Sunday 20 December 2015

Dilwale Review


                                दिल नसलेला दिलवाले


- 
-   - हर्षदा वेदपाठक

कोणत्याही चित्रपटासाठी त्या चित्रपटाची कथा आणि संहीता महत्वाची असते. मात्र त्यासह संवाद, अभिनय यातही तो चित्रपट कमकुवत असेल तर त्या चित्रपटाचे भवितव्य फारसे काही चांगले नसते हे आपण जाणतो. असेच काहीसे दिलवाले या चित्रपटाबदद्ल घडलय.

विनोदी आणि एक्शन चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक रोहित शेट्टी हे दिलवाले या चित्रपटाद्वारे पहिल्यांदा रोमाँटिक विषयाला हात घालत आहेत. दोन गैंगस्टर असलेले तरुण तरुणी प्रेमात पडतात मात्र आपल्या सिधांन्तासाठी लग्न करत नाहीत. याच तरुण तरुणीचा भाऊ आणि बहीण पंधरा वर्षाने प्रेमात पडतात तेव्हा काय होते त्याचे चित्रण दिलवाले या चित्रपटात आहे. एकदम सध्या कथेला हाताळणे रोहित शेट्टी यांना जमले नसल्याचे दिसून येते. अनायोग्य सीन, पुचकळ संवाद, यामुळं चित्रपटाच्या सुरवाती पासूनच दिलवाले बेजान वाटू लागतो. काही दृश्ये जोंनी लिव्हर, वरुण शर्मा, बोमन इराणी यां विनोदवीरांद्वारे  वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न रोहित ने केला आहे पण त्यात ही दिग्दर्शकाला यश येत नाही.

उत्तम कलाकारांची फ़ौज असूनही, कमकुवत कथाबीजामुळे ते फुकट जाताना दिसतात. शाहरुख आणि काजोल यांच्यातील काही दृश्ये वगळता वरुण अणि कीर्ति यांच्या मध्ये नसलेली केमिस्ट्री सलते. पंधरा वर्षानंतर एकत्रीत आलेली शाहरुख आणि काजोलची जोडी, हिंदी आणि विदेशी चित्रपटांतील जुनी दृष्ये जागवते ते पाहुन बरयाच प्रमाणात भ्रमनिराशा होते.  दिलवाले ची गाणी श्रवणीय आहेत पण उल्लेखनीय नाहीत.

धीमा आणि प्रडीक्टेबल कथानक असलेला दिलवाले निराशाजनक आहे खरा. या चित्रपटाने शाहरुख़ खान चे चाहते निराश होतील यात वाद नाही. गाड्यांची आदळआपट, रेस, निरस विनोदी दृश्ये यामुळे दिलवाले मनाला कोठेच भिडत नाही. चित्रपटाचा पु्वार्ध अतिशय कंटाळवाणा झाला आहे, तर उत्तरार्ध उपरा ठरतो.

वर्षाच्या शेवटी ऐका मोठ्या कलाकाराच्या चित्रपटाकडुन बॉक्स ऑफीसवर फार मोठी अपेक्षा वक्त केल्या जातात. त्यात ख्रिसमससाठी म्हणून वर्षाच्या शेवटी प्रदर्शीत झालेला दिलवाले फार काही काळ लक्षात राहणार नाही याचा खेद वाटतो

No comments:

Post a Comment