाप्रमाणे काम होत नाही आहे.

जेष्ठ अभिनेता नसरुद्दीन शहा यांनी राजेश खन्ना यांच्यावर टिका केली होती. ऐका कालाकारानं दुसरया कलाकारावर केलेली टिका तुम्हाला कितपत योग्य वाटते ?

या क्षेत्रात मी पंचविस वर्ष आहे, त्या दरम्यान मी अनेक मुलाखती दिल्या आहेत. तुम्ही मला माझी एक मुलाकात काढुन दाखवा की ज्यात मी कोणाबद्दल काही बोललो असेन. जे काचेच्या घरात राहतात ते दुसरयाच्या घरावर दगड मारत नाहीत हि म्हंण योग्य आहे, आणि मी त्यावर विश्वास ठेवतो. कोणी विद्वानानं म्हटलय देखिल...माईन्ड युअर ओन बिझनेस...आणि मी पण तेच करतो. मी कोण आहे जो दुसरयावर टिका करेन. आपलं मत व्यक्त करायचा प्रत्येकाला हक्क आहे. राजेश खन्ना यांच्यावरील टिका या मुदयाकडे वळता तो मुद्दा आता मागे सरलाय. कारण नासीर साहेबांनी माफी देखिल मागीतली आहे. संपली आता ती बात, आणि तुम्हीपण त्यावर प़डदा टाका.

खिलाडी या शिर्षकावर आलेले सगळे चित्रपट हिट राहीलेत. आगामी कालावधीमध्ये त्या शिर्षकांवर आधारीत आणखीन काही चित्रपट तयार होणार आहेत काय ?

अजुनतरी खिलाडी सिरीजवर नविन चित्रपट करायचा विचार झालेला नाही ?

पंचविस वर्ष तुम्हाला या क्षेत्रात आहात. मिडीया तुम्हाला जे प्रश्न विचारते त्यात वैयक्तीक आणि व्यावसायिक प्रश्नापैकी कोणत्या प्रकारचे प्रश्न अधिक असतात ?

दोन्ही प्रकारेच प्रश्न असतात. प्रमाण करायचे झाले तर सत्तर टक्के प्रश्न हे चित्रपटांबद्दल असतात तर तिस टक्के प्रश्न हे वैयक्तीक असतात.

तुम्ही स्टार आहात. पण तुमचा परोपरकारी स्वभाव हा लोकांपर्यत फारसा पोहचत नाही. किंवा तुम्ही तो पसरवत नाही त्याचे कारण काय. तुमच्यासारखे फार कमी स्टार असतात जे समाजाचे आपण काही देणं लागतो या विचारसरणीवर विश्वास ठेवतात ?

मी यावर कधी विचारच केला नाही. आणि माझा तसा प्रचार व्हावा यासाठी देखिल मी प्रयत्न केलेले नाहीत हे खरं आहे. मला जेथे मनापासुन काम करावेसे वाटते तेथे मी ते केले. कोणाला मदत करुन त्यावर बोलणं योग्य नव्हे असं मला वाटतं. मी महिलांचे स्वसंरक्षण केंन्द्र चालवतो त्याबद्दल मात्र मी स्वताहुन, जेव्हा केव्हा संधी मिळते तेव्हा बोलतो.

अनेक कलाकार हे मल्टीप्लेक्सचे कलाकार म्हणुन ओळखले जातात. पण तुझे चित्रपट मात्र सिंगल स्कीनमध्ये ही वितरक, प्रदर्शकाला दिलासा देणारे असतात. त्यावर काय सांगशिल ?

मी एक वर्षाभरात चारच चित्रपट करतो, त्यांचे बजेट फारसे नसते. माझे चित्रपट हे दोनशे तिनशे करोड नाही कमावत. रुस्तमची गोष्ट बोलायची तर त्या चित्रपटाची लागत हिच मुळात सव्वीस करोड रुपये आहे. त्यावर थोडा किरकोळ खर्च जोडावा लागेल. मीच निर्माता असल्याने त्यावरील कमाई माझी आहे. फायदा झाला तर मला होणार, नुकसानही मलाच होईल. पण माझा चित्रपट फ्लॉफ नाही होऊ शकत हि माझी विचारसरणी आहे. आणि मी ही विचारसरणी ठेवली तरच तिन ते चार चित्रपट करु शकतो, नाही तर नाही.

लेखकांना कमी मानधन दिलं जाते. यावर निर्माता म्हणुन तुम्ही काय सांगाल ?

मला त्याबद्दल काहीच ठावुक नाही, त्यामुळे त्या विषयावर मत व्यक्त करणे चुकीचे ठरेल.

मागिल पाच वर्षात तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट स्विकारत आहात, जेणेकरुन तुमच्या नावाला एक वेगळं वलय प्राप्त झालं आहे. या दरम्यान एखादी वेगळी भुमिका करण्यासाठी उत्सुक आहात काय ?

सध्यातरी मी हॉरर कॉमेडीच्या शोधात आहे. तसा प्रयत्न भुलभुलय्या या चित्रपटात करण्यात आला होता. त्याप्रकारची भुमिका मला परत कधी मिळाली नाही. आतापर्यत मी ज्या चित्रपटांमध्ये काम केलय त्या तुलनेत मला सर्वाधिक गंम्मत त्या चित्रपटात काम करताना आली. कारण पहा ना, हॉरर ज्यामध्ये भिती आहे आणि कॉमेडी ज्यात हास्य आहे. हे दोन वेगवेगळे रस आहेत. या दोन वेगळ्या श्रेणीच्या विषयाला एकत्रीत करायचे... ते सोपं काम नाही. भुलभुलय्यामध्ये मंजुलापासुन भितीपण वाटत होती तर कधी तो फसतोय की काय असं वाटु लागते. दोन विभिन्न इमोशन्स एकत्रीत आणणे खुप कठीण आहे. मला वाटतं ते फक्त मेहमुद यांनाच जमले होते. त्यांनी दोनतिन चित्रपटांत असे विषय उत्तमरीत्या हाताळले होतेत.

टिव्ही क्षेत्रात सध्या काम करणार आहात काय ?

सध्यातरी त्यावर विचार नाही.

आरव आता मोठा झाला आहे. त्याला तुमचे, कोणत्याप्रकारचे चित्रपट आवडतात ?

तो सगळेच चित्रपट पाहतो. तो परिक्षक नसल्याने सगळच पहायला त्याला आवडते.

No comments:

Post a Comment