फोटो - ताज महाल
इफ्फी मोहोत्स्वाच्या दुसऱ्या दिवशी उत्तर पूर्वकडील सिनेमा संचाचे काल उद्घाटन करण्यात आले. तसेच सशी कपूर आणि देवन वर्मा या दोनं अभिनेत्यांना आदरांजलि वाहिली गेली, त्या दिवसाची खासियत ठरलेया चित्रपटांमद्ये स्नो पाथ्स (साउथ कोरिया), ताज महल (फ्रांस), मच लव्ड (फ्रांस) या चित्रपटांची नावे घेता येतील.
किम ही जुंग दिग्दर्शीत स्नो पाथस या चित्रपटात एक मद्याप्राशन करणारा इसम ती सवय सोडण्यासाठी एक कैथलिक रिहैबिलिटेशन सेंटर मद्ये जातो. आपले पूर्व आयुष विसरलेल्या या तरुणाची ओळख तेथील नन बरोबर झाल्यावर त्याचे आयुष्य कश्या प्रकारे बदलते ते पहायला मिळते, संथ असलेल्या या कथानकात इतके फ्लैशबैक आहेत की चित्रपटाची सवंगता तुटून जाते.
निकोलस सादा दिग्दर्शित ताज महल या चित्रपटात २६ नवंबर २००८ रोजी घडलेल्या मुंबई हल्याचे चित्र आहे, त्या दहशतवादी हल्यात मुंबई च्या ताज हॉटेलमध्ये अडकलेल्या एक तरुणीची कहाणी आहे. उत्तम संशोधन करून या चित्रपटाची सहिता लिहिली आहे. त्यात अनेक वास्तविक फुटेजचा वापर केल्याने, ताज महल या फ्रेंचपटाला आगळेच महत्व आले आहे.
वैयक्तिक किंवा कौटुंबिक कारणांमुळे शरीरविक्री करणाऱ्या स्त्रियांना मानाने जगण्याचा अधिकार आहे, त्या देखील इतर स्त्रियांप्रमाणे साधारण आयुष्य जगण्याची इच्छा ठेवू शकतात या मध्यवर्ती संकल्पने सभोवती मच लव्डचे कथानक फिरते, दिग्दर्शक नबील अयोउच यानी या कथनकाद्वारे समलिंगी, विभिनलिंगी आणि तृतीयपंथीय मनजातीचे केलेले यथोचित चित्रण पहायला मिळते
No comments:
Post a Comment