Friday 30 October 2015

Randeep Hooda on Mein aur Charles

पहिले हिंदीत स्थिर होवू दे मग हॉलिवुडचे पाहूरणदीप हुडा 

- हर्षदा वेदपाठक 




रणदीप हुडा हा कलाकार म्हणून नेहमीच लो प्रोफाईल राहिला आहे. आपल्या प्रत्येक चित्रपटात तो आपली दाखल घ्येण्यास भाग पडतो. अनोख्ये विषय आणि अनोखि भूमिका त्याला नेहमीच भुरळ घालते. असाच एक विषय घेवून तो में और चार्लेस या चित्रपटात देसेल. त्याबद्दल त्याच्या बरोबर केलेली बातचीत …… 

# में और चार्लेस या चित्रपटात तुम्ही चार्लेस शोभराजच्या भूमिकेत दिसणार आहात ?
- मला वाटते चार्लेस हा सेक्सी आहे मी पण पडदावर सेक्सी दिसण्याचा प्रयत्न करेन. त्याच्या या गुणामुळे त्याकडे अनेक मुली आकर्षित झाल्या होत्यात. पण मनाने तो सुंदर होता काय हे या चित्रपटात पाहायला मिळेल

# तुमचे दिसणे हे बरेचसे चार्लेस प्रमाणे आहे …… 
- अभिनेता असल्याने मला अनेक चित्र चारीत्रामध्ये स्वतला सदर करायची सवय झाली आहे. जर आम्ही स्वताला त्या रूप रंगात नाही घातले तर आम्ही जी भूमिका करत आहोत त्याला अर्थ राहणार नहि. हाइवे या चित्रपटात मी ट्रक ड्रेवर दिसत होतो त्यासाठी मी मेहनत घेतो यात वाद नाहि. दिग्दर्शक प्रवाळ रमन यांनी चार्गेशीट आणि पोलीस फाईल याद्वारे में और चार्लेस या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली आहे. तसेच अनेक व्यक्तींना भेटून चार्लेस शोभराजच्या वाक्तीमत्वाचे बारकाई ने केलेले चित्रण येथे पाहायला मिळेल

# तुम्ही त्यंच्यावर आधारीत पुस्तकाला विचारात घेतले नाही काय ?
- खरे तर आम्ही रेपोर्ताज वर अधिक विश्वास ठेवला आहे आणि त्याच आधारावर चित्रपट तैयार केला. पुस्तकात लेखक आपल्या विचाराचे मंथन करतात तर रेपोर्ताज हा वास्तवदर्शी असतो



# दिग्दर्शक प्रवाळ रामन बद्दल काय सांगाल ?
- मी त्यांना राम गोपाल वर्मा यांच्या फाक्टरीच्या दिवसापासून ओळखतो. महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी पण कधी बोक्स ऑफिसवर काही खास कामगिरी केलेली नाही. पण में और चार्लेस हा चित्रपट बोक्स ऑफिसवर चालेल आणि प्रवाळ त्याच्या पुढच्या चित्रपटात मलाच घेईल

# फार कमी अवधीत तू आपला एक दर्जा राखला आहेस. काय सांगशील त्याबद्दल?
- मी आजपर्यंत कधीच मागे वळून पहिले नहि. मी आज आणि आता या क्षणात जगण्यावर विश्वास ठेवतो. प्रत्येक चित्रपटात चांगले काम करण्यावर माझा भर असतो. आणि याच आत्मविश्वासावर मी काम मिळवत राहिलो आहे. तसेच मी पैश्यासाठी कधीच काम केलेले नाही.  खरे तर मी महात्वाकांक्षि आहे. मी एक कलाकार आहे आणि अभिनेता म्हणून मला लोकांनी ओळखावे असे मला वाटते




# आता अनेक कलाकार हे वेदेशी चित्रपट करताना दिशात आहेत. तू त्या दिशेने काही प्रयत्न करत आहेस काय ?
- आपले चित्रपट विदेशात फार चांगली पसंती घेत आहेत. परंतु आपले विषय हे विदेशात फार वाइट पद्धतीने सदर केले जातात याचे मला खेद आहे. त्यात आपली गरिबी किवा बलात्कार सारख्ये विषय असतात. मला वाटते सगळ्यात आधी मी स्वताला हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्थीर होताना पाहतो नंतर काय ते विदेशी चित्रपटाचे ते पाहु.  

# तुझे अधिकतर चित्रपट हे ग्रे शेड मध्येच असतात त्याचे कारण काय ?
- मला वाटते प्रत्येक माणसात सफेद आणि काळा  शेड हे असतात . आणि ते  वास्तव आहे आणि मला वास्तव पाडदावर रंगवायला आवडते. आणि सत्य तर हे आहे कि माणूस हा आपले तीन चेहरे कोणालाच दाखवू इच्छित नहि. त्यात त्याला आपली चांगली बाजुच लोकांना दाखवायची असते.समोर गोड बोलून नंतर दगाबाजी करणारी लोकं मला आवडत नाहीत

# तुमचे घोडे प्रेम हे फार प्रसिद्ध आहे, त्या बद्दल काही सांगा… 
- आता मी पतोडी कपची सुरुवात केली आहे. ज्यासाठी मी आता  घोड्यांची तय्यारी सुरु केली आहे. वयाच्या नवव्या वर्षापासून मी घोडेस्वारी करत आहे. हा खेळ खूप रोमांचकारी आहे असे मला वाटते. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी बालपणापासून प्राणीप्रेमी आहे. मला असे वाटते की, प्राणी हे माणसापेक्षा लाख पटिने बरे असतात असे मला वाटते





No comments:

Post a Comment