Wednesday 18 September 2019

मुंबई विद्यापीठात कॉल सेंटर सरू होणार


मुबई विद्यापीठाशी संलग्न असलेली महाविद्यालय तसेच विद्यार्थ्यांची वाढती संख्या, प्रवेश, परीक्षा तसेच निकाला दरम्यान विद्यार्थ्यांना भेडसावणार्‍या समस्यांबाबत विद्यार्थ्यांचे तात्काळ निराकरण व्हावे, यासाठी मुंबई विद्यापीठात तात्काळ कॉल सेंटर सुरू करण्यात यावे, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.सुहास पेडणेकर यांना दिले आहेत.

मुंबई विद्यापीठाचा विस्तार सावंतवाडी, रत्नागिरी, रायगड, पनवेल, मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर ते डहाणूपर्यंत आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांची संख्या ही सुमारे ७८० घरात पोहचली आहे. या सर्व महाविद्यालयांमध्ये मिळून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ही सुमारे ५ लाखांपेक्षा जास्त आहे.  यातील ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांनी दूरवरुन महाविद्यालय गाठावे लागते. परीक्षेचा अर्ज भरताना, निकालावेळी अथवा छोटया छोटया कामांसाठी विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठात अथवा उपकेंद्रात सातत्याने जावे लागते. एक-दोन वेळा जाऊनही विद्यार्थ्यांचे काम होत नाहीत. शहरीबरोबरच ग्रामिण भागांतील विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊनच तसेच बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करुन विद्यार्थ्यांची होणारी परवड तसेच पैशाचा पडणार भुर्दंड दूर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अद्ययावत कॉल सेंटर सुरू करावे, असा अतारांकीत प्रश्‍न जुलै २०१९ च्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सदस्यांनी उपस्थित केला होता.

या प्रश्‍नाला उत्तर देताना विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठाचे मोबाईल ऍप कार्यरत असून अद्ययावत कॉल सेंटर सुरू करण्याबाबत विद्यापीठ स्तरावर कार्यवाही सुरू असल्याचे, छापील उत्तर देण्यात आले. बदलत्या काळानुसार अन्य विद्यापीठांच्या स्पर्धेत आपले विद्यापीठ भविष्यातही कुठेही मागे राहू नये विद्यापीठाचे स्वत:चे कॉल सेंटर असणे ही बाबा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या वेळेची व पैशाची बचत होणार असल्याचे, राज्यमंत्री यांनी पत्रात नमुद केले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामासाठी विद्यापीठातकिंवा उपकेंद्रावर न जाता सर्व आवश्यक माहिती प्राप्त होईल. यासाठी विद्यापीठाने तात्काळ कॉल सेंटर सुरू करावे, असे निर्देश राज्यमंत्री वायकर यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी पत्राद्वारे दिले आहेत. 

No comments:

Post a Comment